शेअर मार्केटमध्ये नवीन असलेल्या लोकांना शेअर मार्केट मधील शब्द लवकर समजत नाहीत . तर मित्रानो या लेखात आपण शेअर मार्केट मध्ये वापरण्यात येणारे शब्द व त्यांचा अर्थ सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत .
⦁ शेअर बाजार: Share Market
शेअर मार्केट किंवा शेअर बाजार म्हणजे अशी जागा जेथे आपण कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो तसेच कंपन्या आपले शेअर बाजारात विकण्यासाठी आणू शकतात.शेअर मार्केटमध्ये अनेक गोष्टी एकत्र येतात आणि शेअर मार्केट बनते.जसे की स्टॉक एक्सचेंज, ब्रोकर,सेबी, शेअरहोल्डर, कंपन्या इत्यादी.
भारतभरातील सर्व स्टॉक एक्सचेंज भारतीय शेअर बाजाराचा एक भाग आहेत. शेअर बाजारातून शेअर खरेदी आणि विक्री ही आपण ब्रोकर च्या माध्यमातून करू शकतो.
⦁ स्टॉक एक्सचेंज: Stock Exchange
स्टॉक एक्सचेंज ही एक अशी संस्था आहे जेथे आपण स्टॉक म्हणजेच शेअर खरेदी किंवा विक्री करतो. भारतातील सर्व स्टॉक एक्सचेंजेस आता डिजिटल झाली आहेत आणि आपण शेअरची खरेदी विक्री घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ब्रोकरच्या अँप्लिकेशन किंवा वेबसाईटवर करू शकतो.
BSE - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
NSE - नॅशनल स्टॉक एक्सचेंज
ही भारतातील मुख्य २ स्टॉक एक्सचेंज आहेत.
⦁ शेअर - Share
शेअर म्हणजेच कंपनीच्या मालकीतील एक छोटा हिस्सा होय.प्रत्येक कंपनीच्या शेअर ची एक किंमत असते आणि त्या किंमतीवर आपण त्या कंपनीचा एक शेअर म्हणजेच कंपनीत एक छोटी मालकी खरेदी करत असतो.
जेवढे जास्त शेअर आपण खरेदी करू तेवढा आपल्याला त्या कंपनीच्या मालकीचा हिस्सा जास्त मिळत असतो.
उदा.इन्फोसिस चा शेअर 1600 रु आहे ,टाटा चा शेअर 300 रु आहे .
⦁ डिव्हिडंड -Dividend
डिव्हिडंड म्हणजे काय ? What is dividend in Marathi
लाभांश किंवा डिव्हिडंड म्हणजे कंपनीच्या नफ्यातुन आपल्या भागधारक म्हणजेच शेअर होल्डर्स ना दिला जाणारा मोबदला.
कोणत्याही कंपनीच्या नफ्यातुन कर आणि इतर खर्च वजा केल्यानंतर जो नेट प्रॉफिट (निव्वळ नफा) राहतो त्यातून काही भाग हा कंपनीच्या शेअर होल्डर्स मध्ये समान प्रमाणात वितरीत केला जातो .
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
⦁ डिव्हिडंड यिल्ड -Dividend Yield
डिव्हिडंड यिल्ड हे एक आर्थिक गुणोत्तर ( Financial Ratio )आहे जे आपल्याला शेअरच्या किमतीच्या किती प्रमाणात डिव्हिडंड मिळतो हे दाखवते.
यावरून आपल्याला हे समजते की शेअर किंमत आणि मिळणारा लाभांश किती आहे .
उदाहरणार्थ
इन्फोसिस या कंपनीने 100 % डिव्हिडंड जाहीर केला आणि इन्फोसिस ची face value आहे 20 रु. व शेअर ची किंमत आहे 500 रुपये, म्हणजेच आपल्याला मिळणारा डिव्हिडंड आहे 20 रु च्या 100 %
डिव्हिडंड =20*100 / 100 = 20 रुपये
आणि डिव्हिडंड यिल्ड असेल
डिव्हिडंड यिल्ड =(20 /500 ) * 100 = 4 %
म्हणजेच TCS या कंपनीचा डिव्हिडंड यिल्ड होईल 4 %
⦁ लाभांश जाहीर होण्याची तारीख- Dividend declaration date
ज्या तारखेला कोणतीही कंपनी डिविडेंड देण्याची घोषणा करते आणि त्या तारखेला Dividend declaration date किंवा लाभांश जाहीर होण्याची तारीख म्हणतात .
⦁ एक्स डिविडेंड डेट - Ex-Dividend date
एक्स डिविडेंड डेट म्हणजेच रेकॉर्ड डेट च्या २ दिवस अगोदरची तारीख ,ज्या तारखेच्या नंतर जर कोणी त्या कंपनीचा शेअर विकत घेतला तर त्याला डिविडेंड चा लाभ मिळणार नाही .
⦁ रेकॉर्ड डेट Record date
रेकॉर्ड डेट म्हणजेच अशी तारीख त्या तारखेला ज्या ज्या व्यक्तींच्या डिमॅट अकाउंट मध्ये डिविडेंड जाहीर केलेल्या कंपनीचा शेअर असेल त्यांना डिविडेंड चा लाभ मिळणार आहे .
⦁ पेमेंट डेट - Date of Dividend Payment
या दिवशी प्रत्यक्ष आपल्या बँक खात्यात डिविडेंड किंवा लाभांश चे पैसे जमा होतात किंवा ती प्रक्रिया सुरु केली जाते .
⦁ निर्देशांक -इंडेक्स
निर्देशांक हे आपल्याला शेअर बाजाराची दिशा दाखवतात. मार्केट तेजीत आहे की मंदीत हे समजण्यासाठी शेअर बाजार निर्देशांक खूप महत्वाची भूमिका बजावतात.भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे मुख्य निर्देशांक आहेत ज्यावरून आपण शेअर बाजाराची दिशा ठरवू शकतो.
⦁ सेन्सेक्स - Sensex
सेन्सेक्स म्हणजेच सेन्सिटिव्ह इंडेक्स (Sensitive Index ).सेन्सेक्स हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चे मानक निर्देशांक आहे .सेन्सेक्स मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असणाऱ्या 30 सर्वोत्तम कंपन्यांचा समावेश होतो.सेन्सेक्स मधील कंपन्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी आणि विक्री होत असते.
⦁ निफ्टी - Nifty
निफ्टी हा शब्द नॅशनल आणि फिफ्टी (National + Fifty ) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.निफ्टी मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज 50 कंपन्यांचा समावेश होतो.
निफ्टी मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या १२ क्षेत्रांचा समावेश आहे - जसे की माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, ग्राहक वस्तू, करमणूक आणि माध्यम, वित्तीय सेवा, धातू, फार्मास्युटिकल्स, दूरसंचार, सिमेंट आणि त्याची उत्पादने, वाहन, कीटकनाशके आणि खते, ऊर्जा आणि इतर सेवा.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
⦁ ऑर्डर -Order
ऑर्डर म्हणजे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर किंवा स्टॉक ब्रोकरला स्टॉक विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी दिलेली सूचना असते . स्टॉक ब्रोकरला गुंतवणूकदाराने दिलेल्या निर्देशांशिवाय ऑर्डर म्हणजे दुसरे काहीच नसते.⦁ लिमिट ऑर्डर - Limit Order
लिमिट ऑर्डर म्हणजेच काय तर आपण आपल्याला हव्या असलेल्या किमतीवर शेअर खरेदी करू करण्यासाठी दिलेली ऑर्डर होय.
तर, खरेदी लिमिट ऑर्डरचा - Limit buy order चा अर्थ असा आहे की आपण विशिष्ट किंमतीवर किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत शेअर खरेदी करण्यास तयार आहात.
आणि विक्री लिमिट ऑर्डरचा - Limit sell order चा अर्थ असा आहे की आपणास शेअर लिमिट किंमतीवर किंवा त्याहून अधिक किंमतीला विकायचा आहे.
⦁ मार्केट ऑर्डर - Market order
मार्केट ऑर्डर म्हणजे सध्याच्या बाजार भावावर स्टॉक खरेदी करणे किंवा विक्री करणे.
एकदा की ही ऑर्डर आपण टाकली तर त्वरित कार्यान्वित केली जाते. म्हणजेच आपली ऑर्डर execute होते.
⦁ स्टॉप लॉस ऑर्डर - Stop loss order
स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजेच जेव्हा शेअर च्या किंमती विशिष्ट किमतीवर पोहोचतात तेव्हा स्टॉक खरेदी ( buy) करण्याची किंवा विक्री (sell ) करण्याची एक ऑर्डर आहे. जी विशिष्ठ किंमत आहे तिला ‘स्टॉप प्राइस’( stop price ) म्हणून ओळखले जाते.
एकदा किंमत स्टॉप प्राइस ला पोहोचल्यानंतर स्टॉप ऑर्डर (stop loss order ) मार्केट ऑर्डर ( market order ) किंवा लिमिट ऑर्डर ( limit order ) बनते आणि आपली ऑर्डर पूर्ण होते .
⦁ ब्रॅकेट ऑर्डर्स : Bracket Order
ब्रॅकेट ऑर्डर्स मध्ये जर आपण एखादी ऑर्डर खरेदी किंवा विक्रीस टाकली असता आपली ती ऑर्डर पूर्ण झाली की त्याचबरोबर लगेच ट्रिगर आणि स्टॉपलॉस या दोन ऑर्डर टाकल्या जातात .ट्रिगर ऑर्डरने आपल्यला शेअरचा योग्य भाव आल्यावर शेअर विकून नफा कमवता येतो . तर जर शेअरची किंमत खाली जात असेल व तोटा होण्याची शक्यता असल्यास स्टॉपलॉस ऑर्डरमूळे आपले नुकसान हे मर्यदित केले जाते .
⦁ कव्हर ऑर्डर्स :Cover order
कव्हर ऑर्डर्स ही ब्रॅकेट ऑर्डर प्रमाणेच एक ऑर्डर आहे. फक्त या ऑर्डर मध्ये ब्रॅकेट ऑर्डर सारखा ट्रिगर लावला जात नाही फक्त स्टॉपलॉस लावला जातो यामुळे जर शेअरची किंमत कमी झाली तर ,त्यामुळे होणार तोटा हा मर्यादीत रहातो.⦁ इंट्राडे ऑर्डर- Intraday order
इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात केलेला खरीदी विक्री व्यवहार.उदाहरणार्थ ,
समजा तुम्ही सकाळी 10 वाजता एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतले तर ते दुपारी 3:30 वाजता बाजार बंद व्हायच्या आधी विकून टाकणे अनिवार्य आहे . जर आपण हे शेअर विकले नाही तर ते शेअर आपोआपच असेल त्या भावावर विकले जातात . त्यामुळे शेअर विकत घेण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे .
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
⦁ डिमॅट खाते -Demat Account
जसे आपण आपले पैसे हे एका बँक खात्यात जमा करतो तसेच आपण खरेदी केलेले शेअर्स आणि सिक्युरिटीज डीमटेरियलाइझ्ड खात्यात म्हणजेच आपल्या डिमॅट खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवले जातात.
⦁ ट्रेडिंग अकाऊंट -Trading Account
ट्रेडिंग अकाऊंट हे आपल्याला ऑनलाईन शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी गरजेचे असते.ट्रेडिंग अकाउंट ने आपण कोणत्याही कंपनीचा शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. आपल्या खरेदी विक्री चा तपशील आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये मिळतो.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
⦁ प्रायमरी शेअर बाजार - Primary Share Market
म्हणजेच कोणतीही कंपनी ही शेअर बाजारात प्रथमच आपला शेअर बाजारात आणते त्याला प्राथमिक बाजार म्हणजेच प्रायमरी मार्केट असे म्हणतात.
⦁ सेकंडरी शेअर बाजार - Secondary Share Market
या बाजारात, सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स म्हणजेच ज्या कंपनीचे IPO पूर्वीच आलेले आहेत त्यांचे शेअर विकत घेतले जातात किंवा विकले जातात.
NSE व BSE वर सध्या सुचिबद्ध असलेले शेअर म्हणजेच सेकंडरी मार्केट चे शेअर होय.
⦁ बुल बाजार: Bull Market
जेव्हा बाजारात साधारणपणे शेअर च्या किंमती वाढत असतात तेव्हा त्यास बुल बाजार म्हणतात.⦁ बेअर बाजार:Bear Market
बुल बाजाराच्या अगदी विरुद्ध दिशेला असतो बेअर बाजार , जेव्हा शेअर बाजारात शेअरच्या किंमती सामान्यत: कमी होत असतात तेव्हा त्याला बेअर बाजार म्हणतात.⦁ बिड:Bid
आपण शेअर विकत घेण्यासाठी जास्तीत जास्त किती पैसे देऊ इच्छित आहेत ती रक्कम म्हणजेच बिड.⦁ Ask:
ask ही एक किंमत आहे ज्यावर आपण शेअर विकायला तयार आहात.
⦁ डे ऑर्डरः Day Order
ज्या ऑर्डरचा कालावधी एक दिवसाचा असेल तिला "डे ऑर्डर" म्हणतात. ऑर्डर टाकल्यावर जर दिवसभरात त्या ऑर्डरची अंमलबजावणी (Execute ) झाली नाही तर ती ऑर्डर रद्द केली जाते.⦁ Liquidity:
Liquidity म्हणजे स्टॉक किती सहज विकला जाऊ शकतो. स्टॉक जर त्वरित आणि जास्त प्रमाणात विकला जात असेल त्याला liquid stock असे म्हणतात.⦁ ट्रेडिंग व्हॉल्यूम:Volume
एक दिवसात म्हणजे मार्केट चालू झाल्यापासून बंद होत पर्यंत खरेदी विक्री होत असलेल्या शेअर्सची संख्या ही ट्रेडिंग व्हॉल्यूम म्हणून ओळखली जाते.
⦁ IPO/Initial Public Offering- आईपीओ
जेव्हा एखादी private लिमिटेड कंपनी public होते त्याला त्याला IPO असे म्हणतात.IPO मध्ये पहिल्यांदा कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापार करण्यासाठी आपले शेअर सामान्य लोकांना विकते.
थोडक्यात,शेअर मार्केट मध्ये आपण आधीच विकत घेतलेले शेअर दुसऱ्या व्यक्तीकडून विकत घेत असतो थेट कंपनीकडून नाही. आयपीओच्या बाबतीत मात्र आपण शेअर्स थेट कंपनीकडून खरेदी करतो.
⦁ Market capitalization- भांडवल:
Market capitalization म्हणजे स्टॉक मार्केट नुसार कंपनीचे मूल्य किती आहे.
कोणत्याही कंपनीचे मार्केट कॅपिटल काढण्यासाठी त्या कंपनीच्या सर्व शेअरच्या संख्येला शेअरच्या सध्याची किंमत ने गुणले की त्या कंपनीचे एकूण मार्केट कॅपिटल येते.
उदा.XYz कंपनीच्या एकूण शेअरची संख्या आहे 10000
आणि एक शेअरची किंमत आहे 200 रु तर Xyz कंपनीचे मार्केट कॅपिटल असेल
मार्केट कॅप = 200*10000
=20,000,00 रु,
मार्केट कॅपिटल नुसार कंपन्यांचे तीन भाग पडतात
स्मॉल कॅप
मिड कॅप
लार्ज कॅप
⦁ म्युच्युअल फंड - Mutual fund :
म्युच्युअल फंडांमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणूक- दारांकडून जमा झालेले पैसे, फंड मॅनेजर कडून वेगवेगळ्या शेअर्स , बॉण्ड्स, डेबेंचर मध्ये गुंतवले जाते.म्युच्युअल फंडांद्वारे स्टॉक, बॉण्ड्स, मनी मार्केट सिक्युरिटीज, गोल्ड मध्ये पैसे गुंतवले जाते व नंतर त्याद्वारे पैशांची वाढ केली जाते.
उदा,
Axis Asset Management Company Ltd.,
Aditya Birla Sun Life AMC Limited,
HDFC Asset Management Company Limited,
HSBC Asset Management (India) Private Ltd.
सामान्य माणसाला शेअर बाजार तसेच शेअर गुंतवणुकीचे ज्ञान नसते अशा सामान्य गुंतवणूक धारकासाठी गुंतवणुकीचा हा पर्याय सर्वात चांगलं आहे.
⦁ पोर्टफोलिओ - Portfolio
आपल्या सर्व गुंतवणुकीच्या साधनांचा एकत्र संच म्हणजेच पोर्टफोलिओ .यामध्ये आपले शेअर, म्युच्युअल फंड,बॉण्ड्स,प्रॉपर्टी अशी सर्व साधने येतात.एक चांगला गुंतवणूकदार होण्यासाठी सगळ्या प्रकारच्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.⦁ ब्रोकर - Stock Broker
शेअर ब्रोकर हा सामान्य गुंतवणूकदार आणि स्टॉक एक्सचेंज यामधील एक दुवा आहे.जर आपल्याला शेअर बाजारात शेअर खरेदी विक्री करायचे असेल तर आपण डायरेक्ट स्टॉक एक्सचेंज मधून करू शकत नाही,तर त्याला एक स्टॉक ब्रोकर गरजेचा असतो.स्टॉक ब्रोकर आपल्याला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी अँप्लिकेशन, डेस्कटॉप सॉफ्टवेअर पुरवतात त्यामुळे आपण घरबसल्या शेअरची खरेदी विक्री करू शकतो.
स्टॉक ब्रोकर आपल्याला त्यासाठी काही कमिशन आकारतात.
स्टॉक ब्रोकर उदाहरण -zerodha, upstox,5 paisa, icici securities
⦁ ब्लू चिप स्टॉक - blue chip stocks
आर्थिक दृष्टीने मजबुत आणि चांगला व्यवसाय असणाऱ्या मोठ्या कंपन्या ह्या ब्लू चिप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात.
उदा.TCS, इन्फोसिस, रिलायन्स, विप्रो,टाटा मोटर्स इत्यादी
⦁ मल्टिबॅगर स्टॉक -Multibagger stock
ज्या शेअरच्या किंमती ह्या आपल्या किमतीच्या दुपटीने, तिपटीने किंवा त्याहूनही अधिक वाढतात त्या शेअर ना Multibagger Stock असे म्हणतात.
⦁ बँक निफ्टी - Bank Nifty
बँक निफ्टी हा शेअर बाजारातील एक इंडेक्स आहे जसे सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्याला शेअर बाजार कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवते तसे बँक निफ्टी आपल्याला बँक च्या शेअरची काय स्तिथी आहे ते दर्शवितात.⦁ पेनी स्टॉक -Penny stock
पेनी स्टॉक म्हणजेच ज्या शेअरच्या किंमती अगदी कमी आहे जशा की 5 रु,10 रु 8 रु इत्यादी.
आशा पेनी पैकी एखाद्या चांगल्या स्टॉक ला शोधून त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून अनेक लोकांनी चांगले पैसे कमावले आहेत.
⦁ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट - Long term Investment
नावाप्रमाणे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजेच जास्त कालावधी साठी एखाद्या शेअर किंवा बॉण्ड्स मध्ये केलेली गुंतवणूक होय.
या लेखात आपण शेअर मार्केट मधील वापरण्यात येणारे शब्द आणि त्यांचा अर्थ काय आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला . मित्रानो हा लेख आपल्याला कसा वाटला कंमेंट द्वारे नक्की कळवा .
धन्यवाद ...


Do not enter any spam link in comment box