शेअर बाजार हा प्रत्येकाला उत्सुकता वाटणारा विषय आहे तसेच त्याच्या आकर्षणामुळे अनेक नवीन लोक शेअर मार्केट मध्ये येत असतात.परंतु चुकीच्या सल्ल्याने किंवा अनुभव नसल्याने काही लोक आपला पैसा गमावून बसतात.अशा नवीन लोकांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत ज्यांचा वापर करून आपण शेअर मार्केट मध्ये आपले होणारे नुकसान टाळू शकता.
आपण स्वतः शेअर चे विश्लेषण करा - Do your own stock analysis
शेअरमार्केट मध्ये नेहमी आपण स्वतः शेअर खरेदीसाठी निवडले पाहिजे.मार्केटमध्ये अनेक लोक किंवा ब्रोकर शेअर खरेदीसाठी टिप्स देत असतात परंतु अशा टीप्समुळे कधीकधी आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते.
शेअर मार्केटमध्ये अशा टिप्स देऊन अनेक Scam झालेले आपण पाहिले असेल.जरी आपण शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तरी आपण शेअर विषयी माहिती घेऊन मग आपण शेअरची निवड केली पाहिजे.
जसे आपण आपल्या आयुष्यात कोणताही निर्णय घेताना अनेक लोकांचे मत विचारात घेतो मात्र अंतिम निर्णय स्वतः घेतो. तसेच शेअर निवडताना सुद्धा आपण स्वतः शेअरच्या निगडित आवश्यक बाबींची माहिती पाहून जर शेअर गुंतवणुकीसाठी योग्य असेल तरच शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.आपण हळूहळू शेअर मार्केट मधील बारकावे शिकून एक उत्तम इन्व्हेस्टर होऊ शकतो.
शेअर मार्केटमध्ये संयम राखा - Keep Patience
शेअरमार्केटमध्ये संयम आणि शिस्त खूप महत्वाच्या गोष्टी आहे.प्रसिद्ध शेअर मार्केट गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी देखील म्हटले आहे की माझा शेअर होल्डिंग चा कालावधी आहे कायमचा आहे, याचाच अर्थ असा की ते कायम दीर्घकाळ शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
सहसा नवीन गुंतवणूकदार काही शेअर विकत घेतात आणि थोडा फायदा झाला की थोडयाच दिवसांनी शेअर विकून टाकतात किंवा एखादा शेअर विकत घेतात आणि त्यामध्ये थोडा तोटा झाला की लगेच विकून टाकतात .
परंतु जे उत्तम गुंतवणूकदार असतात ते अशा मार्केटमधील चढ उतारामुळे घाबरून न जाता दीर्घकाळासाठी शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतात ,कारण त्यांना माहिती असते की आपण ज्या शेअरमध्ये खरेदी केली आहे तो शेअर भविष्यात आपल्याला चांगला फायदा देणार आहेत.
पेनी शेअर पासून दूर राहा - Keep away from Penny Stocks
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पेनी शेअर पासून दूर राहिले पाहिजे.पेनी शेअर म्हणजे ज्या शेअरच्या किंमती अगदी कमी आहे जसे की 5 रु,10 रु ,15 रु इत्यादी.
नवीन शेअर मार्केट मध्ये प्रवेश केलेलं लोक सुरुवातीला शेअर शोधताना त्यांना कमी किमतीत उपलब्ध असणारे पेनी शेअर दिसतात ,ते शेअर खरेदीसाठी निवडतात. परंतु काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येते की या शेअरचा भाव वाढला तर नाहीच परंतु शेअरच्या किंमती अधिकच कमी झाल्या आहेत.त्यामुळे कमी किमतीच्या शेअरपेक्षा गुणवत्तापूर्ण शेअरची निवड केली पाहिजे भलेही शेअरची किंमत जात असेना.
समजा एक शेअर 5000 रु किमतीला असेल आणि दुसरा शेअर 20 रु किमतीला असेल आणि एखाद्या व्यक्तीकडे 10000 रुपये गुंतवणूक करण्यासाठी असेल तर नवीन व्यक्ती विचार करते की 5000 रु चे 2 शेअर घेण्यापेक्षा 20 रु किमतीचे 500 शेअर घेऊ.परंतु या ठिकाणी आपल्यला विचार करणे गरजेचे आहे की तो शेअर 20 रुपयाला का आहे आणि दुसरा शेअर 5000 रु ला कसा पोहचला.
शेअर खरेदी करताना त्याच्या मार्केट किमतीपेक्षा त्याच्या Fundamentals वर लक्ष दिले पाहिजे जसे की कंपनी काय व्यवसाय करते,कंपनीचे व्यवस्थापण कसे आहे,आथिर्क निकाल कसे आहेत,भविष्यात काय संधी आहेत इत्यादी गोष्टी तपासायला हव्यात.
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
इन्ट्राडे ट्रेडिंग करू नका - Don not try Intraday trading
नवीन शेअर मार्केट ग्राहकांसाठी इन्ट्राडे ट्रेडिंग हे खूप धोकादायक ठरू शकते.अनेक लोक शेअरमार्केट मध्ये विना माहिती टिप्सवर भरोसा ठेवून इन्ट्राडे ट्रेडिंग करतात आणि आपला घामाने कमावलेला पैसा गमावून बसतात.
मित्रांनो शेअर मार्केट मध्ये फक्त 10 % लोकच इन्ट्राडे मधून पैसे कमवतात म्हणजेच या ठिकाणी मोठी रिस्क असते.त्यापेक्षा एखादी चांगली कंपनी पाहून त्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून आपण चांगला पैसा कमावू शकतो.
राकेश झुणझुणवाला, वॉरेन बफेट, विजय केडीया, राधाकिशन दमानी हे सर्व शेअर मार्केट दिग्गज आहेत ज्यांनी करोडो रुपये दीर्घकाळ गुंतवणूक करून शेअर मार्केट मधून कमावले आहेत.
आपले सर्व पैसे गुंतवू नका - Do not invest at one time
आपला सर्व पैसा एकदम शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू नका.कारण शेअर मार्केट हे कायम खाली वर जात असते त्यामुळे आपल्याला शेअर मार्केट खाली गेल्यावर नवीन शेअर खरेदी करण्यासाठी संधी असते त्यामुळे आपण अशा संधी ओळखून गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
तसेच सर्व पैसे हे एकच शेअर किंवा सेक्टर मध्ये न लावता वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या कंपन्या निवडून पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे.
त्याशिवाय शेअर मार्केट व्यतिरिक्त इतर आर्थिक साधनांमध्ये सुद्धा थोडी गुंतवणूक केली पाहिजे जसे की रिअल इस्टेट, बॉण्ड्स,बँक FD इत्यादी ,जेणेकरून शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले तर इतर ठिकाणी आपले झालेले नुकसान भरून निघू शकते.
शेअर खरेदीच्या टिप्स चा वापर करू नका - Do not follow stock tips
शेअर खरेदी करण्यासाठी ई-मेल ,जाहिराती, मेसेज च्या माध्यमातून टिप्स देणारे अनेक संदेश आपल्याला येत असतात ,असे संदेश हे आपल्याला आर्थिक नुकसान देऊ शकतात. त्यामुळे अशा टिप्स पासून नेहमी दूर राहावे आणि आपण स्वतः चांगल्या कंपनीचे शेअर निवडावे.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे असेल तर "योग्य शेअर योग्य किंमतीवर खरेदी करणे आणि दीर्घकाळ आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करणे".
धन्यवाद...




Do not enter any spam link in comment box