Type Here to Get Search Results !

भारतातील टॉप 7 ब्लू चिप शेअर | Top 7 Blue Chip stocks to buy in india

 नमस्कार मित्रांनो ,या पोस्टमध्ये आपण टॉप ब्लू चिप स्टॉक -Top BLUE CHIP STOCKS  ची काही  उदाहरणे जाणून घेणार आहोत ,चला तर मग सुरु करूया .

ब्लू चिप स्टॉक म्हणजे काय ?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्लू चिप शेअर्स म्हणजे शेअरबाजारातील दिग्गज आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर होय .

 ज्या कंपन्यांची आर्थिक कामगिरी चांगली आहे ,ज्यांची कामगिरी सातत्यपूर्ण आहे तसेच ज्या कंपन्यांचे  बाजार भांडवल जास्त आहे अशा कंपन्या ब्लू चिप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात .

 अनेक लोक शेअर मार्केट मध्ये नुकसान टाळण्यासाठी ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात.

अधिक माहितीसाठी क्लिक करा >>



आता आपण पाहूया भारतातील टॉप ब्लू चिप कंपन्यांचे शेअर -

रिलायन्स इंडस्ट्रीज लि.- Reliance

रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी आहे. १९६६ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स  कंपनीची स्थापना केली.

  ही कंपनी प्रामुख्याने तेल , पेट्रोलियम व पेट्रोलियमनिर्मित उत्पादने ,रिटेल ,पॉलिमर,पॉलिस्टर,रसायने ,कापड उद्योग यामध्ये कार्यरत आहेत तसेच टेलिकॉम आणि टेक्नॉलॉजी स्पेसमध्ये प्रवेश करून रिलायन्स जिओ च्या माध्यमातून त्याांनी व्यवसायात विविधता आणली आहे. 

कंपनीचे मार्केट कॅपिटल सुमारे 14.27 लाख Cr असून शेअरची चालू किंमत 2000 च्या आसपास आहे.

तेल व पेट्रोलियम व्यवसायात निरंतर गुंतवणूक करत असताना ग्रीन ऊर्जा आणि इतर उद्योगांमध्ये विविधता आणण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस -TCS

आयटी क्षेत्रातील मार्केट कॅपिटल नुसार भारतातील सर्वात मोठी  आणि जगातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिसेस प्रदाता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.  कंपनी आयटी सर्व्हिसेस, कन्सल्टन्सी सर्विसेस , बिझिनेस सोल्यूशन्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आयटी प्रॉडक्ट्स आणि प्लॅटफॉर्म सारख्या सेवांचे विस्तृत श्रेणी  प्रदान करते.

  कंपनीची  आर्थिक कामगिरी जोरदार राहिली आहे, मागील 5 वर्षात सातत्याने TCS कंपनीने चांगला नफा कमावला आहे.
  कंपनीचे मार्केट कॅपिटल 11.71 लाख कोटी ₹ असून सद्याची शेअर किंमत ₹3,168.00 आहे तसेच कंपनीने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड दिलेला आहे.

कंपनीने मागील 1 वर्षात 37% पेक्षा जास्त नफा  आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड - HUL

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ही भारतातील सर्वात  मोठया असलेल्या  Consumer Goods निर्माता  कंपन्यांपैकी एक असून  तिला 80  वर्षांहून अधिक वारसा लाभलेला आहे.

या कंपनीच्या पाच ब्रँडमध्ये वार्षिक उलाढाल प्रत्येकी २,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सात ब्रँडची वार्षिक उलाढाल प्रत्येकी १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.  कंपनी विविध प्रकारच्या उत्पादनांच्या श्रेणीची पूर्तता करते ज्यात खाद्यपदार्थ, शीतपेये, साफसफाईचे उत्पादने,दैनंदिन वापरातील उत्पादने आणि वॉटर प्यूरिफायर समाविष्ट आहेत. 

कंपनीचे मार्केट कॅपिटल 5.53 लाख कोटी ₹ असून सद्याची शेअर किंमत ₹ 2360 आहे.

इन्फोसिस - Infosys

इम्फोसिस ही कंपनी कन्सल्टन्सी, तंत्रज्ञान, आउटसोर्सिंग आणि  आधुनिक डिजिटल सेवा पुरवणारी अग्रणी कंपनी आहे .एन्‌.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांनी पुण्यात १९८१मध्ये इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनीची स्थापना केली .

कंपनीचे मार्केट कॅपिटल 6.77 लाख कोटी ₹ असून सद्याची एका शेअर किंमत 1,596.00 रु आहे तसेच इन्फोसिस कंपनीने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड आणि चांगला नफा देखील दिलेला आहे.

आयटीसी - ITC

ITC  कंपनी ही 1910 मध्ये स्थापन झाली. आयटीसी ही देशातील सर्वात मोठी सिगरेट उत्पादक आणि विक्रेते आहे. ITC चे पाच प्रमुख व्यवसाय  आहेत; सिगरेट्स, एफएमसीजी , हॉटेल्स, पेपरबोर्ड्स, पेपर अँड पॅकेजिंग आणि अ‍ॅग्री बिझिनेस.

कंपनीचे मार्केट कॅपिटल 2.54 लाख कोटी ₹ असून सद्याची एका शेअर किंमत 209 रु आहे.

एशियन पेंट्स - Asian Paints

एशियन पेंट्स कंपनीची सुरुवात 1942 मध्ये केली गेली. एशियन पेंट्स हा भारतातील सर्वात मोठा पेंट उत्पादक आहे जो varnishes, enamels, सरफेसिंग प्रॉडक्ट्स,  सॉल्व्हेंट्स आणि थिनर्स बनविण्याच्या व्यवसायात अग्रेसर आहे.

कंपनी ही 15 हुन अधिक देशांमध्ये कार्यरत असून  जगातील 60  पेक्षा अधिक देशांमध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनीकडे 26 पेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टस आहेत. 

कंपनीचे मार्केट कॅपिटल 2.88 लाख कोटी ₹ असून सद्याची एका शेअर किंमत 3000 रु च्या आसपास आहे तसेच  कंपनीने मागील 1 वर्षात 70% पेक्षा जास्त नफा  आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.

एचडीएफसी बँक - HDFC Bank

एचडीएफसी बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे आणि  भारतीय शेअर बाजारातील  भांडवलाच्या आधारे ही भारतातील  सर्वात मोठी तिसरी कंपनी आहे.

Hdfc बँकेची स्थापना ऑगस्ट इ.स. १९९४ मध्ये झाली तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

Hdfc बँक या कंपनीचे मार्केट कॅपिटल 7.82 लाख कोटी ₹ असून सद्याची एका शेअर किंमत 1,414   रु च्या आसपास आहे तसेच  कंपनीने मागील 1 वर्षात 30% पेक्षा जास्त नफा  आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.

तर या लेखात आपण भारतातील टॉप 7 ब्लू चिप कंपन्यांच्या शेअरची माहिती थोडक्यात जाणून घेतली .आपणास ही माहिती आवडल्यास कंमेंट द्वारे आपण नक्की कळवा.

Disclaimer -

या वेबसाईटवर दिलेली माहिती किंवा शेअर हे केवळ माहिती आणि शिक्षण उद्देशाने वापरली जाणे आवश्यक आहे.  आपल्या स्वत: च्या वैयक्तिक परिस्थितीवर आधारित कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः त्याचे विश्लेषण करणे फार महत्वाचे आहे.

कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारचा सल्ला जरूर घ्यावा.

धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.