Type Here to Get Search Results !

जाणून घ्या NSE आणि BSE काय आहे आणि NSE व BSE मध्ये काय अंतर आहे ?

 भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी जे मुख्य  दोन स्टॉक एक्सचेंज आहेत त्यांची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

BSE इंडिया

भारतात जे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत त्यापैकी BSE - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे एक प्रमुख एक्सचेंज आहे.

BSE  म्हणजेच Bombay Stock Exchange जे मुंबईमध्ये दलाल स्ट्रीट येथे आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना 1875 साली झाली जे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जाते.
प्रेमचंद रॉयचंद यांनी BSE ची स्थापना केली जे 19 व्या शतकातील एक उमदे व्यवसायिक होते.




1957साली BSE ला सरकारची मान्यता मिळाली आणि 1995 साली BSE मध्ये ऑनलाईन प्रणाली अंमलात आली.

2021 च्या आकडेवारीनुसार BSE हे 9 वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असून त्याचे मार्केट कॅप आहे  ₹2,18,730 billion .

BSE मध्ये 5400 हुन अधिक कंपन्या लिस्ट असून त्यामध्ये आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो.BSE मध्ये खालील इंडेक्स समाविष्ट आहेत.

  • BSE SENSEX
  • S&P BSE SmallCap
  • S&P BSE MidCap
  • S&P BSE LargeCap
  • BSE 500

1986 मध्ये BSE ने आपला पहिला इंडेक्स सेन्सेक्स बनवला ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज 30 कंपन्यांचा समावेश होतो.

BSE इंडिया चे अँप सुद्धा उपलब्ध आहे त्यावर आपण शेअरची माहिती पाहू शकतो.

वेबसाईट-www.bseindia.com

NSE इंडिया

भारतात जे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत त्यापैकी दुसरे सर्वात महत्वाचे स्टॉक एक्सचेंज आहे NSE - National Stock Exchange.NSE इंडिया चे मुख्यालय भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ची स्थापना 1992 साली झाली .2021 च्या आकडेवारीनुसार NSE हे भारतातील सर्वात जास्त ट्रेडिंग  होणारे स्टॉक एक्सचेंज असून त्याचे मार्केट कॅप आहे  US$3.1 trillion .

नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये 1900 हुन अधिक कंपन्या लिस्ट असून त्यामध्ये आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो.NSE  मध्ये खालील इंडेक्स समाविष्ट आहेत.

  • NIFTY 50
  • NIFTY Next 50
  • NIFTY 500

NSE इंडिया चे सर्वात प्रसिद्ध इंडेक्स आहे निफ्टी 50 इंडेक्स ज्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या 12 क्षेत्रातील 50 मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

12 क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, ग्राहक वस्तू, करमणूक आणि माध्यम, वित्तीय सेवा, धातू, फार्मास्युटिकल्स, दूरसंचार, सिमेंट आणि त्याची उत्पादने, वाहन, कीटकनाशके आणि खते, ऊर्जा आणि इतर  सेवा समाविष्ट आहेत.

निफ्टी 50 इंडेक्स हा 1996 मध्ये NSE तर्फे सादर करण्यात आला.NSE वर आपण इक्विटी, डेरिव्हेटिव्ह,चलन,debt फंडस्,म्युचुअल फंडस् यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

NSE इंडिया ची official वेबसाईट उपलब्ध आहे त्यावर आपण न्युज, कंपनीने निकाल, शेअरची माहिती पाहू शकतो.

वेबसाईट-www.nseindia.com

कोणत्या स्टॉक एक्सचेंज वर ट्रेडिंग करावे ?

तसे तर आपण BSE किंवा NSE पैकी कोणत्याही एक्सचेंज वर शेअर ट्रेडिंग करू शकता कारण दोन्ही सुद्धा भारतातील एक सर्वोत्तम स्टॉक एक्सचेंज आहेत.दोन्ही स्टॉक एक्सचेंज वर दररोज लाखो स्टॉक चे सौदे होतात.

परंतु काही वेळा आपण कोणते शेअर खरेदी करणार आहोत यावर सुद्धा अवलंबून असते कारण काही शेअर हे फक्त BSE स्टॉक एक्सचेंज वर उपलब्ध असतात व NSE वर नसतात अशा वेळी साहजिकच आपणाला BSE वरच ट्रेडिंग करावे लागेल.

BSE आणि NSE मधील फरक

फरक NSE BSE
ओळख भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज
स्थापना 1992 1875
महत्वपूर्ण इंडेक्स निफ्टी 50 सेन्सेक्स
वेबसाईट www.nseindia.com     www.bseindia.com
लिस्ट कंपन्या 1900+ 5400+
ट्रेडिंग Volume भारतात सर्वाधिक आहे NSE पेक्षा कमी
मार्केट कॅपिटल 3.1 ट्रिलियन डॉलर 3.1 ट्रिलियन डॉलर

तर आपण या लेखात BSE आणि NSE म्हणजे काय आणि त्यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेतले.आपणास दिलेली माहिती आवडली असेल तर कंमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.