Type Here to Get Search Results !

मोबिक्विक(Mobikwik ) सिस्टम्स लिमिटेड IPO माहिती

  एप्रिल 2009 मध्ये सुरु झालेल्या , वन मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेड, जे मोबीक्विक या नावाने  प्रसिद्ध आहे हि , भारतातील सर्वात मोठ्या फिनटेक कंपन्यांपैकी एक आहे.भारतामध्ये  गुडगाव या ठिकाणी मोबिक्विक कंपनीचे  मुख्यालय आहे . 


मोबिक्विक -  MobiKwik  कंपनी , मोबीक्विक डिजिटल वॉलेट (MobiKwik Wallet) , आता खरेदी करा, नंतर पैसे द्या -  buy now, pay later  (MobiKwik Zip) सेवा ,रिचार्ज,बिल पेमेंट इत्यादी  सेवा पुरवतात .मोबिक्विक  प्लॅटफॉर्म हे  पीअर-टू-पीअर पेमेंट आणि डिजिटल वॉलेट्स ते बँक पेमेंट या सुविधाही देतात. सध्या, प्लॅटफॉर्मवर 12 कोटीहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आणि 30 लाखांहून अधिक ई-कॉमर्स, रिटेल आणि बिलर भागीदार आहेत आणि त्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे . 




कंपनी सातत्याने वाढतच आहे, विशेषत: कोरोनाच्या काळात कंपनीची सातत्याने वाढ झाली आहे , कोरोनामध्ये संपर्कविरहित आणि डिजिटल पेमेंटची मागणी वाढली आहे. FY20 मध्ये, कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात 133% वाढ झाली. मार्च 2020 मध्ये, मोबिक्विक ने ₹ 38 कोटी ची निव्वळ कमाई केली होती - मोबिक्विक ची एका महिन्यात आतापर्यंतची हि सर्वाधिक कमाई आहे .

मोबिक्विकने आपल्या सुरवातीच्या सार्वजनिक ऑफरिंगसाठी (IPO) ,  सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे ,ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DHRP) दाखल केला आहे.


MobiKwik IPO बद्दल ऑफर तपशील

  • IPO size - ₹ 1,900 कोटी
  • Fresh issue - ₹ 1,500 कोटी
  • विक्रीसाठी ऑफर - Offer for sale: ₹ 400 कोटी
  • IPO तारखा - जाहीर केलेली नाही
  • किंमत बँड - Price band - घोषित नाही
  • लॉट आकार - Lot size  - घोषित नाही

मोबिक्विक कंपनीचे शेअर्स बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) मध्ये सूचीबद्ध केले जातील. मोबिक्विक आयपीओ सह जवळजवळ $ 1 अब्ज मूल्यांकनाचे लक्ष्य ठेवत आहे.

गुंतवणूकदार श्रेणीवार ब्रेक-अप

  • QIB 75%
  • गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार -Non-Institutional Investors - 15%
  • Retail 10%

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, बीएनपी परिबास, आयआयएफएल सिक्युरिटीज, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज इंडिया आणि जेफरीज इंडिया हे मोबिक्विक स्टॉक इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.

प्राईस बँड, फेस व्हॅल्यू, इश्यू साइज, मार्केट लॉट, आणि आयपीओ उघडण्याची  तारीख अद्याप जाहीर  झालेली नाही , परंतु सप्टेंबर-ऑक्टोबर  2021 मध्ये IPO लॉन्च होऊ शकतो .


मोबिक्विक कंपनी  सार्वजनिक होण्याची कारणे आणि आयपीओचे उद्दिष्ट

मोबिक्विक कंपनी हि IPO च्या माध्यमातून   निधी उभारण्यासाठी आणि आयपीओमधून 40% निव्वळ उत्पन्नाचा वापर त्याच्या कंपनी वाढीच्या उपक्रमांना निधी देण्यासाठी करत आहे. 


मोबिक्विकचे उद्दीष्ट - 

  • भारतात मोबिक्विकचे  वॉलेट ग्राहक आणि व्यापारी यांची संख्या वाढवणे . 
  • त्यांचे कंपनी मजबूत करण्यासाठी डेटा सायन्समध्ये गुंतवणूक करणे . 
  • MobiKwik Wallet, MobiKwik Zip आणि Zaakpay (MobiKwik द्वारे पेमेंट गेटवे) यासह त्यांच्या विद्यमान  सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान अवगत करणे .

 विक्रीसाठी ऑफरमध्ये सात विद्यमान भागधारकांचे शेअर्स आहेत, ज्यात सिस्को सिस्टिम्स, सिक्वॉया कॅपिटल इंडिया, अमेरिकन एक्सप्रेस, बजाज फायनान्स लिमिटेड, ट्री लाइन एशिया मास्टर फंड आणि कंपनीचे प्रवर्तक - बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांचा समावेश आहे.


मोबिक्विकमधील सर्वात मोठे भागधारक

शेअरहोल्डर नाव शेअर्सची टक्केवारी

  1. बिपिन प्रीत सिंग (संस्थापक) - 20.21%
  2. सिकोइया कॅपिटल इंडिया - 17.25%
  3. उपासना टाकू (संस्थापक)  -14.31%
  4. बजाज फायनान्स - 13.86%
  5. ट्री लाईन आशिया - 4.43%


ताकद -Strengths

  • क्रॉस-सेल करण्याची क्षमता
  • डेटा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
  • जोखमीचे कार्यक्षम व्यवस्थापन


संधी -Opportunities

  • भारतातील डिजिटल पेमेंट झपाट्याने वाढत आहे, आणि मोबिक्विक या उद्योगाच्या वाढीस कारणीभूत ठरले आहे.
  • भारतातील ग्राहक पेमेंट बाजार अजूनही कमी आहे कारण निम्म्याहून कमी भारतीय डिजिटल पेमेंट करतात.
  • साथीच्या आजारामुळे डिजिटल पेमेंट आणि ग्राहक अर्थव्यवस्थेचे डिजिटलायझेशन वाढले आहे.


जोखीम घटक- Threats and Risk factors

  • पेटीएम, फोनपे आणि गूगल पे सारख्या देशांतर्गत आणि जागतिक तंत्रज्ञांकडून फिनटेक उद्योगामध्ये तीव्र स्पर्धा.
  • महागाईमुळे बाजारातील अस्थिरतेचा धोका संपूर्ण आर्थिक मंदीला कारणीभूत ठरू शकतो.
  • ग्राहक किंवा विक्रेता कनेक्शन मिळवणे, टिकवून ठेवणे आणि वाढवणे अशक्य झाल्यामुळे व्यवसाय आणि कामकाजात घट होऊ शकते.
  • डेटाचे उल्लंघन, सायबर हल्ले ब्रँडच्या नावावर लक्षणीय आणि नकारात्मक परिणाम करू शकतात.
  • फिनटेक मध्ये लक्षणीय आणि वाढती स्पर्धात्मकता.


आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा

🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.






🎁5Paisa मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.




🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.