Type Here to Get Search Results !

बँक निफ्टी - Bank Nifty म्हणजे काय ? जाणून घ्या मराठीत

 बँक निफ्टी  काय आहे ?

बँक निफ्टी निर्देशांक हा "निफ्टी बँक- Nifty Bank " म्हणून देखील ओळखला जातो.  वर्ष 2000 मध्ये इंडिया इंडेक्स सर्व्हिस अँड प्रॉडक्ट लिमिटेड (IISL) ने bank nifty इंडेक्स लाँच केला होता.  1 जानेवारी 2000 ही निर्देशांकाची मूळ तारीख आहे आणि त्याचे सुरुवातीला मूल्य 1000 इतके होते.


निफ्टी बँक निर्देशांक हा भारतीय बँकिंग स्टॉक कंपन्यांचा भारित निर्देशांक आहे .  बँक निफ्टी निर्देशांकात खाजगी क्षेत्रातील बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील  बँका दोन्ही समाविष्ट आहेत.

NIFTY BANK निर्देशांकात सर्वाधिक तरल ( liquid )आणि मोठ्या भारतीय बँकिंग शेअर्सचा समावेश आहे.  हा इंडेक्स भारतीय बँकांच्या भांडवली बाजाराची कामगिरी तपासनारा एक बेंचमार्क इंडेक्स आहे.  बँक निफ्टी निर्देशांकात जास्तीत जास्त 12 बँकिंग कंपन्यांचा समावेश आहे जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) वर list आहेत.

सुरुवातीच्या दिवसातही बँक निफ्टीमध्ये 12 बँकांचा समावेश होता.   बँक निफ्टी हा शेअर बाजारातील 12 मोठे भांडवल आणि उच्च Volume असणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील शेअरचा समूह आहे.  

 निफ्टी बँक इंडेक्स फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन (free float market capitalization) पद्धती  वापरून मोजले जाते.

 बहुतेक स्टॉक मार्केट ट्रेडर हे बँक निफ्टी मध्ये फक्त इंट्राडे मध्ये ट्रेडींग करतात, म्हणजे त्याच दिवशी बँक निफ्टी खरेदी करायचे आणि त्याच दिवशी त्यांना नफा किंवा तोटा असेल त्या भावात विकून टाकायचा. 

 बँक निफटीमध्ये तेच लोक चांगल्या प्रकारे पैसे कमवतात, ज्यांना शेअर बाजाराबद्दल चांगले ज्ञान असते. परंतु जर तुमचा बँक निफ्टी ट्रेड चुकीचा झाला तर चांगले नुकसान देखील होते.  बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करणे हे नवीन व्यक्तींसाठी खूप जोखमीचे आहे पण जेव्हा तुम्ही त्यात ट्रेड करायला शिकाल तेव्हा तुम्हाला त्यातून भरपूर पैसे  मिळू शकतात.

 निफ्टी बँक निर्देशांक विविध कारणांसाठी वापरला जाऊ शकतो जसे की बेंचमार्किंग फंड पोर्टफोलिओ, इंडेक्स फंड लॉन्च करणे, ईटीएफ इत्यादी.

 निफ्टी बँक इंडेक्स future आणि options मध्ये वारंवार ट्रेड   केला जातो. ट्रेडिंग हेतूसाठी, निफ्टी बँकेचा सध्याचा लॉट आकार  25 युनिट्स आहे.

कंपनीचे नाव आणि बँक निफ्टीमधील प्रमाण 

 बँक निफ्टी मधील असणाऱ्या कंपन्या आणि कंपन्यांचे प्रमाण हे बदलत असते.सध्या 2021 सप्टेंबर मध्ये असणारे बँक निफ्टी मधील शेअर आणि त्यांचे प्रमाण. खालीलप्रमाणे

कंपनीचे नाव बँक निफ्टीमधील प्रमाण %
एचडीएफसी बँक लि. 28.02
आयसीआयसीआय बँक लि. 20.92
स्टेट बँक ऑफ इंडिया 13.03
कोटक महिंद्रा बँक लि. 12.67
ऍक्सिस बँक लि. 12.36
इंडसइंड बँक लि. 5.30
एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड 2.01
बंधन बँक लि. 1.51
फेडरल बँक लिमिटेड 1.33
आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड 1.17
पंजाब नॅशनल बँक (PNB) 0.94
आरबीएल बँक 0.75

निफ्टी बँक इंडेक्स स्टॉक कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक वेटेज आहे जे की  28.02% आहे, तर आयसीआयसीआय बँक 20.92% वेटेजसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि बँकनिफ्टी कंपन्या इंडेक्स सूचीमध्ये 13.03% वर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) तिसऱ्या स्थानावर आहे.

 एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला बँक निफ्टी हेवी वेट्स स्टॉक असेही म्हणतात.

 बँक निफ्टी वेटेज इंडेक्समध्ये आरबीएल बँकेचे प्रमाण सर्वात कमी  0.75% इतके आहे.

 बँक ऑफ बडोदा (BOB) ला वगळून  31 मार्च 2021 रोजी केलेल्या वेटेज री-बॅलन्सिंगनुसार AU स्मॉल फायनान्स बँक लि. ही बँक सामाविष्ट केली आहे.

धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.