शेअर बायबॅक - Share Buyback म्हणजे काय ?
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शेअर बायबॅक म्हणजे विद्यमान शेअर धारकांकडून कंपनीचे शेअर पुन्हा विकत घेणे होय.यासाठी कंपनी सद्या मार्केटमध्ये चालू असलेल्या शेअरच्या किमतीपेक्षा अधिक भाव देण्यास तयात होतात.
कंपनीला ज्यावेळेस शेअर बायबॅक करायचे असेल तेव्हा कंपनी सेकंडरी मार्केट मधून शेअर खरेदी करतात.
शेअर बायबॅक ही IPO च्या विरुद्ध पद्धती आहे ,असे आपण म्हणू शकतो कारण IPO मध्ये आपण कंपनीकडून शेअर खरेदी करतो तर शेअर बायबॅक मध्ये कंपनी शेअर धारकांकडून शेअर खरेदी करते.
टेंडर ऑफर आणि ओपन मार्केट या दोन पद्धतीने शेअर चे बायबॅक केले जाते.
कंपन्या शेअर बायबॅक का करतात ?
कंपनीकडे अतिरिक्त कॅश असणे -
तसे तर अनेक कारणासाठी कंपन्या Share Buyback करतात.पण सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कंपनीकडे असणारी अतिरिक्त कॅश.अतिरिक्त कॅश असणे हे कंपनीसाठी चांगले मानले जात नाही ,कारण त्याचा अर्थ असा मानला जातो की कंपनी आपल्याकडील पैसे व्यवस्थित गुंतवत नाही.त्यामुळे तोच पैसा कंपनी आपले शेअर खरेदी करण्यासाठी वापरतात.
टॅक्स सवलत -
काही वेळा डिव्हिडंड देण्यापेक्षा शेअर बायबॅक करणे कंपनी पसंद करतात.डिव्हिडंड मधून मिळणाऱ्या टॅक्स सवलती पेक्षा शेअर buyback मध्ये जास्त टॅक्स सवलती मिळतात त्याचा फायदा घेण्यासाठी सुद्धा कंपन्या शेअरचे बायबॅक करतात.
कंपनीत आपली गुंतवणूक वाढवणे -
जर एखाद्या कंपनीची मालकी कमी होत असेल तर कंपन्या आपल्याकडे उपलब्ध कॅश वापरून शेअर ची पुनःखरेदी करतात आणि आपली कंपनीतील मालकी वाढवण्याचा प्रयत्न करतात.
2020 मध्ये ओयो रूम्स ने आपल्या शेअर्धारकांकडून $1.5 billion शेअर परत खरेदी केले होते.हे शेअर बायबॅक चे एक ताजे उदाहरण आहे
शेअर बायबॅक चे परिणाम -
EPS - प्रति शेअर कमाई -
शेअर बायबॅक केल्याने कंपनीच्या EPS वर मोठा परिणाम होतो.EPS हा शेअर किंमत आणि एकूण नफा यावर अवलंबून असते.
तर शेअर बायबॅक केल्याने शेअरची संख्या कमी होते पण कंपनीचा नफा तसाच राहतो त्यामुळे कंपनीचा EPS वाढतो.वाढलेला EPS हा कंपनीच्या बाबतीत एक चांगला परिणाम असतो.
Return on Equity (ROE) and Return on Asset (ROA) वाढण्यास मदत होते.
शेअरची किंमत वाढण्यास मदत होते -
EPS ची किंमत वाढल्याने त्याचा चांगला परिणाम शेअरवर होऊन शेअरची खरेदी वाढते.त्याचा फायदा शेअरच्या किंमतीवर होतो आणि शेअर किंमती वाढण्यास मदत होते.तसेच शेअर buyback करणारी कंपनी ही आर्थिक दृष्ट्या सुदृढ मानली जाते आणि मार्केटमध्ये कंपनीचे नाव होण्यास मदत होते .या सर्व गोष्टींची कंपनीच्या शेअर किंमत वाढण्यास मदत होते.
शेअर बायबॅक विषयी सामान्य गुंतवणूक-दाराचे मत -
गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की शेअर्सच्या बाइबॅकची घोषणा ही कंपनीसाठी आगामी काळात फायदेशीर असणार आहे . तसेच असे मानले जाते की ते कंपनीच्या एकूण शेअर किंमतीवर परिणाम करेल.
गुंतवणूकदारांचा असा विश्वास असतो की भागधारकांकडील शेअर्सची पुनर्खरेदी मोठ्या कंपन्यांच्या नवीन आणि सुधारित उत्पादनांच्या निर्मितीची सुरुवात आहे .
शेअर बायबॅक म्हणजे एखाद्या कंपनीचे स्टॉक मूल्यांकन लवकरच वाढणार आहे. विशेष म्हणजे, अशा सकारात्मक संभावना दाखविण्यामुळे अशा अनुकूल परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घेऊ इच्छिणार्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यास मदत होते.
Buyback ची प्रक्रिया काय आहे?
सर्व प्रथम, कंपनीचे बोर्ड शेअर बायबॅकच्या प्रस्तावाला मंजूर करते.
यानंतर कंपनी बायबॅकसाठी एक सूचना जाहीर करते. यामध्ये रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक कालावधी नमूद केला जातो.
रेकॉर्ड तारखेचा अर्थ असा आहे की त्या दिवसापर्यंत कंपनीचे शेअर्स असलेले गुंतवणूकदार बायबॅकमध्ये भाग घेऊ शकतील.
जर आपली लॉंग टर्म इन्व्हेस्टटमेंट म्हणून एखाद्या कंपनीत गुंतवणूक असल्यास आपण शेअर buyback मध्ये विकण्यापेक्षा अधिक काळासाठी होल्ड करावेत.पण जर आपणास वाटत असेल की कंपनी चे valuation हे overvalue आहे म्हणजेच शेअर किंमत महाग आहे, तर आपण शेअर buyback द्वारे अधिकचा नफा कमावू शकता.
उदाहरण -
XYZ लिमिटेड या कंपनीने बायबॅक जाहीर केला आणि प्रति शेअर बायबॅक किंमत ही 100 रुपये ठेवली आणि बायबॅक ऑफरच्या तारखेला जर XYZ लिमिटेडची शेअर किंमत 80 रुपये असेल तर बायबॅक प्रीमियम (100 रु - 80 रु) म्हणजेच 20 रुपये असेल आणि प्रीमियम टक्केवारी 20% आहे.
TCS ,विप्रो या कंपन्या ने 2020 मध्ये buyback जाहीर केला होता.
तर आपण या लेखामध्ये शेअर बायबॅक काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, जर आपणास लेख आवडला असेल तर आम्हाला कंमेंट मधून कळवा आणि लेख जास्तीत जास्त social media वर शेअर करा.

Do not enter any spam link in comment box