भारतीय स्टार्टअप OYO हॉटेल्स अँड रूम (Oravel Stays Private Ltd) या कंपनीने सेबीमध्ये आपला ड्राफ्ट पेपर (DRHP) दाखल करून IPO आणण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे आहे, या IPO मार्फत OYO हॉटेल्स $ 1.16 अब्ज डॉलर्सचे भांडवल उभारणार आहेत. जर सर्व काही ठीक राहिले, तर हा IPO पुढील वर्षाच्या सुरुवातीला मार्केटमध्ये येऊ शकतो.
IPO शी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे -
- OYO कंपनीचा IPO इश्यू आकार (Issue Size)सुमारे 8430 कोटी रुपये असणार आहे.
- 8430 कोटी ₹ पैकी 7000 कोटी रुपये हे नवीन शेअर विक्री (Fresh Issue) द्वारे उभे केले जातील आणि ₹ 1430 कोटी रुपये विद्यमान प्रोमोटरच्या शेअर विक्रीद्वारे (Offer for Sale )उभे केले जातील.
- सध्या कंपनीचे मूल्यांकन सुमारे $ 9 अब्ज डॉलर्स सांगितले जात आहे.
याशिवाय Oravel कर्मचारी कल्याण ट्रस्टचे विश्वस्त दिनेश राममूर्ती यांच्याकडे 5.40% , 3.24% हिस्सा सिकोइया कॅपिटल इंडिया कडे,तर 2.74% लाइटस्पीड वेंचर आणि 1.36% हिस्सा Airbnb Inc. यांच्याकडे आहे.
IPO चे मुख्य व्यवस्थापक आहेत कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटीग्रुप, ICICI सिक्युरिटीज, नोमुरा आणि बँक ऑफ अमेरिका.
Oyo कंपणीविषयी थोडक्यात माहिती -
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असेलेले रितेश अग्रवाल यांनी 2012 -13 मध्ये OYO हॉटेल्स कंपनी सुरू केली होती.
ही कंपनी अनेक प्रकारच्या खोल्या, हॉटेल्स आणि घरे राहण्यायोग्य बनवते. तसेच हॉटेल्स आणि रूम्स ऑनलाइन बुक करण्यासाठी सेवा देखील प्रदान करते.त्यासाठी ते अँप आणि वेबसाईट यांची मदत घेतात.
यामुळे ग्राहकांना अत्यंत किफायतशीर दरात कोठेही राहण्याची सुविधा उपलब्ध होते.
भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि युरोपमध्ये ओयोच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेले 90% पेक्षा जास्त हॉटेल आहेत. याशिवाय चीन, अमेरिका आणि इतर देशांमध्ये देखील ओयो सुविधा देत आहे,सध्या त्यांचा जागतिक विस्तार कोरोना साथीच्या रोगामुळे थोडा कमी झाला आहे.
Oyo अँप हे Airbnb आणि Booking.com सारख्या ट्रॅव्हल अँप सोबत जगातील सर्वात लोकप्रिय ट्रॅव्हल अँप्सपैकी एक बनले आहे. त्याच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये 9 दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते उपलब्ध आहेत.
OYO ने सादर केलेल्या DRHP नुसार -
OYO अँँपचे 100+ दशलक्षाहून अधिक डाउनलोड आहेत.
त्यांची हॉटेल्स 800+ शहरांमध्ये पसरलेली आहेत. आणि
मार्च 2021 पर्यंत त्यांच्याकडे 157,344+ स्टोअरफ्रंट्स होते.
Oyo च्या DRHP मध्ये शेअर किंमत (Offer Price ) अजून जाहीर केलेली नाही.
Oyo रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (Red herring prospectus) ची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे
ओयो हॉटेल्सची आर्थिक कामगिरी - Oyo Financial Report
जागतिक महामारी असूनही ओयो कंपनी नफ्याकडे वाटचाल करत आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात:एक वर्षापूर्वी असलेला एकूण तोटा 13,122 कोटी रुपयांवरून 3,943 कोटी रुपयांवर आला आहे.
महसूल सुमारे 70% घटून 4,157 कोटी रुपयांवर आला आहे.
समायोजित सकल नफा आर्थिक वर्ष 2020 मध्ये 1,280 कोटी रुपयांवरून FY 2021 मध्ये 1,320 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
समायोजित एकूण मार्जिन FY20 मध्ये 9.7% वरून FY21 मध्ये 33% पर्यंत वाढला.
विपणन आणि जाहिरातींसाठी कंपनीने 542 कोटी रुपये खर्च केले आहेत.
जोखीम घटक - Risk factors
Oyo ने या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (Red herring prospectus) मध्ये इतर जोखीम घटक देखील सूचीबद्ध केले आहेत.कोविड 19 -Covid 19
ओयो नुसार साथीचे रोग आणि लॉकडाऊन याचा व्यवसायावर आणि व्यापक प्रवासी उद्योगावर "भौतिक आणि विपरित परिणाम" करत राहतील अशी अपेक्षा आहे. तसेच कोविड -19 व्यवसायावर किती परिणाम करेल हे अनिश्चित आहे.नफा नाही - No profit
कंपनीने म्हटले आहे की सुरुवात केल्यापासून प्रत्येक वर्षी कंपनीला निव्वळ तोटा झाला आहे आणि नफा मिळवण्याच्या त्याच्या क्षमतेस विलंब होऊ शकतो.वाढ मंदावू शकते - Growth may slow
त्यांनी असे म्हटले आहे की ते कदाचित त्याच्या ऐतिहासिक वाढीच्या दराशी सुसंगत राहणार नाही आणि त्याच्या विस्तार योजना राबवण्यात आणि त्याच्या वाढीच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येऊ शकतात.ब्रँड इमेज - Brand Image
ओयोने सांगितले की त्यांचा ब्रँड आणि प्रतिष्ठा राखणे आणि वाढवणे त्याच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि नकारात्मक प्रसिद्धीमुळे ओयो व्यवसायाला हानी होऊ शकते.
IPO निधी कशासाठी वापरणार -
ओयो आयपीओमध्ये शेअर्स विकून निर्माण होणारी कमाई ओयोच्या उपकंपन्यांनी केलेल्या कर्जाची भरपाई किंवा परतफेड करण्यासाठी व ओयो कंपनीच्या वाढीच्या उपक्रमांना निधी देण्यासाठी आणि अन्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.हे सुद्धा जरूर वाचा..
शेअर मार्केट मध्ये वापरण्यात येणारे शब्द व त्यांचा अर्थ
आयपीओ - IPO म्हणजे काय ? Zerodha मध्ये IPO कसा खरेदी करायचा ?

Do not enter any spam link in comment box