Type Here to Get Search Results !

Google Adsense काय आहे ? आणि Google Adsense साठी Approval कसे मिळवायचे ?

 प्रत्येक नवीन ब्लॉगर चा एक प्रश्न असतो तो म्हणजे Google AdSense approval कसे मिळेल ? तर आपण या लेखात Adsense म्हणजे काय आणि आपल्या ब्लॉगसाठी Adsense approval कसे मिळवायचे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Adsense म्हणजे काय ?

Adsense हे एक मोठे इंटरनेट मीडिया नेटवर्क आहे ज्याद्वारे publisher आणि advertiser यांना जोडले जाते.आपण कोणत्याही ब्लॉग किंवा वेबसाईटवर,youtube चॅनल, अँप्स यांना भेट दिली तर आपल्याला काही जाहिराती दिसतात. त्या जाहिराती आपल्याला Google AdSense च्या माध्यमातून दिसत असतात.

दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती या विडिओ,छायाचित्रे किंवा अक्षर स्वरूपात असतात. Google AdSense हे गूगल मार्फ़त चालवले जाते.


Google AdSense द्वारे आपण आपल्या वेबसाईटवर किंवा YOUTUBE चॅनेल वरती जाहिरात दाखवून पैसे कमावू शकतो.त्यासाठी आपल्याला आपल्या Gmail id ने Adsense चे खाते उघडून Adsense साठी अर्ज करावा लागतो.

त्यानंतर गूगल adsense आपला अर्ज तपासून आपला अर्ज स्वीकारतात किंवा त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर ते सांगितले जाते आणि आपला अर्ज बाद केला जातो.जर आपला अर्ज बाद झाला तर आपण पुन्हा adsense approval साठी अर्ज करू शकतो.

आपणाला google द्वारा एक Ad कोड दिला जातो जो आपल्या वेबसाइटवर टाकावा लागतो.त्यांनतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या Ads आपल्या वेबसाईटवर लावू शकतो.

Adsense कसे कार्य करते ?

आपल्याला adsense approve झाल्यावर आपण आपल्या वेबसाइटवर वेगवेगळ्या जागेवर जाहिराती साठी कोड लावायचा आहे किंवा auto ads ऑपशन  सुदधा सिलेक्ट करू शकतो.त्यानंतर आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर  जाहिरात दिसण्यास सुरुवात होते.

जो कोणी व्यक्ती आपल्या ब्लॉगवर भेट देईल त्या व्यक्तीला काही जाहिराती दिसतात. तसेच त्या जाहिराती वर क्लिक केल्यावर काही काही रक्कम आपल्या adsense  वर जमा होते.

एकूण 100 डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आपल्या अडसेन्स अकाउंट मध्ये जमा झाल्यावर ती रक्कम आपल्या बँक खात्यात पाठवली जाते.जर एक महिन्याच्या आत 100 डॉलर पूर्ण झाले नाही जमा झालेली रक्कम , पुढच्या महिन्यात वर्ग केली जाते.

मला गूगल ऍडसेन्स साठी approval कधी मिळाले ?

आपण पाहू शकता माझी वेबसाईट marathitmahiti.com ज्या वेबसाईटवर आपण हा लेख वाचत आहात त्या ब्लॉगसाठी मला गूगल ऍडसेन्स approval मिळाले आहे.
मी ऍडसेन्स साठी अर्ज केल्यावर अगदी 48 तासांमध्ये मला गूगल कडून एक ई-मेल आला त्यामध्ये मला adsense approval मिळाले होते.

गूगल adsense approval मिळवण्यासाठी काय करावे ?

तसे तर गूगल तर्फे असे काहीही सांगितले नाही की इतक्या पोस्ट असल्या की आपल्याला adsense साठी approval मिळेल परंतु गूगल चे असे म्हणणे आहे की आपल्या website वर पुरेशी माहिती असावी जेणेकरून जो व्यक्ती आपल्या वेबसाईटवर येईल त्याला पुरेसे लेख वाचता येईल आणि त्यातून त्याचा काही फायदा होईल.

दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच आपल्या वेबसाईटवर कुठलीही copyright असलेली माहिती किंवा छायाचित्रे नसावी.दुसऱ्या वेबसाईटवर असणारी माहिती आपल्या ब्लॉगवर कधीही कॉपी करू नये.

आपल्या ब्लॉगवर असणारी माहिती किंवा पोस्ट ही quality असावी जेणेकरून, वाचणाऱ्यासाठी  फायदेशीर ठरेल.

Adult content असणाऱ्या वेबसाइट google adsense साठी पात्र नसतात.

About us, Disclaimer,Privacy policy,site map, contract us,DMCA Policy  अशी पाने आपल्या वेबसाईटवर असावीत.

 माझ्या ब्लॉगवर AdSense approval कसे मिळाले ?

1 - ज्यावेळेस माझे ऍडसेन्स approve झाले त्यावेळेस माझ्या ब्लॉगवर एकूण 21 पोस्ट लिहिलेल्या होत्या.


2- ब्लॉग चा डोमेन हा जवळजवळ एक महिन्यांपूर्वी  विकत घेऊन blogger ला जोडला होता.


3- ब्लॉगवर मी About us, Disclaimer,Privacy policy,site map, contract us,DMCA Policy  अशी पाने जोडली होती.


4- सुरुवातीला मी ,एक महिनाभर दररोज एक लेख मी लिहीत होतो.


5- पूर्णतः नवीन आणि copyright नसलेला लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.


6- लेख लिहिल्यावर ,लेख आणि ब्लॉगपोस्ट मधील छायाचित्रे ही copyright आहे का नाही हे प्रत्येक वेळेस चेक करतो.


7- Responsive आणि मोबाईल ला सपोर्ट असणारी theme निवडली .


8- ब्लॉगचा sitemap बनवून तो google search console मध्ये टाकला होता.


9- google search console मध्ये आपली वेबसाईट जोडली होती.


10 -माझ्या प्रत्येक article मध्ये 500 ते 1500 दरम्यान  शब्द आहेत.

11 - माझ्या ब्लॉगवर जास्त ट्रॅफिक नव्हते तरीही मला adsense ने approve चा मेल केला म्हणजेच ट्राफिक किती आहे हे जास्त महत्वाचे नाही .

त्यामुळे जर आपण एखादा ब्लॉग सुरू केला असेल तर आपणही google adsense साठी approval मिळवू शकतो.त्यासाठी आपल्याला सातत्य दाखवणे गरजेचे आहे.

जर आपले adsense application reject झाले तर काय ?

जरी आपले adsense अँप्लिकेशन रिजेक्ट झाले तरी आपण आपल्या ब्लॉगवर नियमित पोस्ट टाकणे चालू ठेवावे. जर आपण नियमित ब्लॉगवर काम केले आणि गूगल च्या policy चा योग्य अवलंब केला तर adsense approval आपल्याला नक्की मिळेल.

आपल्याला या लेखात दिलेली माहिती आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा .

धन्यवाद..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.