Type Here to Get Search Results !

What are Index Funds ? इंडेक्स फंड म्हणजे काय ? जाणून घ्या मराठीत .

 गुंतवणुकीमध्ये विविधता असणे हा कोणत्याही चांगल्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओचा मुख्य घटक आहे. गुंतवणूकदार वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात जसे की इक्विटी, रिअल इस्टेट, बॉण्ड्स,सोने इत्यादींमध्ये त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात.


प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदार त्यामध्ये आणखी विविधता आणण्याचा प्रयत्न करतात. इक्विटी गुंतवणूकीमध्ये, जोखीम कमी करण्याची एक ज्ञात पद्धत म्हणजे विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून आपल्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे.

यासाठी आपण इंडेक्स फंडात गुंतवणूक करू शकतो.तर आपण या लेखात इंडेक्स फंड्स म्हणजे नक्की काय आहे ?आणि त्यांचे फायदे काय आहेत? तसेच भारतातील विविध इंडेक्स फंडाची माहिती घेऊया.चला तर मग सुरू करुया.

इंडेक्स फंड म्हणजे काय?- Index fund

इंडेक्स फंड म्हणजेच शेअर मार्केटच्या विविध इंडेक्स मधील गुंतवणूक होय.इंडेक्स हे वेगवेगळे असू शकतात जसे की सेन्सेक्स,निफ्टी,मिडकॅप इंडेक्स इत्यादी.




इंडेक्स फंड हे पॅसिव्ह इंडेक्स फंड म्हणून ओळखले जातात म्हणजेच इंडेक्स फंडमध्ये शेअर निवडण्याची फंड मॅनेजरला गरज नसते . जे शेअर इंडेक्स मध्ये समाविष्ट असतात अशा शेअरमध्ये फंड मॅनेजरला फक्त समान प्रमाणात गुंतवणूक करावी लागते.

इतर फंडामध्ये फंड मॅनेजर कोणते शेअर गुंतवणुकीसाठी निवडायचे हे ठरवतात त्यामध्ये विविधता आणतात परंतु इंडेक्स मध्ये आधीपासूनच शेअर ठरलेले असतात जसे की सेन्सेक्स मध्ये 30 शेअर निफ्टी मध्ये 50 शेअर त्यामुळे त्याला पॅसिव्ह इंडेक्स फंड असे म्हणतात.

इंडेक्स ज्या प्रमाणात वाढेल किंवा कमी होईल त्या प्रमाणात आपल्याला इंडेक्स फंड मधून फायदा मिळतो.

इंडेक्स फंड कसे काम करते ?

समजा आपण काही रक्कम ही निफ्टी 50 च्या इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक केली .आपणास माहीत आहे की निफ्टी 50 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 50 मोठ्या आणि दिग्गज कंपन्यांच्या शेअरचा समावेश होतो.अशावेळी इंडेक्स फंड मॅनेजर हा आपली गुंतवणूक रक्कम ही निफ्टी 50 च्या शेअरमध्ये समान प्रमाणात गुंतवेल .
नंतर जसजसा निफ्टी इंडेक्स च्या किंमती वाढतील तसा आपला इंडेक्स फंड देखील वाढेल आणि त्यातून आपल्याला नफा मिळेल.निफ्टी इंडेक्स हा दरवर्षी वाढत असतो .कोणत्याही गुंतवणुकीवर आपल्याला दिर्घकाळानंतर चांगला परतावा मिळू शकतो.

वेगवेगळे इंडेक्स फंड - Different Funds

  • निफ्टी 50
  • निफ्टी बँक
  • निफ्टी 500
  • निफ्टी स्मॉल कॅप 250
  • निफ्टी नेक्स 50
  • निफ्टी मिड कॅप 150
  • सेन्सेक्स फंड

प्रमूख काही इंडेक्स फंड कंपन्या

  • UTI Nifty Index Fund
  • HDFC Index Fund
  • ICICI Prudential Mutual Fund
  • SBI Nifty Index Fund
  • Motilal Oswal S&P 500 Index Fund
  • Axis Nifty 100 Index Fund
  • Franklin India Index Fund

इंडेक्स फंड मध्ये कोणी गुंतवणूक करावी

जसे आपण पाहिले की इंडेक्स फंड हे पॅसिव्ह फंड आहेत ज्यामध्ये फंड मॅनेजर आपला पैसा इंडेक्समध्ये समान प्रमाणात गुंतवत असतात.आणि ज्या प्रमाणात इंडेक्स वाढेल तसे रिटर्न आपल्याला मिळत असतात ,येथे फंड मॅनेजर ला जास्त काम करावे लागत नाही आणि मिळणारा परतावा हा पूर्णपणे इंडेक्स च्या कामगिरीवर मिळत असतो.

जे गुंतवणूकदार कमी जोखमेमध्ये एक सातत्यपूर्ण परतावा अपेक्षित करतात असे गुंतवणूकदार इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु ज्यांना थोडी रिस्क घेऊन जास्त नफा हवा असतो असे इन्व्हेस्टर इतर फंडामध्ये किंवा डायरेक्ट शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात.

इंडेक्स फंडामध्ये कमी परतावा मिळत असला तरी त्यामध्ये रिस्क कमी असते म्हणून अनेक लोक मार्केटमध्ये इंडेक्स फंडात आपला गुंतवणुकीतील काही भाग गुंतवत असतात .जर आपणास जास्त नफा हवा असल्यास आपण ऍक्टिव्ह फंडात गुंतवणूक करू शकता.

तर आपण या लेखात इंडेक्स फंड विषयी माहिती जाणून घेतली.आपणास ही माहिती आवडली असेल किंवा काही शंका असेल तर कंमेंट द्वारे नक्की कळवा.

धन्यवाद ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.