Type Here to Get Search Results !

जाणून घ्या ,शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचे सहा मार्ग

 शेअरच्या किमती वाढल्यावर आपल्याला  नफा होत असतो हे आपणास ठाऊक आहे परंतु या व्यतिरिक्त अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यातून आपल्याला नफा होऊ शकतो.तर ते कोणते मार्ग आहेत याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत,चला तर मग सुरू करूया.



1- शेअरच्या किमती वाढणे - CAPITAL APPRECIATION

शेअर मार्केट मध्ये पैसे कमावण्याचे सर्वात लोकप्रिय साधन म्हणजे CAPITAL APPRECIATION. आपण एखादा शेअर खरेदी केल्यावर काही काळानंतर आपल्याला नफा झाल्यावर तो शेअर विकत असतो व त्यातून नफा कमावतो ,मूळ खरेदी किमतीपेक्षा शेअर कितीने वाढला आहे किंवा किती नफा मिळाला आहे त्याला CAPITAL APPRECIATION असे म्हणतात.

या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आपल्याला शेअर खरेदी केल्यावर अधिक काळासाठी आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करणे गरजेचे असते.दिग्गज शेअर मार्केट इन्व्हेस्टर जसे की वॉरेन बफेट,राकेश झुणझुणवाला, विजय केडीया,राधाकिशन दमानी यांनी याच प्रकारातून शेअर मार्केटमध्ये करोडो रुपयांचा नफा कमावला आहे.

उदाहरणार्थ, MRF  कंपनीचा शेअर 2000 साली 2500  रुपयांना मिळत होता आणि सध्या MRF चा भाव 80000 रुपये च्या वर आहे.याठिकाणी  मिळणारा   नफा हा कितीतरी पटीने अधिक आहे यालाच CAPITAL APPRECIATION असे म्हणतात.

2 - IPO - आईपीओ

IPO मार्केट हे भारतामध्ये एखाद्या उत्सवाप्रमाणे असते.अनेक लोक , नवीन येणाऱ्या कंपन्यांचे शेअर घेण्यास उत्सुक असतात.IPO म्हणजेच कोणतीही कंपनी जेंव्हा पहिल्यांदा आपले शेअर हे बाजारात विक्रीसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात.

 आयपीओच्या वेळी कंपनीची शेअर्सची किंमत बर्‍याचदा कमी असते,पण कंपनी जेंव्हा शेअर बाजारात लिस्ट होते तेंव्हा  लोकांच्या मागणीनुसार त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत खूप वाढते आणि यामुळे गुंतवणुकदारांना खूप फायदा होतो. 

 आयआरसीटीसी (IRCTC ) या रेलवे तिकीट बुकिंग करणाऱ्या  कंपनीचा आयपीओ  सप्टेंबर 2019 मध्ये आला होता, ज्यामध्ये आयआरसीटीसीच्या एका समभागाची किंमत 315 ते 320 रुपये ठेवण्यात आली होती .आणि जेंव्हा कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली त्या वेळेस एक शेअरची किंमत 500 रुपये झाली होती,आणि सध्या आयआरसीटीसी शेअरची किंमत 2000+ रुपयांवर पोहोचली आहे.

3- डिव्हिडंड -Dividend

डिव्हिडंड म्हणजे कंपनीच्या नफ्यातुन आपल्या शेअरहोल्डर यांना दिला जाणारा  मोबदला होय.कंपनी ही वर्षातून एकदा किंवा दर चारमहिन्यांना डिव्हिडंड जाहीर करत असतात.अनेक लोक डिव्हिडंड च्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतात.

समजा, जर तुमच्याकडे इन्फोसिस या कंपनीचे शेअर्स असतील तर तुम्ही इन्फोसिस कंपनीत समभागधारक व्हाल आणि जर इन्फोसिस ने प्रति समभाग 10  रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला  आणि तुमच्याकडे इन्फोसिस कंपनीचे 100 शेअर असतील तर  तुम्हाला 1000 रुपये रुपये लाभांश म्हणून मिळेल.

4 - शेअर Buyback -

शेअर बायबॅक म्हणजे विद्यमान शेअर धारकांकडून कंपनीचे शेअर पुन्हा विकत घेणे होय.यासाठी कंपनी सद्या मार्केटमध्ये चालू असलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा अधिक भाव  देण्यास तयात होतात.

समजा XYZ लिमिटेड या कंपनीने बायबॅक जाहीर केला आणि प्रति शेअर बायबॅक किंमत ही 100 रुपये ठेवली आणि बायबॅक ऑफरच्या तारखेला जर XYZ लिमिटेडची शेअर किंमत 80 रुपये असेल तर बायबॅक प्रीमियम (100 रु - 80 रु) म्हणजेच 20 रुपये असेल .

TCS ,विप्रो या कंपन्या ने 2020 मध्ये buyback जाहीर केला होता.

Buyback मध्ये आपणास मूळ शेअरच्या किमतीपेक्षा अधिकचा भाव आपणास मिळत असतो.

5 - बोनस शेअर - Bonus Stock

बोनस शेअर ही कंपनीने आपल्या शेअरधारकांना दिलेली फ्री भेट असते.बोनस शेअर्स हे अतिरिक्त दिलेले  शेअर्स आहेत जे कंपनी आपल्या विद्यमान शेअरधारकांना त्यांच्या  मालकीच्या शेअरच्या प्रमाणात देतात . 

बोनस शेअर हे १:१ बोनस,२:१ बोनस,१:२ बोनस,३:१ बोनस या प्रमाणात जाहीर केले जातात . 

कंपनीकडे असलेल्या एकूण नफ्यातून (रिझर्व्ह्‌ज फंडातून ) असे बोनस शेअर हे शेअर धारकांना दिले जातात.  

समजा , ABC कंपनीने  १:१ बोनस जाहीर केला आणि एका शेअरचा भाव १०० रुपये आहे . आणि आपल्याकडे  ABC कंपनीचे एकूण शेअर १०० असतील 

तर बोनसनंतर ,

१:१ बोनस म्हणजेच आपल्या एका शेअरवर एक शेअर बोनस मिळेल म्हणजेच आपल्याकडे एकूण शेअर २०० होतील आणि ABC कंपनीच्या एका शेअरचा भाव १०० रुपये वरून प्रति शेअर  ५० रुपये होईल . 

शेअर बोनस जाहीर केल्याने शेअरची संख्या तर वाढतेच तसेच गुंतवणूकदारामध्ये उत्साह वाढतो आणि भविष्यात देखील शेअरच्या किंमती वाढण्यास देखील मदत होते.

6 - स्टॉक स्प्लिट

स्टॉक स्प्लिट - Stock Split म्हणजेच शेअरचे होणारे विभाजन.शेअर विभाजित करण्यामागे मुख्य कारण म्हणजे बाजारात शेअरची संख्या वाढवणे ,जेणेकरून शेअरची Liquidity वाढेल.

समजा XYZ कंपनीचा एक शेअर आपल्याकडे आहे आणि हा  शेअर 100 रु प्रति शेअर दराने उपलब्ध आहे,  व कंपनीने 2:1 या प्रमाणात शेअर स्प्लिट केला तर 1 शेअरचे 2 शेअर होतील आणि शेअरची किंमत 100 रु वरून 50 रुपये प्रति शेअर होईल.जरी शेअरची संख्या 1 वरून 2 झाली तरी शेअरची किंमत कमी झाल्याने आपली एकूण गुंतवणूक सारखीच राहते.

स्टॉक स्प्लिट केल्याने आपली शेअर संख्या  वाढते त्यामुळे आपल्याला अधिकच्या शेअरवर डिव्हिडंड मिळू शकतो.

तर आपण ये लेखात शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कसे मिळवू शकतो हे जाणून घेतले. आपणास हा लेख कसा वाटला तसेच आवडला असेल तर कंमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.