Type Here to Get Search Results !

Market Capitalization - मार्केट कॅपिटल म्हणजे काय ?

 मार्केट कॅपिटल -market capitalization हा शब्द आपण अनेकदा business TV चॅनेल्स वर ऐकला असेल .कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करताना ज्या महत्वाच्या गोष्टी पाहणे गरजेचे आहे त्यामध्ये  मार्केट कॅपिटल खूप महत्वाचे आहे . तर आपण या लेखात  मार्केट कॅपिटल म्हणजे काय ?,एखाद्या  कंपनीचे मार्केट कॅपिटल कसे काढले जाते ? आणि मार्केट कॅपिटलनुसार कंपन्यांचे वर्गीकरण कसे केले जाते याची माहिती जाणून  घेणार आहोत  ,चला तर सुरु करूया . 

 मार्केट कॅपिटल -market capitalization म्हणजे काय ? 

 Market capitalization म्हणजे कंपनीच्या शेअरचे एकूण मूल्य होय  .कंपनीचे मार्केट कॅपिटल काढण्यासाठी सोपे सूत्र आहे . जर आपण कंपनीच्या एकूण शेअर संख्येला कंपनीच्या एका शेअरच्या किमतीने गुणले कि आपल्यला त्या कंपनीचे  मार्केट कॅपिटल मिळते . 




मार्केट कॅपिटल साठी सूत्र  

Market Capitalization = Current Share Price * Total Outstanding Shares

मार्केट कॅपिटल =  एका शेअरची किंमत  * एकूण शेअर संख्या 


उदा.विप्रो कंपनीच्या एकूण शेअरची संख्या आहे ५०,०००

आणि एक शेअरची किंमत आहे ५०० रु तर विप्रो कंपनीचे मार्केट कॅपिटल असेल 


विप्रो कंपनीचे मार्केट कॅप = ५०० * ५०,०००

                                   = २,५०,००,०००  रु,


Current Share Priceशेअरची किंमत 

 या ठिकाणी शेअरची किंमत म्हणजेच मार्केटमध्ये वारंवार बदलत असणारी शेअरची किंमत आहे.शेअरची  होणारी खरेदी विक्री ,कंपनीशी निगडित आर्थिक बाबी आणि बातम्यांमुळे  शेअरच्या किंमती  या सतत बदलत असतात .  

Outstanding Shares-एकूण शेअर  

 जे शेअर कंपनीने शेअर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध केलेले आहे त्या एकूण शेअरच्या संख्येला Outstanding Shares असे म्हणतात . यामध्ये कंपनीचे कर्मचारी,प्रोमोटर ,गुंतवणूकदार यांकडे असणारे शेअर समाविष्ट असतात . 

भारतातील सर्वात जास्त मार्केट कॅपिटल असणारी कंपनी - 

२०२१ साली रिलायन्स हि भारतातील सर्वात जास्त मार्केट कॅपिटल असणारी कंपनी आहे . सध्या  रिलायन्स  या कंपनीचे मार्केट कॅपिटल हे 1,411,799 कोटी रुपयांच्या आसपास आहे . मार्केट कॅपिटल हे सतत बदलत असतात कारण शेअरच्या किमती सतत बदलत असलयाने मार्केट कॅपिटल सुद्धा बदलत असते . 

रिलायन्स  पाठोपाठ TCS -1,162,667 कोटी रुपये  , HDFC बँक -828,341 कोटी रुपये   इन्फोसिस - 590,252 कोटी रुपये   या कंपन्यांचे मार्केट कॅपिटल सर्वात जास्त आहे . 

मार्केट कॅपिटल चे गुंतवणुकीसाठी महत्व - 

जसे कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी  इन्व्हेस्टर कंपनीचा PE ,EPS ,डिविडेंड ,शेअर किंमत हे पाहतात  तसेच मार्केट कॅपिटल हे गुंतवणूक करताना जरूर विचारात घेतले जाते . कारण कंपनीचे मार्केट कॅपिटल जर जास्त असेल तर ती कंपनी  भविष्यात होणार लॉस भरून काढू शकते .त्याचप्रमाणे जास्त मार्केट कॅपिटल असणाऱ्या  कंपन्यांवर  जरी मार्केट हे खाली वर गेले तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही . ज्या कंपन्यांचे  मार्केट कॅपिटल कमी आहे तर  त्या कंपन्या ,जास्त मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्यांपेक्षा गुंतवणुकीसाठी थोड्या Risky मानल्या जातात . 

जास्त मार्केट कॅपिटल असणाऱ्या  कंपन्यां ह्या दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात . कारण  या कंपन्या दीर्घकाळासाठी एक स्थिर उत्पन्न देत असतात . म्हणूनच आपण पाहू शकता ज्या टॉप सर्वात जास्त मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्या आहेत त्या दरवर्षी उत्तम फायदा आपल्या इन्वेस्टरला देत असतात .  कंपनीची भविष्यात होणारी  वाढ आणि आपल्याला मिळणार परतावा यांचा थेट संबंध मार्केट कॅपिटलशी  आहे असे आपण म्हणू शकतो . 

तसेच काही कमी मार्केट कॅपिटल असणाऱ्या कंपन्या सुद्धा उत्तम फायदा मिळवून देत असतात . त्यासाठी आपल्यला शेअर खरेदी करण्यापूर्वी कंपनीशी निगडित इतर आर्थिक बाबी तपासणे सुद्धा गरजेचे असते . कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी आपण त्या कंपनीची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे आणि मगच गुतंवणूक केली  पाहिजे . 

मार्केट कॅपिटल नुसार कंपन्यांचे प्रकार - 

सर्वसाधारणपणे कंपन्यांचे मार्केट कॅपिटलनुसार तीन प्रकार पडतात -

१ - लार्ज कॅप कंपनी 

२ -मिड कॅप कंपनी 

३ -स्मॉल कॅप कंपनी 


 लार्ज कॅप कंपनी -

आपण कंपनीचे मार्केट कॅपिटल कसे काढायचे हे वरती पहिले आहे . त्यानुसार जर एखाद्या कंपनीचे मार्केट कॅपिटल हे २०,००० कोटी रुपयांपेक्षा  जास्त असेल तर ती कंपनी लार्ज कॅप कंपनी म्हणून ओळखली जाते . लार्ज कॅप कंपन्यांचे स्टॉक हे सेन्सेक्स आणि निफ्टी च्या निर्देशकात समाविष्ट असतात.   तसेच काही कंपन्या ह्या ब्लू चिप  स्टॉक म्हणून देखील ओळखल्या जातात . लार्ज कॅप कंपन्याचे शेअर हे ,शेअर मार्केट मध्ये  जास्त खरेदी विक्री होणाऱ्या कंपन्याचे शेअर्स असतात . लार्ज कॅप कंपनीतील गुंतवणूक हि कमी रिटर्न  देणारी परंतु  रिस्क फ्री आणि नियमित फायदा देणारी असते .  

उदा - रिलायन्स ,TCS ,HUL ,ITC ,विप्रो इत्यादी . 

मिड कॅप कंपनी  -

 जर एखाद्या कंपनीचे मार्केट कॅपिटल हे २०,००० कोटी रुपयांपेक्षा  कमी असेल आणि ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती कंपनी मिड कॅप कंपनी म्हणून ओळखली जाते . मिड कॅप कंपन्याचे शेअर हे  भविष्यत चांगला फायदा देणारे  कंपन्याचे शेअर्स ठरू शकतात . मिड  कॅप कंपनीतील गुंतवणूक हि भविष्यात उत्तम रिटर्न  देणारी गुंतवणूक ठरू शकते  .शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते  लार्ज कॅप आणि स्माल कॅप पेक्षा मिड कॅप कंपन्यांमध्ये भविष्यात वाढीची संभावना अधिक असते . 

उदा -कॅस्ट्रोल ,कॅनरा बँक,बँक ऑफ महाराष्ट्र ,वोल्टास ,बाटा इंडिया ,ICICI securities 

स्मॉल कॅप कंपनी  -

जर एखाद्या कंपनीचे मार्केट कॅपिटल हे ५००० कोटी रुपयांपेक्षा  कमी असेल तर ती कंपनी स्मॉल कॅप कंपनी म्हणून ओळखली जाते .स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जास्त जोखमेसह जास्त रिटर्न मिळू शकतात .यामध्ये कमी किमतीमध्ये आपल्यला शेअर उपलब्ध होतात ज्यांना आपण पेनी स्टॉक सुद्धा म्हणू शकतो  .  स्मॉल कॅप शेअरमध्ये शेअर च्या किंमती या खूप कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये  गुंतवणूक हि थोडी धोकादायक मानली जाते .  

उदा - किर्लोसकर ऑइल ,डेल्टा कॉर्प ,डिश टीव्ही 

कोणत्याही कंपन्यांचे मार्केट कॅपिटल हे दररोज बदलत असते  त्यामुळे जरी आज एखादी कंपनी स्मॉल कॅप असेल तर काही दिवसांनी  ती कंपनी मिड कॅप कंपनी होऊ शकते किंवा मिड कॅप  ची लार्ज कॅप कंपनी होऊ शकते . किंवा शेअर किंमत कमी झाल्याने मिडकॅप वरून स्मॉल कॅप सुद्धा होऊ शकते . 

उदा. समजा इन्फोसिस कंपनीचे एकूण शेअर्स १ लाख आहेत आणिआज  त्याची प्रति शेअर किंमत १०० रु आहे, त्यावेळेस   इन्फोसिस कंपनीचे मार्केट कॅपिटल हे  १ कोटी रुपये  असेल. आणि एक वर्षानंतर त्याची शेअर किंमत ३०० रु . झाली तर इन्फोसिस चे मार्केट कॅपिटल होईल ३०० *१००००० =३ कोटी रुपये होईल .म्हणजेच शेअरच्या किमतीसोबतच मार्केट कॅप सुद्धा बदलत असते . 


आपण या लेखात  मार्केट कॅपिटल म्हणजे काय ?,एखाद्या  कंपनीचे मार्केट कॅपिटल कसे काढले जाते ? आणि मार्केट कॅपिटलनुसार कंपन्यांचे वर्गीकरण कसे केले जाते हे जाणून घेतले .

आपल्याला या लेखात दिलेली माहिती आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा .

धन्यवाद ... 


DISCLAIMER 

शेअर बाजारातील गुंतवणूक हि आर्थिक जोखीम ठरू शकते ,त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.