Type Here to Get Search Results !

ICICI बँक FD क्रेडिट कार्ड काय आहे ? मिळवा झिरो सिबील स्कोअर आणि इनकम प्रूफ शिवाय क्रेडिट कार्ड

 क्रेडिट कार्ड (Credit Card )विषयी आपण अनेकदा ऐकले असेल ,अनेक लोकांची क्रेडिट कार्ड घेण्याची इच्छा असते परंतु कमी सॅलरी किंवा कमी सिबील स्कोअर मुळे क्रेडिट कार्ड मिळत नाही.तर अशा लोकांसाठी ICICI बँक कडून एक नवीन संधी आहे ज्यामध्ये सिबील स्कोअर आणि इनकम प्रूफ शिवाय आपल्याला फिक्स डिपॉसीट वर म्हणजेच FD वर क्रेडिट कार्ड मिळू शकते ,तर या लेखात FD वर मिळणाऱ्या क्रेडिट  कार्ड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत,चला तर मग सुरू करूया.



ICICI Bank FD क्रेडिट कार्ड काय आहे ?

जसे इतर क्रेडिट कार्ड आपल्याला आर्थिक सेवा प्रदान करते तसेच कार्य FD कार्ड चे सुद्धा आहे फक्त हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला FD करणे अनिवार्य असते.महत्त्वाचे म्हणजे यासाठी आपल्याला कुठल्याही इनकम प्रूफ किंवा सिबील स्कोअर ची  गरज नसते.

ICICI बँक आपल्याला एफडी कार्ड हे आपल्या मुदत ठेवींवर (एफडी)  त्वरित क्रेडिट कार्ड प्रदान करते. तुमच्या गरजेनुसार तीन प्रकारांमधून क्रेडिट कार्ड निवडू शकता.  आपण आयसीआयसीआय बँक इंटरनेट बँकिंग किंवा आयमोबाईल अ‍ॅपवर लॉग इन करून ऑनलाईन एफडी कार्ड उघडू शकता.

 एफडी वर क्रेडिट कार्ड काढण्यासाठी किमान 6 महिन्यांच्या कालावधीसह कमीतकमी 10,000 रुपयांची FD असणे आवश्यक आहे.

 एफडी कार्ड केवळ ऑटो नूतनीकरण मोडमध्ये उघडले जाते म्हणजेच समजा आपण एक वर्षासाठी एफडी केली असेल तर एक  वर्षानंतर ती पुन्हा renew केली जाईल.जर आपणास एफडी renew करायची नसेल तर आपले क्रेडिट कार्ड सुद्धा बंद होईल.

 एफडी एक  पारंपारिक एफडी म्हणून उघडता येते.

FD कार्डसाठी पात्रता निकष

 एफडी कार्ड साठी  काही खास निकष नाही, फक्त आपण निवासी भारतीय असावे .

आपण एक एफडी खातेधारक असावे.आपण कुठल्याही इनकम प्रूफ किंवा सिबील स्कोअर शिवाय हे कार्ड मिळवू शकता.

ICICI बँक उपलब्ध क्रेडिट कार्ड चे प्रकार 

 आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहकांना त्यांच्या मुदत ठेवीवर  विनामूल्य इन्स्टंट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड मिळू शकते.

 त्याचप्रमाणे मुदत ठेवीवर आयसीआयसीआय बँक कोरल क्रेडिट ,आयसीआयसीआय बँक रुबीएक्स क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे.

आपणास क्रेडिट कार्ड आणि त्यासाठी किती रुपये FD आवश्यक आहे हे खाली दिले आहे.


क्रेडिट कार्ड एफडी रक्कम
आयसीआयसीआय बँक इन्स्टंट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड ₹10000
आयसीआयसीआय बँक कोरल क्रेडिट कार्ड ₹30000
आयसीआयसीआय बँक रुबीएक्स क्रेडिट कार्ड

₹75000


एफडी  कालावधी

एफडी कार्ड हे कमीतकमी 6 महिन्यांच्या कालावधीसह उघडलेल्या एफडीवर उपलब्ध असेल.आपण आपल्या गरजेनुसार FD चा कालावधी सिलेक्ट करू शकता.जसे की 2 वर्ष,3 वर्ष 5 वर्ष इत्यादी.तसेच आपली FD ही कालावधी पूर्ण झाल्यावर renew सुद्धा होत असते.

FD क्रेडिट कार्डसाठी अर्ज कुठे करावा

आयसीआयसीआय बँक इन्स्टंट प्लॅटिनम क्रेडिट कार्डसाठी खाली क्लिक करा

प्लॅटिनम क्रेडिट कार्ड


आयसीआयसीआय बँक कोरल क्रेडिट कार्डसाठी खाली क्लिक करा

कोरल क्रेडिट कार्ड

आयसीआयसीआय बँक रुबीएक्स क्रेडिट कार्डसाठी खाली क्लिक करा

रुबीएक्स क्रेडिट कार्ड

ICICI बँक FD क्रेडिट कार्ड विषयी FAQ

FD कार्ड काय आहे ?

FD कार्ड हे एक क्रेडिट कार्ड आहे जे आपणास आपण केलेल्या FD वर मिळते.

FD रकमेच्या किती रक्कम लिमिट क्रेडिट कार्ड वर मिळेल?

आयसीआयसीआय बँक FD केलेल्या रकमेच्या 90% रक्कम लिमिट क्रेडिट कार्ड वर मिळेल.

FD कार्ड चे फायदे काय आहेत ?

आपल्याला income proof आणि cibil score शिवाय क्रेडिट कार्ड मिळते.
इन्स्टंट FD क्रेडिट कार्ड हे आपला क्रेडिट score तयार / सुधारित करण्यास मदत करते.

FD कार्ड साठी पात्रता काय आहे ?
एफडी रक्कम १०,०००₹ किंवा त्याहून अधिक किंमतीची  आणि कमीत कमी सहा महिने कालावधी  असावी.

एफडी ऑटो नूतनीकरण मोडमध्ये असावी.

FD वर व्याज किती प्रमाणात असेल ?
आयसीआयसीआय बँक एफडी कार्डवरील व्याज दर हा इतर एफडीवर दिलेला दर आहे तोच दर असेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.