Type Here to Get Search Results !

भारतीय उद्योगविश्वाचा प्राण - टाटा ग्रुप | Top facts about Tata group

 टाटा हे नाव भारतीय उद्योगास समानार्थी नाव आहे.पिढ्यानपिढ्या भारतीयांना ओळखले जाणारे नाव म्हणजेच टाटा . एक नाव जे साहस , यश, उत्कृष्टता, नीतिशास्त्र, नवीनता , अखंडता, चिकाटी , कार्यक्षमता, सुधारणा , जबाबदारी, संघर्ष आणि यश यासाठी जगप्रसिद्ध आहे. 

 अगदी मीठ निर्मितीपासून ते सॉफ्टवेअर, कार, दळणवळण, परफ्यूम, कीटकनाशके, चहा, ट्रक, गृहनिर्माण,ट्रॅव्हल, स्टील आणि सोन्यासाठी ओळखले जाणारे असे नाव जे प्रत्येक भारतीय व्यक्तीला अभिमानास्पद आहे.



 खाली टाटा समूहाविषयी काही आश्चर्यकारक तथ्ये आहेत.

1868 मध्ये स्थापन झालेली आणि सहा खंड व 150 हून अधिक देशांमध्ये उत्पादने आणि सेवा पुरवणारी तसेच 100 देशांमध्ये कार्यरत असनारा टाटा हा भारताचा  सर्वात मोठा समूह आहे.

टाटा समूहाचे संस्थापक असणाऱ्या जमशेदजी टाटा यांना  ‘भारतीय उद्योगाचे जनक’ म्हणून संबोधले जाते.

टाटा समूहाकडे 100 हून अधिक ऑपरेटिंग कंपन्या आहेत त्यापैकी 29 कंपन्या  ह्या सार्वजनिकरित्या सूचीबद्ध आहेत.

सुमारे 700,000+ कर्मचारी असणारा टाटा समूह, हे भारतीय रेल्वे आणि संरक्षण दलानंतर भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे रोजगार पुरवणारे उद्योजक  आहे.

टाटा समूह हा भारताच्या GDP मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.2018 मध्ये टाटा ग्रुप ने देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 4 टक्के योगदान दिले आणि भारतातील एकूण कराच्या 2.24 टक्के कर भरला.

टाटा यांची सामाजिक बांधिलकीतील वचनबद्धतेचा एक महत्त्वाचा  घटक म्हणजे कर्मचारी स्वयंसेवा, टाटा एंगेज या नावाने  टाटा समुह कर्मचारी स्वयंसेवा कार्यरत आहेत.   

1945 मध्ये, जेव्हा पाश्चिमात्य देशांतही  व्यवस्थापन पूर्णपणे विकसित झाले नव्हते, तेव्हा टाटा उद्योगांनी टाटा इंडस्ट्रीजची स्थापना केली - ही भारतीय उद्योगातील पहिली तांत्रिक रचना आहे.

1980 च्या उत्तरार्धात, जेव्हा भारतात वीज नव्हती, एम्प्रेस मिल्स - टाटाज ’फ्लॅगशिप टेक्सटाईल कंपनी आपल्या कर्मचार्‍यांचे व यंत्रणेचे आरोग्य रक्षण करण्यासाठी ह्युमिडिफाईंग सिस्टम बसवून आणि धूळ काढण्याचे यंत्र स्थापित करून आपल्या कारखान्यांमध्ये निरोगी कामाचे वातावरण उपलब्ध करून देत होती;  भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि अपघात नुकसान भरपाईच्या योजनांसह सुविधा उपलब्ध केल्या होत्या.

सर दोराबजी टाटा (टाटा सन्सचे दुसरे अध्यक्ष आणि जमसेदजी टाटा यांचे पुत्र) यांनी 1910 मध्ये टाटा हायड्रो इलेक्ट्रिक कंपनी (आता टाटा पॉवर) च्या अंतर्गत 'हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती'मार्फत मुंबईला स्वस्त आणि स्वच्छ उर्जा पुरविली होती. 

1952 मध्ये टाटा यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यालयाच्या विनंतीवरून परिणामस्वरूप सौंदर्यप्रसाधनांचा Lakme ब्रँड सुरू केला.

1981 मध्ये टाटा केमिकल्स कर्मचार्‍यांना शेअर  उपलब्ध करुन देणारी भारतातील पहिल्या कंपन्यांपैकी एक बनली.

भारताच्या आर्थिक उदारीकरणा नंतर  25 वर्षात टाटा कंपन्यांनी रिलायन्स आणि आदित्य बिर्ला यासारख्या मोठ्या समूहांपेक्षा आणि सीमेंस, मित्सुबिशी, जीई आणि बर्कशायर हॅथवे यासारख्या विदेशी उदयोगपेक्षा आपल्या भागधारकांसाठी अधिक संपत्ती निर्माण केली आहे.

TCS, टाटा केमिकल, टाटा पॉवर,टाटा कंमुनिकेशन, व्होल्टास, टायटन, इंडियन हॉटेल कंपनी, टाटा मोटर्स,टाटा ग्लोबल बेवरजे,नेलको इंडिया या टाटा समूहातील प्रमुख कंपन्या आहेत.

टाटा ग्रुप हा भारतीय लोकांसाठी एक आदर्श आहे .रतनजी टाटा हे आपल्यासाठी आदर्श व्यक्तीमत्व असून टाटा उद्योग समूहाची परंपरा ते अखंड चालवत आहेत.

धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.