Type Here to Get Search Results !

राईट इशू म्हणजे काय ? What is Rights issue in Marathi

 आपण या लेखात राईट इशू म्हणजे काय,राईट इशू का आणतात ?,राईट इशू चे फायदे काय आहेत ?आणि राईट इशू  साठी अर्ज कसा करतात ? हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ,चला तर मग सुरू करूया.

Rights issue - राइट इशू म्हणजे काय ?

राइट इशू म्हणजेच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना अधिकचे शेअर खरेदी करण्यासाठी दिलेली ऑफर असते.राइट इशू द्वारे शेअर खरेदी करण्यासाठी दिलेली ऑफर ही सध्या मार्केटमध्ये चालू असलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असते.यासाठी एक ठराविक कालावधी कंपनीतर्फे जाहीर केला जातो.



हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की राइट्स इश्यू ऑफर ही फक्त जे, कंपनीच्या विद्यमान भागधारकांना आपली कंपनीतील गुंतवणूक वाढवण्याची संधी प्रदान करते.  भागधारक ही ऑफर स्वीकारू शकतो  किंवा नाही स्वीकारणे पसंद करू शकतो .Rights Issue द्वारे शेअर खरेदी करण्याचे  शेअरधारकांवर कुठलेही बंधन नाही.

राइट इशू साठी पात्रता -

जसे आपण आईपीओ किंवा शेअर मार्केटमधून कंपनीचे शेअर डायरेक्ट खरेदी करू शकतो तसे आपण राइट इशू मध्ये करू शकत नाही.ज्या व्यक्तींकडे राइट इशू जाहीर केलेल्या कंपनीचे शेअर असतील त्याच व्यक्ती Rights Issue साठी पात्र असतात.

कंपनीने जाहीर केलेल्या रेकॉर्ड डेट च्या दिवशी आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये हे शेअर असणे गरजेचे असते.रेकॉर्ड तारखेला जर आपण शेअर खरेदी केले तर त्या व्यक्ती राईट इशू साठी पात्र होत नसतात.

Rights Issue निगडित महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ? -

Record Date - रेकॉर्ड डेट

रेकॉर्ड डेट या तारखेला ज्या ज्या व्यक्तींच्या डिमॅट खात्यात rights issue जाहीर केलेल्या कंपनीचे शेअर असतात त्या व्यक्ती Rights issue साठी पात्र असतात.रेकॉर्ड डेट च्या दिवशी कंपनी rights issue साठी पात्र असणारे शेअर धारक ठरवतात.

Rights Issue Opening Date -

ज्या दिवसापासून rights issue साठी अर्ज करता येऊ शकतो त्या तारखेला राईट इशू सुरू तारीख किंवा Rights Issue Opening Date असे म्हणतात.

Rights Issue Closure Date -

ज्या दिवसापर्यंत rights issue साठी अर्ज करता येऊ शकतो त्या तारखेला राईट इशू समाप्त तारीख किंवा Rights Issue Closure Date असे म्हणतात.

या तारखे नंतर आपल्याला rights issue साठी अर्ज करता येत नाही.

Allotment Date -

Allotment date या दिवशी कंपनी Rights Issue साठी जमा झालेल्या  सर्व अर्जावर छाननी करून शेअरची विभागणी करते.

Credit Date -

ज्या दिवशी rights issue द्वारे मिळालेले शेअर आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात त्या तारखेला क्रेडिट डेट असे म्हणतात.

Listing Date - 

ज्या दिवशी rights issue चे शेअर स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट होतात आणि पूर्वी असलेल्या शेअर सोबत व्यापार करण्यास सुरुवात होते, त्या तारखेला लिस्टिंग डेट असे म्हणतात.



कंपन्या राईट इशू का आणतात ? -

ज्यावेळेस कंपनीला भांडवल उभारणीची गरज असते त्यावेळेस अधिकचे कर्ज घेण्यापेक्षा शेअर मार्केटमधून हे भांडवल उभारले जाते.

कंपनीला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, एखाद्या व्यवसाय अंगीकृत करण्यासाठी,किंवा इतर खर्च करण्यासाठी .

तसेच debt-equity ratio म्हणजे कंपणीवरील कर्ज कमी करण्यासाठी राइट इशू आणला जातो.

शेअर धारकांना Rights Issue चे फायदे -

Rights Issue मध्ये ऊपलब्ध शेअर हे शेअर मार्केट मध्ये असणाऱ्या शेअरच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये म्हणजेच सवलतीच्या दरात उपलब्ध असतात.

उदा.

समजा ABC कंपनीच्या शेअरची किंमत मार्केटमध्ये 100 रु प्रति शेअर असेल आणि कंपनीने राईट इशू जाहीर केला तर त्यावेळेस तो शेअर आपल्याला सवलतीच्या दरात म्हणजेच 95 रु किंवा 90 रु मध्ये मिळेल.किती सवलत द्यायची हे कंपनी ठरवत असते.

Rights Issue उदाहरण -

XYZ या कंपनीने 1:4 या प्रमाणात rights issue जाहीर केला तर ज्या व्यक्तींकडे रेकॉर्ड डेट च्या दिवशी XYZ कंपनीचे जितके शेअर असतील त्या प्रत्येक चार शेअरमागे एक अधिकचा शेअर खरेदी करण्याची ऑफर दिली जाते.

जर एखादया व्यक्तीकडे XYZ कंपनीचे 20 शेअर असतील तर ती व्यक्ती 5 शेअर डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकते.

Rights Issue साठी अर्ज कसे करावे -

दोन पद्धतीने आपण अर्ज करू शकतो.

1 -ASBA (Applications Supported by Blocked Amount).

या पद्धतीने आपण आपल्या ब्रोकरद्वारे ,जसे आपण IPO साठी अर्ज करतो तसेच आपण rights issue साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.

2 -Composite Application Form (CAF)

ही ऑफलाईन पद्धती आहे ज्यामध्ये आपल्याला एक फॉर्म RTA (Registrar and Transfer Agent) मार्फत कुरियर द्वारे दिला जातो, त्यानंतर तो फॉर्म भरून आपल्याला तो फॉर्म Self Certified Syndicate Banks (SCSBs) च्या  ब्रँच मध्ये जमा करावा लावतो.

Rights issue च्या फॉर्म मध्ये Pan कार्ड नंबर,DP अकाउंट ची माहिती,सही इत्यादी माहिती भरावी लागते.


आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा

🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.






🎁5Paisa मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.




🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


तर मित्रानो आपण या लेखात राईट इशू म्हणजे काय?,राईट इशू का आणतात ?,राईट इशू चे फायदे काय आहेत ? आणि राईट इशू  साठी अर्ज कसा करतात ? हे जाणून घेतले ,

जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर कंमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.

धन्यवाद....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.