जेव्हा वाहतुकीचा विचार केला जातो तेव्हा नवनवीन तंत्रज्ञान जगभरात उदयास येत आहेत. पारंपारिक इंधन जसे की पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती वाढतच आहेत ,तसेच या इंधनाचे साठे मर्यादित असून प्रदूषण देखील मोठया प्रमाणात होत आहे.
यापासून सुटका करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे.परंतु अपुऱ्या साधनांमुळे इलेक्ट्रिक वाहन उदयोग मोठ्या प्रमाणात वाहने निर्माण करू शकत नव्हता.आता मात्र भारत सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असून येत्या 5 - 10 वर्षात इलेक्ट्रिक वाहन उद्योग पूर्णपणे बदलून जाइल असे तज्ज्ञांचे मत आहे.
त्यामुळेच शेअर मार्केट गुंतवणूकदार म्हणून कोणकोणते शेअर आहे ज्यांना इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा मोठा फायदा भविष्यात होईल आणि ते शेअर आपल्याला नफा मिळवून देतील ,त्या शेअरची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत,चला तर मग सुरू करूया.
इलेक्ट्रिक वाहन निर्मिती मधून कोणत्या उद्योगांना फायदा होईल
साहजिकच जे वाहन निर्मिती करणारे उद्योग आहेत जसे की टाटा,मारुती ,महिंद्रा तसेच त्यांना स्पेअर पार्ट पुरवठा करणारे कारखाने यांना याचा फायदा होणार आहे.तसेच बॅटरी बनवणारे उद्योग आणि बॅटरी साठी लागणारे केमिकल बनवणारे कारखाने इत्यादी उद्योगांना इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा फायदा प्रामुख्याने होणार आहे.त्याचप्रमाणे एनोड उत्पादक,उर्जा कंपन्या,सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांना इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा फायदा होईल.
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा फायदा होणारे शेअर
जे स्टॉक या ठिकाणी सांगण्यात येणार आहे ते दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी असणार आहेत ,कारण इलेक्ट्रिक वाहन ही भविष्यातील एक महत्वाची योजना असून त्यासाठी काही वेळ लागणार आहे.येत्या 5 ते 10 वर्षात इलेक्ट्रिक वाहन उद्योग हे चांगली भरारी घेतली असे अनुमान आहे.
Disclaimer -
कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागार यांचा सल्ला जरूर घ्या आणि मगच गुंतवणूक करा.
टाटा मोटर्सकडे सध्या टिगोर ईव्ही, नॅनो ईव्ही आणि टियागो इलेक्ट्रिक या तीन इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत .
कार व्यतिरिक्त, टाटा मोटर्स भारतातील काही प्रमुख विद्युत युटिलिटी वाहने, बस, ट्रक आणि संरक्षण वाहने देखील तयार करतात.
1 - Tata Motors - टाटा मोटर्स
भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती मध्ये आघाडी घेतली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या - नेक्सन ईव्हीच्या गाडीचा मोलाचा वाटा आहे. टाटा मोटर्स अत्याधुनिक ZIPTRON तंत्रज्ञानासह अद्ययावत असून जे गाडी ड्राइविंग करताना बॅटरी चार्ज करण्यासाठी स्मार्ट रीजनरेटिव्ह ब्रेकिंगचा वापर करतात.टाटा मोटर्सकडे सध्या टिगोर ईव्ही, नॅनो ईव्ही आणि टियागो इलेक्ट्रिक या तीन इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत .
कार व्यतिरिक्त, टाटा मोटर्स भारतातील काही प्रमुख विद्युत युटिलिटी वाहने, बस, ट्रक आणि संरक्षण वाहने देखील तयार करतात.
2 - Tata Power - टाटा पॉवर
टाटा पॉवर ही कंपनी टाटा ग्रुपचा एक भाग आहे जी वीज निर्मिती आणि वितरणात अग्रेसर आहे. हे 10,875 मेगावॅट वीज निर्मिती करते, त्यातील 32% शुद्ध उर्जा स्त्रोतांमधून तयार होते.कंपनीचे लक्ष्य 2030 पर्यंत भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन प्रदाता होण्याचे आहे.
कंपनीने त्यांच्या आवारात ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम सारख्या पेट्रोल पंपांवर सामंजस्य करार केला आहे.
3 - Maruti Suzuki - मारुती सुझुकी
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक, मारुती सुझुकीचे विस्तीर्ण वितरण नेटवर्क आहे . भारतीय ग्राहकांचा सर्वात विश्वासार्ह असल्याने स्वतःची इलेक्ट्रिक वाहने सुरू केली की, त्यांच्या शेअरचे भाव गगनाला भिडतील यात काय नवल नाही.लवकरच कंपनी आपली मारुती सुझुकी वॅगनआरची इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणणार आहे.
4 - Mahindra and Mahindra - महिंद्रा अँड महिंद्रा
२००० च्या दशकाच्या सुरूवातीला महिंद्रा रेवा ही कार बनवून महिंद्राने भारतातील विद्युत क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. बंगलोरमध्ये ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याने महिंद्रा इलेक्ट्रिकने प्रवासी आणि मालवाहू अशा अनेक ईव्ही मध्ये एक अग्रगण्य नाव आहे.इलेक्ट्रिक मोटारींव्यतिरिक्त महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने २०२१ च्या मध्यापर्यंत इलेक्ट्रिक वाहन बॅटरी क्षेत्रामध्ये आपल्या आर अँड डीचा विस्तार करणे केला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीचे स्टॉक आता गुंतवणूकीसाठी एक उत्तम पर्याय असू शकतात.
5 - Hero Motorcorp - हिरो मोटोरकॉर्प
हीरो मोटोकॉर्प लिमिटेड, पूर्वीची हिरो होंडा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय मोटारसायकल आणि स्कूटर निर्माता आहे. ही कंपनी जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक आहे, तसेच भारतात दुचाकी उद्योगात 37.1 % इतका वाटा आहे.6 - EXIDE INDUSTRIES - एक्साईड इंडस्ट्रीज
एक्साईड हा ऑटोमोबाईल बॅटरीचे अग्रगण्य निर्माता आहे,ज्याचा 73% ऑटोमोबाईल बॅटरी आणि 26%औद्योगिक बॅटरी विभागात मार्केट शेअर आहे. भारतातील बॅटरी विभागातील सर्वात विश्वासार्ह आणि नामांकित ब्रँड असल्याने लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीकडे वळल्यास एक्साइड , बॅटरी विभागात प्रमुख कंपनी होण्याची अपेक्षा आहे.7 - AMARA RAJA BATTERIES - अमारा राजा बॅटरी
बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा मुख्य घटक असल्याने, बॅटरी उत्पादक कंपन्या भारतातील इलेक्ट्रिक वाहन बॅटरी उत्पादक कंपन्यांचे शेअर अव्वल स्टॉक पिक्स मानली जाऊ शकतात. बॅटरी नियमित अंतराने बदलल्या जाणार म्हणजे ईव्ही बॅटरीच्या विक्रीत सातत्य असणार आहे त्याचा कंपनीला फायदा होईल.भारतातील दुसर्या क्रमांकाची बॅटरी उत्पादक कंपनी म्हणून अमारा राजा बॅटरीज लवकरच लिथियम-आयन बॅटरी उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे.
8 - HINDALCO INDUSTRIES - हिंदालको
हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतीय एल्युमिनियम व तांबे उत्पादन करणारी कंपनी प्रमुख कंपनी आहे, आदित्य बिर्ला समूहाची ती उपकंपनी आहे. त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे आहे.9 - Graphite India - ग्राफइत इंडिया
बॅटरीमध्ये ग्रेफाइट हा प्रमुख घटक आहे, जेव्हा एकदा ईव्ही गाड्यांची निर्मिती वाढेल त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असेल. ग्रॅफाइट इंडियाचा वाटा येणाऱ्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे.10 - Tata Chemicals - टाटा केमिकल
टाटा केमिकल्स लिमिटेड ही एक भारतीय ग्लोबल कंपनी आहे जी केमिकल, पीक संरक्षण आणि खास रसायनशास्त्र उत्पादनांमध्ये आघाडीवर आहे ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही कंपनी भारत, युरोप, उत्तर अमेरिका आणि आफ्रिका या देशांमध्ये कार्यरत असलेल्या सर्वात मोठ्या रासायनिक कंपन्यांपैकी एक आहे. टाटा केमिकल्स टाटा समूहाची एक कंपनी आहे.इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी लागणारी बॅटरी बनवण्यासाठी टाटा केमिकल या कंपनीला मोठा फायदा होईल असे अनुमान आहे .
11 - Ashok Leyland - अशोक लेलँड
फ्लॅश-चार्ज तंत्रज्ञानासह इलेक्ट्रिक बसचा पहिला निर्माता, अशोक लेलँड हे इलेक्ट्रिक बस, ट्रक आणि संरक्षण वाहनांचे उत्पादन करणारे भारतातील आघाडीचे उत्पादक आहेत.धन्यवाद !!!!!

Do not enter any spam link in comment box