कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करण्यापूर्वी आपण अनेक आर्थिक निकष त्या कंपनीशी निगडित पाहत असतो ,ज्यामध्ये कंपनीच्या शेअरची किंमत,EPS, book value,PB, डिव्हिडंड,सेक्टर PE,PE,valuation इत्यादी.त्यातील एक महत्वाचा निकष म्हणजे कंपनीची बुक व्हॅल्यू(Book Value) आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू(PBVR).
कंपनीच्या बुक व्हॅल्यू च्या माध्यमातून आपल्याला हे समजते की कंपनीची शेअर किंमत जास्त आहे की कमी.चला तर , पाहूया बुक व्हॅल्यू काय आहे ते ?
बुक व्हॅल्यू म्हणजे काय ?
थोडक्यात सांगायचे झाले तर Book Value म्हणजेच,जर समजा आज एखादी कंपनी विकली तर जी किंमत त्या विक्रीतून येईल त्यातून कंपनीचे सर्व कर्ज वजा केल्यावर जी रक्कम येइल ती कंपनीची बुक व्हॅल्यू असेल.
जर आपणास प्रति शेअर बुक व्हॅल्यू काढायची असेल तर त्यासाठी कंपनीचे एकूण Assets च्या किमतीतून, कंपनीची देणेदारी म्हणजे कर्ज वजा केले असता जी रक्कम येईल त्याला कंपनीचे बाजारात असलेले म्हणजे आऊटस्टॅडिंग शेअर्स ने भागले असता आपल्याला त्यातून त्या कंपनीच्या शेअरची प्रतिशेअर बुक व्हॅल्यू समजते.
समजा सध्या इन्फोसिस चा एक शेअर 1500 रुपयांवर आहे व इन्फोसिस ची बुक value 900 रुपये आहे. याचा अर्थ असा की आज जर कंपनी बंद झाली तर कंपनीकडे प्रति शेअर 900 रुपये मिळेल.
बुक व्हॅल्यू काढण्यासाठी चे सूत्र
Book value of company : Total Assets of company – Total Liabilities of company
बुक व्हॅल्यू : एकूण संपत्ती - एकूण कर्ज व देणेदारी
Book Value Per Share : (Total Assets– Total Liabilities) / Total Outstanding Shares
प्रति शेअर बुक व्हॅल्यू: ( एकूण संपत्ती - एकूण कर्ज व देणेदारी)/एकूण मार्केटमधील आऊटस्टॅडिंग शेअर संख्या
कोणत्याही कंपनीच्या समभागाचे book value चे मूल्य मिळविण्यासाठी, त्याचे भांडवल (ज्यामध्ये कंपनीकडे असणारी जमीन,इतर मालमत्ता, कॉम्पुटर सामग्री समाविष्ट होतात )आणि सामान्य राखीव मूल्य(reserve funds ) जोडून त्यातून एकूण देणेदारी वजा केली की कंपनीच्या समभागाचे book value चे मूल्य मिळते.
प्रति शेअर बुक व्हॅल्यूसाठी कंपनीच्या बुक व्हॅल्यू ला एकूण शेअर संख्येने भागले की प्रति शेअर बुक व्हॅल्यू मिळत असते.
बुक व्हॅल्यूचे उदाहरण
उदाहरणः
समजा आज पर्यंत ABC कंपनीच्या एकूण मालमत्तेचे मूल्य 50 लाख रुपये आहे. ABC कंपनीला एकूण 20 लाख रुपये कर्ज आणि इतर माध्यमातून देणेदारी आहे.तसेच ABC च्या समभागांची एकूण संख्या 50,000 आहे.
वरील आकडेवारीवरून, ABC कंपनीच्या मालमत्तेतून एकूण कर्ज वजा केले असता शिल्लक रक्कम असेल
: 50 लाख रुपये- 20 लाख रुपये जे असेल 30 लाख रुपये. कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या 50000 असल्याने त्याचे प्रति शेअर इक्विटीचे बुक value मूल्य असेल,
प्रति शेअर बुक मूल्य = 30,000,00 / 50,000 =60
जर ABC कंपनीच्या एका शेअरची किंमत 100 रु असेल तर शेअर हा Overvalue आहे असे म्हणू शकतो करण तो शेअर बुक व्हॅल्यू पेक्षा अधिक आहे व जर ABC कंपणीच्या शेअरची किंमत 50 रु असेल तर आपण ABC चा शेअर Undervalue आहे असे म्हणू शकतो करण त्याची किंमत ही बुक व्हॅल्यू पेक्षा कमी आहे .
बुक व्हॅल्यूचे शेअर निवडीसाठी चे महत्त्व
कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीच्या बुक व्हॅल्यू बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, कंपनी आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे की नाही हे तिचे बुक व्हॅल्यू चे मूल्य दर्शवते. कोणतीही कंपनी ज्याची बुक व्हॅल्यू किंमत जास्त असते त्यांना गुंतवणूकीसाठी चांगले मानले जाते.
स्टॉक मार्केटमध्ये कोणती कंपनी गुंतवणूक करण्यास योग्य आहे, तसेच कोणतीही कंपनी ही शेअर किंमतीच्या तुलनेत ओवर वैल्यूड आहे की अंडर वैल्यूड हे शोधण्यासाठी book value महत्वाची असते.
तर मित्रांनो आपण या लेखात बुक व्हॅल्यू(Book Value) आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू(PBVR) म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेतले.जर आपणास ही माहिती आवडली असेल तर कंमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
धन्यवाद...

Do not enter any spam link in comment box