शेअर मार्केट मध्ये नवीन असल्यावर अनेक शब्दाचा अर्थ आपल्याला समजत नसतो , त्यापैकी एक म्हणजे , ब्लू चिप स्टॉक हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल . अनेक लोक शेअर मार्केट मध्ये नुकसान टाळण्यासाठी ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. या पोस्टमध्ये आपण ब्लू चिप स्टॉक - BLUE CHIP STOCKS म्हणजे नक्की काय आणि ब्लू चिप स्टॉक ची काही उदाहरणे जाणून घेणार आहोत ,चला तर मग सुरु करूया .
ब्लू चिप स्टॉक - BLUE CHIP STOCKS म्हणजे काय ?
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्लू चिप शेअर्स म्हणजे शेअरबाजारातील दिग्गज आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर होय . ज्या कंपन्यांची आर्थिक कामगिरी चांगली आहे ,ज्यांची कामगिरी सातत्यपूर्ण आहे तसेच ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल जास्त आहे अशा कंपन्या ब्लू चिप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात .
बाजाराच्या चढ उतारामध्ये चांगला लाभ देण्याची क्षमता या शेअरमध्ये असते. आपण थेट किंवा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून भारतात ब्लू -चिप स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतो . या शेअरमध्ये बाजारपेठेतील कठोर परिस्थिती म्हणजेच चढ उतार सहन करण्याची आणि चांगल्या बाजार परिस्थितीत उच्च परतावा देण्याची क्षमता असते .
ब्लू चिप स्टॉक च्या शेअरची किंमत सामान्यत: जास्त असते , कारण त्यांची बाजारात प्रतिष्ठा चांगली असते आणि बहुतेक वेळा ते आपापल्या उद्योग क्षेत्रातील ते दिग्गज असतात. तथापि, ब्लू -चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, आपण कंपनीशी निगडित काही आवश्यक गोष्टी जरूर तपासल्या पाहिजे.
ब्लू चिप कंपन्या ओळखण्यासाठी अनेक निकष आहेत त्यामध्ये आपण कंपनीच्या वार्षिक उत्पन्नात सातत्य असणे , कर्ज पातळी कमी असणे , भांडवलावर सरासरी परताव्याचे (ROE ) प्रमाण जास्त असणे, तसेच बाजार भांडवल तसेच किंमत- उत्पन्न गुणोत्तर (पीई) आणि कंपनीचा EPS आदी गोष्टी तपासायला हव्यात.
ब्लू चिप स्टॉक उदाहरणे - BLUE CHIP STOCKS Examples -
भारतीय शेअर बाजारात अनेक ब्लू चिप कंपन्या उपलब्ध आहेत त्यापकी काही उदाहरणे आहेत ,
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- भारती एअरटेल
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)
- कोल इंडिया
- रिलायन्स इंडस्ट्रीज
- एचडीएफसी बँक
- ओएनजीसी
- आयटीसी
- सन फार्मा
- गेल (इंडिया)
- इन्फोसिस
- आयसीआयसीआय बँक
- एशियन पेंट्स लि.
- महिंद्रा अँड महिंद्रा
- मारुती सुझुकी इंडिया
- विप्रो
- ल्युपिन
- बॉश
- हिंदुस्तान युनिलिव्हर
- बजाज ऑटो
ब्लू चिप स्टॉक चे काही फायदे -
स्थिर उत्पन्न आणि नियमित लाभांश -
शेअर बाजारात कितीही चढ उतार आले तरी , ब्लू-चिप स्टॉक गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीवर स्थिर उत्पन्न मिळवतात.कारण ब्लू चिप कंपन्यांचे मार्केट कॅपिटल जास्त असते तसेच उत्तम व्यवसायामुळे ते मार्केट लीडर असतात . तसेच बहुतेक ब्लू चिप कंपनीचे शेअर दरवर्षी किंवा तीन,सहा महिन्यांनी डिविडेंड जाहीर करत असतात त्यातून पण एक स्थिर उत्पन्न आपल्याला मिळत असते .
आर्थिक योग्यता -
ब्ल्यू-चिप कंपन्यांकडे त्यांची आर्थिक थकबाकी आणि कर्ज सहजतेने दूर करण्यासाठी पुरेसे भांडवल असते . यामुळे अशा कंपन्यांनी जारी केलेले शेअर्स पतवारीत जास्त असतात आणि आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी योग्य असतात .
गुंतवणुकीमध्ये धोका कमी -
चांगली आणि स्थिर आर्थिक कामगिरी असलेल्या मोठ्या कंपन्या असल्याने ब्लू-चिप कंपन्यांशी संबंधित गुंतवणूक जोखीम घटक तुलनेने कमी असतात. गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणून ब्लू-चिप शेअर्सशी संबंधित जोखीमचे ओझे कमी करू शकतात. इतर कंपन्यांपेक्षा ब्लू-चिप शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी असते .
स्थिर आर्थिक उत्पन्न -
ब्लू-चिप कंपन्या ह्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या त्यांच्या कमाल वाढीच्या संभाव्यतेपर्यंत पोहचल्या असतात .अनेक वर्ष ग्राहकांना सेवा पुरवत असल्याने मार्केटमध्ये त्यांची एक ब्रँडेड छबी तयार झालेली असते . यामुळे ब्ल्यू-चिप शेअर्सवर बाजारातील मंदीचा जास्त परिणाम होत नाही ,त्यामुळेच ह्या कंपन्या कमी पण एक स्थिर उत्पन्न गुंतवणूकदारांना देत असतात .
कर सवलत -
भारतात अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर 15% दराने कर आकारला जातो. तथापि, दीर्घकालीन भांडवली नफा रु. 1 लाख पासून पुढे 10% दराने कर आकारणीस पात्र आहे.
पेनी स्टॉक VS ब्लू चिप स्टॉक
ब्लू चिप स्टॉक -
ब्लू चिप कंपन्यांचे शेअर हे विश्वासार्ह आणि लोकप्रिय कंपन्यांचे शेअर आहेत, ज्यांची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि त्याच वेळी त्यांच्या आर्थिक गोष्टी देखील खूप चांगल्या असतात . ज्यांना आपण एक स्थिर परतावा देणार्या मार्केटमधील कंपन्या म्हणून देखील पाहू शकता. इंट्राडे ट्रेडिंग आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी मोठे गुंतवणूकदार ब्लू चिप स्टॉक पसंत करतात.ब्लू चिप कंपन्यांच्या शेअरची किंमत हि जास्त असते .
पेनी स्टॉक -
ज्या शेअरच्या किंमती अगदी कमी आहेत ( ५रु,१० रु,१५ रु इत्यादी ) अशा स्मॉल कॅप कंपन्याचे स्टॉक पेनी स्टॉक म्हणून ओळखले जातात . पेनी स्टॉक हे कमी किंमतीत उपलब्ध असतात परंतु त्यामधील गुंतवणूक हि ब्लू चिप स्टॉक मधील गुंतवणुकीच्या मानाने धोकादायक मानली जाते .तथापि कधी कधी पेनी स्टॉक हे ब्लू चिप स्टॉक पेक्षा अधिक पटीने उत्पन्न देऊ शकतात परंतु त्यासाठी चांगली कंपनी निवडणे आवश्यक असते .
ब्लू चिप स्टॉक मध्ये गुंतवणूक कशी करावी -
१ - सर्वप्रथम आपल्यला एक डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे . जर आपले डिमॅट अकाउंट नसेल तर खालील पैकी कोणत्याही ब्रोकेरकडे आपण आपले डिमॅट अकाउंट ओपन करू शकता .
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
२- आता आपल्यला सर्वोत्तम ब्लू चिप शेअर हे गुंतवणुकीसाठी निवडायचे आहे .
३ - आपल्या ब्रोकर च्या अँप मधून शेअर खरेदी करायचे आहे -
Zerodha मधून शेअरची खरेदी आणि विक्री कशी करायची हे पाहण्यासाठी खालील विडिओ पहा .
Upstox मधून शेअरची खरेदी आणि विक्री कशी करायची हे पाहण्यासाठी खालील विडिओ पहा .
तर मित्रांनो आपण या लेखात ब्लू चिप स्टॉक काय आहेत ? याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा एक प्रयत्न केला . आपणास हि माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट मधून नक्की कळवा .
धन्यवाद ...




Do not enter any spam link in comment box