आज बहुतेक प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल उपलब्ध आहे.तसेच सरकारी कामे सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होत आहेत.अशातच आपणास जर आपली महत्वाची कामे घरबसल्या ऑनलाईन करायची असेल तर खाली महत्वाच्या सुविधांचे मोबाइल अँप ची माहिती दिलेली आहे .
1 - For women’s safety 112 अँप
अँपचा उद्देश - महिलांच्या सुरक्षिततेसाठी
मुख्यतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे अँप तयार केले आहे, या अॅपद्वारे कोणीही फक्त एक बटण दाबून किंवा तीन वेळा पॉवर बटण दाबून राज्य आपत्कालीन विभागाला सूचना देऊ शकतो.
2- भारत के वीर: Bharat Ke Veer
अँपचा उद्देश - केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या सैनिकांच्या कुटूंबाला हातभार लावण्यासाठी
या मोबाइल अँपच्या माध्यमातून , कर्तव्य बजावत असताना आपले प्राण देणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहू शकतात आणि कुटुंबातील माणसाना आर्थिक सहाय्य करू शकतात.
3- डिजीलोकर: DigiLocker
अँपचा उद्देश - महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या डिजिटल प्रती सुरक्षितपणे ठेवण्यासाठी
या अॅपवर ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड ,आधारकार्ड मार्क शीट यासारख्या कागदपत्रांच्या डिजिटल प्रती लोक जतन करू शकतात.
4 - एमपरिवाहन: mParivahan
अँपचा उद्देश - वाहन चालविण्याचा परवाना लायसन्स आणि वाहनाशी संबंधित माहितीसाठी
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासह इतर गोष्टींच्या प्रती तयार करण्यासाठी हे अँप उपयोगी आहे. कोणत्याही रहदारी नियमांचे उल्लंघन झाल्यास आपण वाहतूक पोलिसांकडून 'पकडले गेले' असल्यास हे अँप उपयोगी पडू शकते.
5 - एमपासपोर्ट: mPassport Seva
अँपचा उद्देश - पासपोर्टशी संबंधित माहितीसाठी
या अॅपवर पासपोर्टशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. वापरकर्ते पासपोर्ट अर्जाची स्थिती शोधू शकतात आणि जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र देखील शोधू शकतात .
6 - उमंग UMANG (Unified Mobile Application for New-age Governance)
हे अँप आपल्यला एकाच व्यासपीठावर विविध सरकारी विभाग आणि त्यांच्या सेवा एकत्र आणते.यामध्ये केंद्रीय सरकारी योजना तसेच विविध राज्य सरकारच्या योजनांची माहिती असते.
7 - MAadhaar - आधार
अँपचा उद्देश - आधार कार्ड सेवा ऑनलाईन पुरवणे
आधार कार्ड च्या सर्व सेवा एकाच अँप मध्ये आहेत.
8 - Indian Police on Call
अँपचा उद्देश - पोलीस स्टेशन शोधणे
जवळचे पोलिस स्टेशन शोधण्यासाठी हे अँप उपलब्ध आहे. यात जिल्हा नियंत्रण कक्षांची संख्या आणि स्थानिक पोलिसांशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील आहेत.
9 - ग्राहक अँप: Consumer App
अँपचा उद्देश - ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी
हे अँप हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, ग्राहक संबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी आणि 60 दिवसांच्या आत तक्रार निराकरण करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
10 - महावितरण - Mahavitaran
अँपचा उद्देश - ऑनलाईन वीज बिल पाहणे आणि भरणे
11 - आयकर सेतु: Aaykar Setu
अँपचा उद्देश - आयकर आणि पॅनकार्डसाठी
आयकर विभागाच्या अॅपवर पॅनसाठी अर्ज करणे, इतर गोष्टींबरोबरच कर भरणा करू शकतो.
12 - ePathshala - पाठशाला
हे अँप शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे ज्यातून आपण मोबाइल डिव्हाइस आणि डेस्कटॉपवर ई-पुस्तके मिळवू शकतो.
13 - भीम: BHIM
अँपचा उद्देश -ऑनलाईन UPI पेमेंट तसेच आर्थिक व्यवहारासाठी
डिजिटल व्यवहार करण्यासाठी हे लोकप्रिय अँप आहे. हे युनिफाइड पेमेंट इंटरफेस-आधारित अँप असून इतर गोष्टींबरोबर पैसे पाठविण्यात / प्राप्त करण्यात मदत करते.
14 - आयआरसीटीसी: IRCTC RAIL CONNECT
अँपचा उद्देश -भारतीय रेल्वे अँप बुकिंग
रेल्वे तिकिट बुकिंगपासून ते विमान तिकिट बुकिंग पर्यंत, आयआरसीटीसी अँप सर्व प्रवासाशी संबंधित गरजांसाठी महत्त्वाचे अँप आहे.
15 - मतदार हेल्पलाईन: Voter Helpline
अँपचा उद्देश - मतदारांसाठी ऑनलाईन सुविधा पुरवणे
भारतीय निवडणूक आयोगाने बनवलेले हे अॅप मतदारांसाठी सर्व सेवा एकत्रित देणारे अँप आहे. नवीन मतदार ओळखपत्रांसाठी फॉर्म सबमिट करता येतो, मतदार यादीतील नावांचा शोध घेता येतो.
16 - अविश्वसनीय भारत: Incredible India
अँपचा उद्देश - पर्यटनाच्या माहितीसाठी
या अॅपवर भारतीय पर्यटनाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे.
17 - किसान सुविधा: Kisan Suvidha
अँपचा उद्देश - शेतीविषयक माहितीसाठी
हा अॅप ज्या शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान माहिती आणि इतर तपशीलांसारखी माहिती देते .
18 - MyGov: माझे सरकार
अँपचा उद्देश - भारत सरकारच्या कामात अभिप्राय, सरकारला सूचना आणि कल्पना देने
या अॅपचा उपयोग सरकारला त्याच्या विविध योजनांविषयी अभिप्राय आणि सूचना देण्यासाठी वापरता येतो
धन्यवाद !!!!

Do not enter any spam link in comment box