24 सप्टेंबर महत्वाच्या घटना -
1873 - महात्मा ज्योतिबा फुले यांनी आजच्या दिवशी 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
1932 - महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर यांनी 1932 मध्ये पुणे करारावर सह्या केल्या.
1948 - प्रसिध्द अशा होंडा मोटार कंपनीची स्थापना आजच्याच दिवशी 1948 मध्ये सोइचिरो हॉन्डा, ताकेओ फुजिसावा यांनी केली.
1960 - अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
1973 - गिनी-बिसाउ हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे या देशाला पोर्तुगालपासून 1973 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
1995 - प्रसिध्द मराठी लेखक श्री शिवाजी सावंत यांना मृत्यूंजय या कादंबरीसाठी भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
1999 - कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट 1999 मध्ये कार्यान्वित झाले.
2007 - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृवाखाली भारताने पहिला टी-20 विश्वकप जिंकला.
24 सप्टेंबर जन्म -
1534 - शिखांचे 4 थे गुरू गुरू राम दास जी यांचा 1534 मध्ये जन्म झाला.
1861- थोर भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म.
1870 - नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म.
1889 - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म.
1915 - चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म आजच्याच दिवशी 1915 मध्ये झाला.
1921 - लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म.
1925 - भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म.
1936 - भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म.
1940 - इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म.
1950 - प्रसिध्द भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म 1950 मध्ये झाला.
24 सप्टेंबर मृत्यू -
1896 - स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान झालेले लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन.
1992 - भारताचे 13 वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन.
1998 - बालरंगभूमीचे पुरस्कर्ते आणि दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.
2002 - लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

Do not enter any spam link in comment box