जर आपण शेअरमार्केट क्षेत्रात नवीन असाल आणि गुंतवणुकीसाठी कोणते शेअर निवडावे हे समजत नसेल तर खालील गोष्टींचा वापर करून आपण गुंतवणुकीसाठी चांगले शेअर निवडू शकता .लक्षात ठेवा कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअरची माहिती घेणे अनिवार्य असते नाहीतर आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते .
1 - कंपनीचा व्यवसाय काय आहे ?
सगळ्यात पहिले आपल्याला कोणताही शेअर निवडताना कंपनी कोणता व्यवसाय करते ,कंपनीचा व्यवसाय येणाऱ्या काळात कसा असेल याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करा . कंपनीच्या वेबसाईट ला भेट देऊन आपण याविषयी माहिती घेऊ शकता .
2 -मूलभूत आर्थिक बाबी तपासा
- Earnings Per Share (EPS) – जर कंपनीचा EPS गेल्या 5 वर्षांपासून वाढत असेल तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली मानली जाते .
- Price to Earnings Ratio (PE) - प्रतिस्पर्धी आणि उद्योगाच्या सरासरीच्या तुलनेत कमी असावा .
- Price to Book Ratio (PBV) – प्रतिस्पर्धी आणि उद्योगाच्या सरासरीच्या तुलनेत कमी असावा .
- Debt to Equity Ratio – 1 पेक्षा कमी असावे (शक्यतो कर्ज <0.5 किंवा शून्य असावे .)
- Return on Equity (ROE) –15% पेक्षा जास्त असावे (शेवटचे 3 वर्ष सरासरी)
- Price to Sales Ratio (P/S) – कमी असावा .
- Dividend– डिविडेंड देणारया कंपन्या निवडा
3 -कंपनीचे कर्ज तपासा
एखाद्या कंपनीतील मोठी कर्जे बोटीतील मोठ्या छिद्रा प्रमाणेच असतात. जर बोटीतील छिद्र लवकरच भरले गेले नाही तर ते लांब समुद्र पार करण्यास सक्षम होणार नाही आणि त्या दरम्यान नक्कीच बुडेल.
आपण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एखादा स्टॉक निवडण्यापूर्वी कर्जे शोधण्यासाठी त्याची ताळेबंद वाचा. मोठमोठे कर्ज असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. प्रचंड एनपीए असलेल्या बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांना टाळा.
4 -प्रमोटरची शेअर खरेदी आणि शेअर बायबॅक तपासा
कंपनीच्या प्रवर्तकांना कंपनीच्या कामगिरीबद्दल उत्कृष्ट माहिती असते . व्यवस्थापन आणि उच्च अधिकारी यांना कंपनीच्या भविष्यातील पैलू समजावून घेता येतात . भविष्यात कंपनीची कामगिरी चांगली होईल असा त्यांचा विश्वास असल्यास ते शेअर खरेदी आणि शेअर बायबॅक करतात ,हे कंपनीच्या भविष्यावर विश्वास ठेवण्याचे संकेत आहेत आणि अशा शेअरमध्ये आपण इतर आर्थिक बाबी तपासून गुंतवणूक करू शकता .
5 -Face Value - दर्शनी मूल्य
दर्शनी मूल्य हे कंपनीच्या गुंतवणुकीत आपले खरे गुंतवणूक मूल्य आहे .
उदाहरण -जर आपण ABC कंपनीचे १००० रु किमतीचे १०० शेयर १० रु दर्शनी मूल्यदराने खरेदी केले तर आपली कंपनीतील गुंतवणूक हि १००*१०=१००० रु आहे . बाकीचे पैसे हे त्या शेयर चे प्रीमियम आहे .
त्यामुळे शेयर खरेदी करताना प्रत्येक कंपनीचं दर्शनी मूल्य नक्की तपासा .
6 -52 Week High/Low - 52 आठवड्यांचा उच्च / निम्न दर
52 आठवड्यांचा उच्च / निम्न दर हा मागील एक वर्षाच्या दरम्यान शेयर ची उच्च व सर्वात कमी किंमत आहे.
हे तांत्रिक निर्देशक आहे जे आपण नेहमी नवीन शेयर खरेदी करताना तपासावे . त्यामुळे आपल्याला शेयर ची उच्च व सर्वात कमी किंमत समजते .यामध्ये स्टॉकची सरासरी व कमी किंमत मोजणे आवश्यक आहे
52 आठवड्यांचा उच्च / निम्न दर सरासरी =(52 आठवड्यांचा उच्च + (52 आठवड्यांचा निम्न दर) / २
.जर 52 आठवड्यांचा उच्च / निम्न दर सरासरी ,वर्तमान बाजारभावापेक्षा कमी असेल
तर या स्टॉककडे दुर्लक्ष करा. कारण चांगली कंपनीची शेयर किंमत एका वर्षात 50% पेक्षा कमी होत नाही .(काही अपवाद वगळता जसे कि आपत्कालीन स्तिथी )
7 - प्रमोटर होल्डिंग
प्रमोटर हे कंपनीच्या अंतर्गत आहेत. त्यांच्याकडे कंपनीबद्दल सर्वोत्तम ज्ञान आहे.त्यामुळे प्रमोटर होल्डिंग तपासणे हे शेयर खरेदी करताना नेहमी गरजेचे आहे.
जर, प्रमोटर आपली भागीदारी वाढवत असेल तर हे सकारात्मक चिन्ह म्हणून घेतले जाऊ शकते.जर प्रमोटर कंपनीबद्दल आशावादी आहेत आणि त्यांची मालकी वाढविल्यास, याचा अर्थ ते कंपनीच्या वाढीबद्दल आत्मविश्वास बाळगतात कारण त्यांना कंपनीची उत्कृष्ट माहिती आहे.
दुसऱया बाजूला जर प्रमोटर आपल्या शेअरची संख्या विकत असेल तर ती नेहमी नकारात्मक चिन्ह म्हणून समजावे .कधीकधी , प्रमोटर नवीन उपक्रम किंवा नवीन कंपनीसाठी योजना आखत असतात आपण ते नेहमी तपासावे .
8 - Base Price- बेस प्राईज
बेस प्राईज म्हणजे शेअरच्या मागील तीन वर्षांची सरासरी किंमत.
बेस प्राईज गणना करण्यासाठी सूत्र
बेस प्राईज =शेअरची गेल्या तीन वर्षांची सरासरी किंमत / 3
शेअरच्या आधारभूत किंमतीपेक्षा 20% जास्त किंवा त्यापेक्षा २० % कमी किमतीचे शेयर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा
बेस प्राईजवरून तुम्हाला माहित असेल की गेल्या तीन वर्षांत शेअर्सची किंमत किती आहे आणि सध्याची किंमत किती आहे.
जर मूलभूत किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा फार वेगळी असेल तर आपण त्यावरील अधिक माहिती गोळा करू शकता आणि नंतर शेअर विकत घेऊ शकता.
9 - Block Deal - ब्लॉक डील
व्याख्याः किमान पाच लाखांच्या शेअर्सची खरेदी किंवा विक्री, किंवा 5 कोटी रुपयांच्या किमान मूल्याचा हा एकरकमी व्यवहार आहे. हा व्यवहार एका स्वतंत्र ट्रेडिंग विंडोद्वारे होतो.
जर गेल्या काही दिवसात एखाद्या कंपनीच्या शेयर मध्ये ब्लॉक डील झाली असेल तर त्या कंपनीचे शेयर खरेदी करण्यापूर्वी नक्की विचार करावा
धन्यवाद ..
Disclaimer: -
This is not an advisory service to buy or sell. The contents of “this research report”
are only for educational purposes. No liability is accepted for any content in
“this research report.”
The author is neither a registered stockbroker nor a registered advisor and does not give investment advice.

Do not enter any spam link in comment box