Type Here to Get Search Results !

आपल्या नावावर किती सिमकार्ड नंबर रजिस्टर आहे जाणून घ्या .

 नमस्कार मित्रांनो मराठीत माहिती.कॉम, या आपल्या मराठी ब्लॉग वरती सर्वांचे मनापासून स्वागत,

नुकतेच दूरसंचार विभागाने एक वेब पोर्टल लाँच केले आहे,याद्वारे आपण आपल्या नावावर किती सिमकार्ड नंबर रजिस्टर आहे हे जाणून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे हे नंबर जर आपण वापरत नसेल किंवा आपल्या नावावर आहे परंतु आपल्याकडे ते सिमकार्ड नसेल (फेक सिमकार्ड असेल ) तर त्याची माहिती आपण दूरसंचार विभागाला या वेब पोर्टल मार्फत देऊ शकता.


चला तर मग जाणून घेऊया,


  • सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

https://tafcop.dgtelecom.gov.in/

  • लिंकवर क्लिक केल्यावर आपण दूरसंचार विभागाच्या  TAF-COP Portal म्हणजेच The Telecom Analytics for Fraud management and COnsumer Protection पोर्टलवर याल.

येथे आपण अशा प्रकारे वेबसाईट पाहू शकता.


  • येथे आपल्याला आपल्या नावावर असलेला कोणताही एक मोबाईल क्रमांक टाकायचा  आहे.



  • मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर  Request OTP या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आपण जो क्रमांक पोर्टलवर टाकलेला आहे त्यावर एक OTP येईल तो OTP आपल्याला पुढील स्क्रीनवर टाकायचा आहे.



  • या ठिकाणी आपल्याला OTP टाकून  validate या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • एकदा का आपला OTP verify झाल्यावर पुढील स्क्रीनवर आपल्याला जेवढे नंबर आपल्या नावावर रजिस्टर असतील त्याची लिस्ट दिसेल.





  • या ठिकाणी पाहू शकता रजिस्टर असलेले सिमकार्ड नंबर.
  • येथे आपल्याला प्रत्येक नंबर सोबत तीन ऑप्शन दिसत आहे.
1- This is not my number
2-Not Required
3-Required
  • जर एखादा नंबर जो आपल्याकडे नाहीये परंतु नावावर मात्र आपल्या आहे, असे दाखवत असल्यास आपण पहिला पर्याय निवडायचा आहे.
  • जर एखादा क्रमांक आपल्याकडे आहे परंतु त्याची आपल्याला गरज नसेल  म्हणजेच तो आपण वापरत नसेल तर दुसरा पर्याय निवडायचा आहे.
  • तसेच जर इतर क्रमांक आपण वापरत असेल तर तिसरा पर्याय निवडू शकता परंतु त्याची गरज नाही.
  • जर आपल्याला सिमकार्ड क्रमांक रिपोर्ट करायचा असेल तर सरळ आपल्याला तो क्रमांक select करायचा आहे आणि पहिला किंवा दुसरा ऑप्शन आपल्या गरजेनुसार निवडायचा आहे आणि खालील report या बटणावर क्लिक करायचे आहे.



  • रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यावर एक  request तयार होईल आणि एक reference no बनेल.तो reference number आपण copy करून ठेवू शकता.
  • तो reference no आपण आपला रिपोर्ट request track करण्यासाठीं वापरू शकतो.



  • त्यासाठी वरील track बटन दिलेले आहे ,तेथे आपला reference no टाकून ट्रॅक बटन क्लिक करायचे आहे.
  • येथे आपल्याला आपल्या रिपोर्ट केलेल्या no ची माहिती मिळेल.

तर अशा प्रकारे आपण एकूण आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत तसेच सिमकार्ड रिपोर्ट कसे करू शकतो हे जाणून घेतले.

माहिती जर आवडली असेल तर कमेंट द्वारे नक्की कळवा.

धन्यवाद....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.