शेअर मार्केट हे पैसे कमावण्याचे एक चांगले साधन आहे .यामध्ये आपण कमी कालावधीत जास्त पैसे कमावू शकतो अर्थात आपण यासाठी शेअर मार्केट मधील बारकावे शिकणे गरजेचे असते.
जर आपण नवीन असाल तर सुरुवातीला आपणासमोर एक महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे ,आपण कंपन्यांचे शेअर खरेदी-विक्री कशी करू शकतो, तर या लेखात आपण शेअरची खरेदी आणि विक्री कशी करायची हे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया.
सर्वात पहिले शेअर खरेदी करण्यासाठी आपले एक डिमॅट आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे.डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट शिवाय आपण शेअरची खरेदी आणि विक्री करू शकत नाही.
आपणास जर शेअरमार्केट मध्ये शेअरची खरेदी - विक्री करायची असेल तर भारतातील सर्वोत्तम ब्रोकर Zerodha मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते अगदी कमी वेळेत आणि घरबसल्या सहजतेने काढू शकता,त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Zerodha च्या kite अँप डेमो साठी खालील विडिओ पाहा.
अकाउंट उघडल्यावर आपण झिरोधाच्या वेबसाईटवर किंवा अँपवर जाऊन शेअरची खरेदी विक्री करू शकतो.एकदा की आपण आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले की आपणास एक Login ID आणि पासवर्ड दिला जाईल.तो वापरून आपण Zerodha च्या Kite या अँप वर लॉगिन करू शकता.
एकदा आपण लॉगिन केल्यावर खालील प्रमाणे विंडो आपल्याला दिसेल.यामध्ये search बटनावर जाऊन आपण आपल्याला जो शेअर खरेदी करायचा आहे तो add करू शकतो.त्यासाठी शेअर चे नाव type करून + या बटनावर क्लिक करायचे आहे.
यानंतर जो शेअर आपल्याला खरेदी करायचा आहे त्यावर क्लिक करायचे आहे.क्लिक केल्यावर खालील विंडो दिसेल यामध्ये आपल्याला BUY या बटनावर क्लिक करायचे आहे.
येथे आपल्याला शेअर संबंधित अनेक गोष्टी दिसत आहे. आपल्याला या ठिकाणी खालील गोष्टी टाकायच्या आहेत.
Quantity - या ठिकाणी आपणास जितके शेअर खरेदी करायचे आहे तेवढी शेअर संख्या Quantity या section मध्ये टाकायची आहे.आणि SWIPE TO BUY हे बटण उजवीकडे न्यायचे आहे.यानंतर आपली ऑर्डर पूर्ण होईल जी आपण ऑर्डर या section मध्ये जाऊन पाहू शकता.
तसेच वेगवेगळ्या ऑर्डर type आपण खाली पाहू शकता.याविषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर आपल्याला BUY हे बटण उजवीकडे न्यायचे आहे म्हणजेच Swipeकरायचे आहे.
याठिकाणी आपण पाहू शकता आपली ऑर्डर ही पूर्ण झालेली आहे.दोन दिवसानंतर हे शेअर आपल्या डिमॅट खात्यात जमा होतात. यानंतर जसा शेअर वाढेल तसा आपल्याला नफा होत असतो.
नफा झाल्यानंतर आपणास शेअर विकायचा असेल तर आपल्याला Portfolio मधील Holdings या बटनावर क्लिक करायचे आहे.याठिकाणी आपल्यला जे शेअर आपण होल्ड केले असतील म्हणजेच दोन दिवसापेक्षा जास्त काळ ठेवले असतील असे शेअर दिसतील. यापैकी जो शेअर आपल्याला विकायचा आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
याठिकाणी Add आणि Exit हे दोन बटण दिसतील त्यापैकी आपणास Exit या बटनावर क्लिक करायचे आहे.
येथे आपणास जितके शेअर विकायचे आहे तेवढे शेअर संख्या Quantity या section मध्ये टाकायची आहे.आणि SWIPE TO SELL हे बटण उजवीकडे न्यायचे आहे.येथे आपली ऑर्डर पूर्ण होईल जी आपण ऑर्डर या section मध्ये जाऊन पाहू शकता.
शेअर विक्री झाल्यावर दोन दिवसात शेअर विक्रीमध्ये मिळालेले पैसे आपल्या डिमॅट खात्यातून बँक खात्यात जमा करू शकतो.
तर मित्रांनो आपण या लेखात Zerodha मध्ये शेअरची खरेदी विक्री कशी करायची हे जाणून घेतले.आपणास काही विचारायचे असेल तर कंमेंट करू शकता.
धन्यवाद.😊











Do not enter any spam link in comment box