आईपीओ - IPO च्या माध्यमातून आपल्याला नवीन कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा प्राप्त होते.बहुतेक कंपन्यांचे IPO हे गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरत आहे.आपणही जर एखाद्या IPO मध्ये अर्ज केला असेल आणि IPO Allotment Status तपासायचे असेल तर आपण खालील स्टेप पाहू शकता .
1 - पहिल्यांदा आपल्याला आयपीओ वाटप स्थिती तपासण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करायचे आहे:
https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx
2- त्यानंतर आपल्याला ‘Equity’ हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ड्रॉपडाऊनमधून IPO चे नाव निवडायचे ज्यामध्ये आपण अर्ज केला आहे.
3-यानंतर आपल्याला आपला अर्ज क्रमांक - Application no आणि पॅन कार्ड क्रमांक -PAN Card no. प्रविष्ट करायचा आहे.
4- वरील सर्व पायऱ्या पूर्ण केल्यावर “Search” बटणावर क्लिक करा.
Search बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला IPO मिळाला आहे की नाही हे समजेल.जर आपणास IPO अलोट झाला नसेल तर आपले पैसे आपल्या बँक खात्यात परत जमा केले जाते.
जर आपल्याला IPO मिळाला तर ,IPO मधून मिळालेले शेअर आपल्या डिमॅट खात्यात काही दिवसात जमा केले जातात.
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
धन्यवाद..






Do not enter any spam link in comment box