शेअर बाजारात नवीन आलेले लोक हे काही लोकांच्या प्रलोभनाला बळी पडतात आणि नुकसान करून घेतात.शेअर च्या टिप्स देणारे संदेश किंवा टीव्ही वर दाखवले जाणारे कार्यक्रम पाहून काही वेळा आपण शेअर विकत घेतो आणि मग नुकसान होते.त्यापेक्षा शेअर मार्केट काय आहे ते कसे काम करते,शेअर कसा निवडायचा हे स्वतः हळूहळू शिकून शेअर घेण्यास सुरुवात केली तर ते नेहमी उत्तम राहते.
आता आपण लगेच शेअर मार्केट शिकणार नाही पण रोज नवीन शेअर मार्केट मधील concept शिकून ,आपण नक्की शेअर मार्केट शिकू शकतो.
शेअर मार्केट गुंतवणूकदार म्हणून ईपीएस -EPS आणि पीई - PE रेशो म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे.
पीई रेशो म्हणजे काय? बहुतेक गुंतवणूकदार एखाद्या गुंतवणूकीपूर्वी प्रत्येक शेअरचा पीई Ratio का पाहतात? या लेखात याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. PE आपल्याला गुंतवणूकीसाठी योग्य शेअर्स निवडण्यात मदत करतात.
सुरुवातीला आपण पाहूया,
EPS म्हणजे काय ?
तर EPS - Earning per share म्हणजेच प्रति शेअर कमाई ,जर कंपनीचा एकूण निव्वळ नफा सर्व शेअर धारकामध्ये विभागला गेला तर प्रत्येक शेअरमागे किती रुपये येतील हे आपल्याला समजते.EPS वरून समजते की कंपनी किती कमावते आणि कंपनीचा व्यवसाय कसा चाललाय ते.जर कंपनीची स्तिथी चांगली असेल तर EPS हा जास्त असतो.याउलट कंपनीचा व्यवसाय - विक्री कमी होत असेल तर EPS कमी असतो.
EPS काढण्यासाठी खालील सूत्र वापरतात.
प्रति शेअर कमाई (EPS )= कंपनीचा एकूण निव्वळ नफा / एकूण शेअरची संख्याउदाहरणार्थ
समजा
ABC कंपनी, 60 रु प्रति शेअर दराने शेअर बाजारात काम करत आहे आणि त्या कंपनीचे एकूण 10,000 शेअर्स आहेत. एका वर्षाचे करानंतर ABC कंपनीचे एकूण उत्पन्न रू. 1,00,000 आहे. या उदाहरणासाठी ईपीएस गुणोत्तर आपण मोजूया.
ABC कंपनी ची प्रति शेअर कमाई (EPS)
= कंपनीचा एकूण निव्वळ नफा / एकूण शेअरची संख्या
=100000 / 10000
=10
ABC या कंपनीचा EPS हा 10 असेल.
याचा सोपा अर्थ असा की ABC कंपनी एका शेअरमागे 10 रु निव्वळ नफा कमावते.
पीई रेशो म्हणजे काय? What is PE Ratio
पीई रेशो कंपनीच्या स्टॉकचे मूल्य शोधण्यासाठी वापरले जाते, म्हणजे तो शेअर स्वस्त आहे की महाग हे समजण्यासाठी. अनेक शेअर मार्केटमधील तज्ञ शेअर निवडताना PE ratio नक्की पाहतात.P/E =एका शेअर ची किंमत / EPS(प्रति शेअर कमाई)
उदाहरणार्थ
PE समजण्यासाठी आपण वरती दिलेले उदाहरण पाहू ज्यामध्ये ABC कंपनीच्या शेअरची किंमत 60 र आहे व EPS आहे 10
तर
ABC चा P/E =एका शेअर ची किंमत / EPS ( प्रति शेअर कमाई)
=60/10
=6
म्हणजे आपण ABC या कंपनीत 1 रु मिळवण्यासाठी 6 रु इन्व्हेस्ट करतो आहे.
गुंतवणूकदारासाठी पीई रेशोचे महत्त्व
गुंतवणूकीसाठी स्टॉक निवडत असताना, बहुतेक गुंतवणूकदार स्टॉकचे पीई प्रमाण विचारात घेतात. हे त्यांना आपण विकत घेत असलेला स्टॉक किती स्वस्त किंवा महाग आहे याची कल्पना देते.ज्या शेअरचा PE जास्त आहे त्यांना OVERVALUE STOCK म्हणतात. तर ज्यांचा PE RATIO कमी आहे त्यांना UNDERVALUE STOCK असे म्हणतात.
कोणत्याही कंपनीच्या PE ची दुसऱ्या कंपनीच्या PE शी तुलना करताना दोन्ही कंपन्या ह्या एकाच क्षेत्रांतील असाव्यात. जसे की समजा तुम्ही TCS या IT कंपनीच्या PE ची तुलना करत आहेत त्यावेळेस दुसरी कंपनी सुद्धा IT क्षेत्रातील असावी उदा, विप्रो,टेक महिंद्रा इत्यादी.
तसेच आपण एखाद्या कंपनीच्या PE RATIO ची तुलना त्या क्षेत्रातील इंडस्ट्री च्या Average PE शी करू शकता.इंडस्ट्री Average PE आपल्याला moneycontrol च्या वेबसाईट वर मिळेल.त्यामुळे आपल्याला त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या average PE आणि आपण खरेदी करत असलेल्या कंपनीचा PE किती आहे ते समजेल.
PE हा बदलत असतो
तसेच EPS हा निव्वळ नफ्याशी निगडित आहे आणि निव्वळ नफा हा कंपनीच्या result नंतर दर तिमाही किंवा दर वर्षी बदलत असतात त्यामुळे EPS सुद्धा बदलत असतो.त्यामुळेच PE ratio हा आपल्याला सतत पहावा लागतो.
तर अशा प्रकारे आपण PE ratio आणि EPS काय आहे हे जाणून घेतले.जर आपणास ही माहिती समजली असेल तर कंमेंट करा आणि आम्हाला कळवा.
धन्यवाद ....

Do not enter any spam link in comment box