भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ई-रुपी (e-RUPI) लाँच केले आहे. भारत सरकारच्या आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आपल्या यूपीआय(UPI) प्लॅटफॉर्मवर ई-रुपी ही सेवा विकसित केली आहे.
E - RUPI चा मुख्य उद्देश हा देशातील डिजिटल व्यवहार प्रणाली अधिक प्रभावी करणे असून इ रुपी व्हाउचर मार्फत ही सुविधा देण्याचा सरकारचा मानस आहे.
या सुविधेमुळे सरकारी योजने व्यतरिक्त, एखादा व्यक्ती किंवा संस्था एखाद्याला उपचारासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी मदत करायची असेल तर ते रोख पैशांऐवजी ई-रुपी देऊ शकतील. यामुळे जो व्यक्ती ज्या कामासाठी पैसे मदत करत आहे ते पैसे त्याच कामासाठी वापरले जाईल आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत देखील होईल.
e-RUPI नक्की काय आहे ?
e-RUPI हे आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिलेली एक कॅशलेस प्रणाली आहे. यामध्ये एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारित ई-व्हाऊचर उपलब्ध होईल ज्याचा वावर करून , लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ थेट मोबाईल च्या माध्यमातून पोहोचवला जाईल. त्यासाठी कोणत्याही क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचीही किंवा कॅशची गरज नसेल.
यासाठी नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेचे सहाय्य घेण्यात आले आहे. NPCI च्या यूपीआय प्रणाली मार्फत e-RUPI या सेवेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
त्यासाठी अर्थ विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मदत घेण्यात आली आहे.
e-RUPI सेवेचा मुख्य वापर हा केंद्र सरकारच्या बहुतेक योजनांसाठी केला जाणार आहे. त्यामध्ये आयुष्यमान भारत योजना,इतर आरोग्य विभागाच्या योजना, लाभार्थ्यांना अनुदान देण्याच्या योजना समाविष्ट आहेत .
e-RUPI ची व्हाऊचर सेवा कार्य कसे करेल ?
e-RUPI ची व्हाऊचर सेवा हे बँकाच्या माध्यामातून देण्यात येणार आहे. यासाठी काही बँका सरकार नियुक्त करतील .ज्या लाभार्थ्याला एखादया योजनेचा लाभ सरकारला द्यायचा असेल त्याची ओळख ही मोबाईल क्रमांकावरुन पटवण्यात येईल.
एकदा लाभार्थी व्यक्तीची ओळख पटली की सरकारकडून सर्व्हिस प्रोव्हायडर बँकेला त्या लाभार्थ्याच्या नावाने e-RUPI व्हाऊचर देण्यात येईल. या e-RUPI व्हाऊचरची सेवा केवळ लाभार्थ्याच्या नावे असेल आणि केवळ त्याच्यापर्यंतच पुरवण्यात येणार आहे.त्यामुळे इतर व्यक्ती याचा फायदा घेऊ शकणार नाही.
e-RUPI योजनेचे फायदे
सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे e-RUPI मुळे सरकारी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांला मिळणार असून त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही.
मदर अँड चाईल्ड वेलफेयर स्कीम्स, टीबी निर्मुलन कार्यक्रम, आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, इतर औषधे आणि अन्नधान्य अनुदान योजना अशा अनेक योजनांचा फायदा थेट लाभार्थ्याला मिळेल.
खासगी उद्योग एम्प्लॉई वेलफेयर आणि कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमामध्ये या e-RUPI डिजिटल व्हाऊचरचा वापर करु शकतात .
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा .

Do not enter any spam link in comment box