शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी ही आपण दोन प्रकारे करू शकतो. एक म्हणजे इन्ट्राडे ट्रेडिंग आणि दुसरा प्रकार म्हणजे डिलिव्हरी ट्रेडिंग ,तर या लेखामध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग आणि इन्ट्राडे ट्रेडिंग काय आहे आणि यामध्ये मुख्य काय फरक आहेत हे जाणुन घेणार आहोत,चला तर मग सुरु करूया.
इन्ट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ?
इन्ट्राडे ट्रेडिंग म्हणजेच एकाच दिवसात शेअरची खरेदी आणि विक्री करणे होय. सकाळी 9:15 वाजता मार्केट चालू झाल्यावर आपण इन्ट्राडे ट्रेडिंग च्या माध्यमातून शेअर खरेदी करू शकतो आणि दुपारी 3:30 वाजण्याच्या आत त्याच दिवशी आपल्याला तो शेअर विकणे बंधनकारक असते.जर आपण तो शेअर विकला नाही तर सध्या असलेल्या किंमतीवर तो शेअर आपोआप विकला जातो.
इन्ट्राडे ट्रेडिंग करणारे लोक एक टार्गेट सेट करतात आणि शेअर खरेदी करतात म्हणजेच जर ते टार्गेट किमतीला शेअर पोहचला तर शेअरची लगेच विक्री करतात .जर शेअर टार्गेट किमतीला पोहचेल असे जर वाटत नसेल तर त्यापेक्षा कमी किमतीत सुद्धा शेअरची विक्री केली जाते.
इन्ट्राडे ट्रेडिंग करताना शेअरविषयी चांगली माहिती असणे खूप गरजेचे असते कारण माहिती नसताना जर आपण इन्ट्राडे ट्रेडिंग केले तर ते नुकसान दायक ठरू शकते.
इन्ट्राडे ट्रेडिंगचे फायदे
कमी भांडवल
इंट्राडे ट्रेडिंग करताना बर्याचदा ट्रेडर मार्जिन फंड वापरतात.मार्जिन म्हणजेच कमी किमतीमध्ये जास्त शेअर खरेदी करणारी सुविधा असते.अशाप्रकारे, फक्त थोडीशी रक्कम देऊन जास्त शेअरची खरेदी आपण इन्ट्राडे ट्रेडिंग मार्फत करू शकतो.
कमी ब्रोकरेज
इन्ट्राडे ट्रेडिंग साठी ब्रोकर कमी शुल्क आकारतात त्याचा फायदा इन्ट्राडे ट्रेडिंग मध्ये होतो.
इन्ट्राडे ट्रेडिंग हे एकाच दिवसात पूर्ण होत असते त्यामुळे आपणास होणारा नफा लगेच आपल्याला मिळत असतो.
तसेच मार्केटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नसते संध्याकाळी एखादी खराब बातमी आली तर दुसऱ्या दिवशी मार्केट पडत असते.अशा गोष्टीचा धोका इन्ट्राडे मध्ये कमी असतो.
इन्ट्राडे ट्रेडिंग चे काही तोटे
तोटा होऊ शकतो
इन्ट्राडे ट्रेडिंग चा कालावधी हा फक्त एकच दिवसाचा असतो, त्यामुळे जर काही कारणांमुळे आपण केलेल्या ट्रेडच्या विरुद्ध दिशेने मार्केट गेले तर आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते.तसेच अनुभव नसल्याने सुद्धा बाजारात नवीन असलेले लोक आपला घामाचा पैसा गमावून बसतात.
इन्ट्राडे ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी मार्केट ला सतत पहावे लागते.बाजारातील हालचाली जवळून पहावयास लागतात .यात शेअरचा डेटा आणि चार्ट यांचा समावेश असतो.
डिव्हिडंड मिळत नाही
इन्ट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला कंपनीचा बोनस शेअर,डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आशा वेगवेगळ्या कॉर्पोरेट action चा फायदा मिळत नाही कारण आपल्याकडे ते शेअर डिमॅट अकाउंट मध्ये नसतात.
डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे काय ?
डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण शेअर खरेदी केल्यावर शेअर न विकता ते शेअर आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करत असतो.शेअर खरेदी केल्यावर 2 दिवसानंतर हे शेअर आपल्या डिमॅट खात्यात जमा होतात .डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण त्या कंपनीचे एक प्रकारे मालक बनत असतो.
मोठे गुंतवणूकदार जसे की वॉरेन बफेट, राकेश झुणझुणवाला, विजय केडीया,राधाकिशन दमानी,रामदेव अगरवाल यांनी डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजेच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मधून करोडो रुपये कमावले आहेत.
डिलिव्हरी ट्रेडिंग चे फायदे
कमी नुकसान होते
डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये इन्ट्राडे ट्रेडिंग पेक्षा कमी तोटा होत असतो .सहसा नुकसान होत नाही परंतु झाले तरी ते कमी प्रमाणात होत असते.
वेळेचे बंधन नाही
जसे इन्ट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला शेअर हे एकाच दिवशी खरेदी करून त्याच दिवशी विकणे बंधनकारक असते तसे डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये आपणास वेळेचे काही बंधन नसते.
एकदा का आपण शेअर विकत घेतला यानंतर आपण तो शेअर कितीही वेळ आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करू शकतो. आपणास नफा झाला तरच आपण तो शेअर विकू शकतो .
कॉर्पोरेट Actions चा फायदा मिळत असतो
डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपल्याला कंपनीचा बोनस शेअर,डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट ,शेअर buyback अशा वेगवेगळ्या कॉर्पोरेट action चा फायदा मिळत असतो कारण आपल्याकडे ते शेअर डिमॅट अकाउंट मध्ये असतात.
डिलिव्हरी ट्रेडिंग चे तोटे
मार्जिन मिळत नाही
डिलिव्हरी ट्रेडिंग साठी आपल्याला मार्जिन मिळत नाही त्यामुळे जितकी शेअरची किंमत असेल तू पूर्ण किंमत आपल्याला शेअर खरेदी करतेवेळी अकाउंट मध्ये असावी लागते.
आपले पैसे लॉक होतात
जर आपण डिलीव्हरी या प्रकारात शेअर खरेदी केले की आपले पैसे हे एक प्रकारे बंद होतात म्हणजेच जर आपणास पैसे हवे असेल तर ते शेअर विकावे लागते.
इन्ट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी ट्रेडींग मधील फरक
| फरक | इन्ट्राडे ट्रेडिंग | डिलिव्हरी ट्रेडिंग |
|---|---|---|
| काय आहे | एकाच दिवसात शेअर खरेदी विक्री करणे | 1 दिवसातून अधिक काळासाठी खरेदी करणे |
| मालकी | आपल्याकडे शेअरची मालकी नसते | स्वतः आपण स्टॉक चे मालक असतो |
| कालावधी | एक दिवस | जोपर्यन्त आपण विकत नाही |
| कधी विकू शकतो | शेअर खरेदी केलेल्या दिवशीच विकावा लागतो | शेअर आपण कधीही विकू शकतो |
| डिव्हिडंड | डिव्हिडंड मिळत नाही | कंपनीने जाहीर केल्यास डिव्हिडंड मिळतो |
| मार्जिन | ब्रोकरकडून मार्जिन मिळते | कुठलेही मार्गिन मिळत नाही |
| बोकेरेज | कमी ब्रोकरेज | इन्ट्राडे पेक्षा जास्त |
| रिस्क | जास्त | इन्ट्राडे पेक्षा कमी |
कोणते ट्रेडिंग करावे ?
जर आपणास शेअर मार्केट चा अनुभव असेल आणि शेअरविषयी माहिती असेल तरच आपण इन्ट्राडे ट्रेडिंग करावे अन्यथा सरळ आपण चांगल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करून दीर्घकाळ आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करावे.दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर ठरू शकते.काही काळ ट्रेडिंग कसे काम करते हे पाहावे आणि मगच हळूहळू थोडया पैशात आपण ट्रेडिंग सुरू करू शकता.
डिमॅट अकाउंट उघडा
बहुतेक ब्रोकर जसे की Zerodha,Upstox हे आपल्याला फ्री डिलिव्हरी ट्रेडिंग ची सुविधा देतात.
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
तर या लेखामध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग आणि इन्ट्राडे ट्रेडिंग काय आहे आणि यामध्ये मुख्य काय फरक आहेत हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.आपणास दिलेली माहिती आवडली असेल तर कंमेंट करून नक्की कळवा व जास्तीत जास्त शेअर करा.
धन्यवाद...



Do not enter any spam link in comment box