शक्यतो आपण शेअर बाजारात कमी किमतीमध्ये शेअर विकत घेतो आणि शेअरची किंमत वाढल्यावर आपण तो शेअर विकत असतो . परंतु जेंव्हा शेअर बाजारात शेअरच्या किंमती कमी होत असेल तेंव्हा सुद्धा आपण शॉर्ट सेलिंग करून त्यातून पैसे कमावू शकतो .
पण हे शॉर्ट सेलिंग नक्की आहे काय ?,तर या लेखात आपण शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ? आणि शॉर्ट सेलिंग चे फायदे काय आहेत ? तसेच शॉर्ट सेलिंग चे उदाहरण जाणून घेणार आहोत , चला तर मग सुरु करूया .
शॉर्ट सेलिंग म्हणजे काय - Short Selling
आपण शेअर मार्केट मध्ये साधारणपणे पहिले शेअर खरेदी करतो आणि उच्च किंमतीवर विकत असतो . परंतु शेअर बाजारात अशी एक सुविधा आहे ज्यामध्ये पहिले आपण शेअर विकायचे आणि शेअरची किंमत कमी कमी झाली कि ते पुन्हा खरेदी करायचे व त्यातून नफा कमवायचा ,त्यालाच शॉर्ट सेलिंग असे म्हणतात .
मार्केटमध्ये चढ - उतार हे कायम येत असतात जर मार्केट वरती गेले तर अर्थातच आपण त्यातून पैसे कमवत असतो आणि जर मार्केट खाली जात असेल तर आपण शॉर्ट सेलिंग च्या माध्यमातून नफा कमावू शकतो .
जर आपणास कंपनीचे चांगले ज्ञान असेल आणि कोणता स्टॉक कधी वर जाईल किंवा खाली जाईल याबद्दल चांगला अनुभव असेल तर आपण Short Selling चा चांगला फायदा घेऊ शकता .
एखाद्या स्टॉकची सध्याची किंमत वाढत असल्यास आणि आपणास हे माहित आहे की त्याचे मूल्य हे काही दिवसात घटणार आहे ,तर आपण प्रथम तो शेअर विकू शकता आणि नंतर तोच शेअर कमी किंमतीवर विकत घेऊ शकता .
शॉर्ट सेलिंग मधून पैसे कसे कमवायचे ?
जर आपल्याला असे वाटत असेल की बाजार घसरत आहे तर आपण प्रथम कोणताही स्टॉक किंवा निर्देशांक विकू शकता. जर आपल्या विचारानुसार बाजार खाली गेला तर जितका तो खाली जाईल तितका आपला नफा वाढत जाईल. जेव्हा आपणास वाटणारे लक्ष्य पूर्ण होईल , तेव्हा आपण तेच शेअर पुन्हा खरेदी करून तो व्यवहार बंद करू शकता आणि आपला नफा बुक करू शकता.
शॉर्ट सेलिंग हि आपल्या नियमित शेअर ट्रेडिंग च्या अगदी विरुद्ध पद्धती आहे परंतु दोन्ही पद्धतीत आपण समान फायदा मिळवू शकतो .
शॉर्ट सेलिंग कसे काम करते ?
शेअर मार्केट मध्ये आपण आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये असणारे शेअर विकू शकतो परंतु Short Selling मध्ये शेअर हे आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये नसतात. तर मग आपण शेअर कसे विकू शकतो.
त्यासाठी , सर्वप्रथम आपण आपल्या ब्रोकरकडून आपल्याला जितके शेअर विकायचे आहेत तितके शेअर उसने घेत असतो.ब्रोकरकडे हे शेअर आधीपासूनच त्यांच्या अकाउंट मध्ये होल्ड असतात.
यानंतर आपण ते शेअर बाजारात एक विशिष्ट किंमतीला विकत असतो .
नंतर शेअर बाजारात शेअरच्या किंमती कमी झाल्या की तेच शेअर, बाजारातून पून्हा कमी दरात खरेदी करतो.
शेवटी आपण उसने घेतलेले शेअर आपल्या ब्रोकरला पुन्हा देतो आणि झालेला नफा हा आपला शॉर्ट सेलिंग चा फायदा असतो.
शॉर्ट सेलिंग उदाहरण
समजा ABC कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे 100 रुपये आणि आपल्याला जर वाटत असेल की या शेअरची किंमत ही खाली जाणार आहे त्यामुळे आपण पहिले ABC कंपनीचे 100 शेअर , 100 रुपये प्रति शेअर दराने विकले आणि त्या व्यक्तीनुसार जर शेअरची किंमत कमी झाली जसे की 90 रुपये झाली तर तोच व्यक्ती पुन्हा ते शेअर 90 रुपये दराने खरेदी केले.
उदाहरण 1 -
म्हणजेच
एकूण विक्री किंमत = 100 शेअर *100 रुपये प्रति शेअर
=10000 रुपये
शेअर खरेदी किंमत = 100 शेअर *90 रुपये प्रति शेअर
=9000 रुपये
या ठिकाणी शॉर्ट सेलिंग करणाऱ्या व्यक्तीला एकूण 1000 रुपये नफा होईल.
परंतु जर शेअरची किंमत कमी होण्याऐवजी वाढली तर मात्र त्या व्यक्तीला नुकसान सहन करावे लागेल.त्यासाठी आधी शेअर निगडित गोष्टी तपासणे अनिवार्य असते.
उदाहरण 2 -
जर शेअरची किंमत कमी न होता वाढली जसे की 110 रुपये झाली तर तो शेअर 110 रुपये दराने खरेदी करणार.
म्हणजेच
एकूण विक्री किंमत = 100 शेअर *100 रुपये प्रति शेअर
=10000 रुपये
शेअर खरेदी किंमत = 100 शेअर *110 रुपये प्रति शेअर
=11000 रुपये
या ठिकाणी शॉर्ट सेलिंग करणाऱ्या व्यक्तीला एकूण 1000 रुपये तोटा होईल.
शॉर्ट सेलिंग विषयी तथ्ये
- शॉर्ट सेलिंग मध्ये शेअर विकणारा व्यक्ती म्हणजेच शॉर्ट सेलर कडे हे शेअर नसतात.
- शॉर्ट सेलिंग ही पूर्णपणे भविष्यातील अंदाजावर केली जाते.
- शॉर्ट सेलिंग नेहमी बेअर मार्केट म्हणजे बाजारात मंदी मध्ये केली जाते.
- शॉर्ट सेलिंग मध्ये ब्रोकर कडून उसने घेणारे शेअर आपल्याला आपल्या शेअर दलालाला परत करावे लागतात.
- जर शेअर विक्री केल्यावर शेअरच्या किंमती वाढल्यावर मात्र शॉर्ट सेलिंग करणाऱ्या व्यक्तीला तोटा सहन करावा लागतो.
निष्कर्ष -
शॉर्ट सेलिंग हे बाजारात असणाऱ्या मंदीचा फायदा घेऊन नफा मिळवण्यासाठी केली जात असते. परंतु आपणास शेअरविषयी माहिती नसताना जर शॉर्ट सेलिंग करणे हे नुकसानदायक ठरू शकते.त्यामुळे आपणास शेअर बाजाराचा अनुभव कमी किंवा नसल्यास आपण शॉर्ट सेलिंग टाळले पाहिजे.
तर आपण या लेखात शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ? शॉर्ट सेलिंग कसे काम करते आणि त्याचे फायदे जाणून घेतले,आपणास जर ही माहिती आवडली असेल तर कंमेंट द्वारे नक्की कळवा.
धन्यवाद ...


Do not enter any spam link in comment box