Type Here to Get Search Results !

प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट काय आहे ? What is Primary market and secondary market in marathi .

 

primary market and secondary market


आपण अनेकदा प्राइमरी शेयर मार्केट (Primary Share Market ) आणि सेकंडरी शेअर मार्केट( Secondary share market ) विषयी ऐकले असेल.

तर आज आपण याच विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रायमरी आणि सेकंडरी शेअर मार्केट नक्की काय आहे ? आणि यामध्ये काय फरक आहे .



प्रायमरी शेअर बाजार

कोणत्याही कंपनीला पैसे उभारण्यासाठी काही पर्याय उपलब्ध असतात.पहिला म्हणजे बँकांकडून कर्ज घेणे.दुसरा म्हणजे शेअर बाजारातून पैसे उभे करणे.

बहुतेक कंपन्या दुसरा पर्याय निवडतात कारण बँकांकडून कर्ज घेणं व कर्जाचे हफ्ते आणि व्याज देने यापेक्षा शेअर मार्केट मधून पैसे उभारणे सोईस्कर वाटते.

म्हणजेच कोणतीही कंपनी ही शेअर बाजारात प्रथमच आपला शेअर बाजारात आणते त्याला प्राथमिक बाजार म्हणजेच प्रायमरी मार्केट असे म्हणतात.

आयपीओ - IPO

सोप्या भाषेत आपण त्याला IPO म्हणू शकतो कारण कोणतीही कंपनी ही IPO द्वारे सार्वजनिक होत असते.म्हणजेच सामान्य लोक सुद्धा त्यामध्ये शेअर खरेदी करू शकते.

IPO आणण्यासाठी सेबी कडे नोंदणी करणे आवश्यक असते.
एखाद्या कंपनीला आपल्या कंपनीचा आयपीओ आणायचा असेल तर त्यांनी कंपनीची वित्त, प्रवर्तक, व्यवसाय, शेअर्सची संख्या, त्याची किंमत इत्यादी माहिती सेबीला द्यावी लागते.
सेबीकडून आयपीओला मान्यता मिळाली की मग कंपनी आपला आयपीओ बाजारात खरेदीसाठी उपलब्ध करतात .यामध्ये प्रति शेअर किंमत आणि लॉट ची साईझ जाहीर करतात त्यानंतर आपण तो IPO खरेदी करू शकतो.

🎁 मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि आपल्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड च्या मदतीने आपण आपले अकाउंट ओपन करू शकता .




सेकंडरी शेअर बाजार

या बाजारात, सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स म्हणजेच ज्या कंपनीचे IPO पूर्वीच आलेले आहेत त्यांचे शेअर विकत घेतले जातात किंवा विकले जातात.

म्हणजेच NSE व BSE वर सध्या सुचिबद्ध असलेले शेअर म्हणजेच सेकंडरी मार्केट चे शेअर होय.

जसे की टाटा मोटर्स,MRF टायर्स, इन्फोसिस ,एशियन पेंट ,बजाज फायनान्स,महिंद्रा ,गोदरेज इत्यादी .
सेकंडरी बाजारात, आपण सुचिबद्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे शेअर NSE किंवा BSE वरून खरेदी किंवा विक्री करू शकतो. सहसा ही खरेदी-विक्री दलालमार्फत ( स्टॉक ब्रोकर) केली जाते. दुय्यम शेअर्स मार्केटमधूनच गुंतवणूकदाराला अशी सुविधा मिळते की तो आपले शेअर्स दुसर्‍याला विकून बाजारातून बाहेर पडू शकतो.

उदा.समजा टाटा मोटर्स कंपनीचा शेअर 250 रु. प्रति शेअर या दराने उपलब्ध आहेत व एखाद्या व्यक्तीला हा शेअर 250 रु. प्रति शेअर दराने जर खरेदी करायचा असेल तर आपल्या स्टॉक ब्रोकर कडे खरेदी साठी ऑर्डर टाकतो.

त्याचवेळेस जर दुसऱ्या व्यक्तीला टाटा मोटर्स कंपनीचा शेअर 250 रु विकायचा असेल तर तोही आपल्या ब्रोकर कडे विक्री ची ऑर्डर टाकतो.मग स्टॉक ब्रोकर खरेदी करणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यक्तींची ऑर्डर मॅच करून
खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडून शेअर चे पैसे घेऊन विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले जातात.
या बदल्यात ब्रोकरला काही दलाली (Brokerage )दिली जाते.

शेअर बाजार हे कंपन्यांसाठी निधी उभारण्याचे एक उत्तम माध्यम आहे. गुंतवणूकदार स्टॉक मार्केटच्या माध्यमातून सूचीबद्ध कंपनीत गुंतवणूक करतात. कंपनीचा व्यवसाय जसजसे वाढत जाईल तसे कंपनीच्या शेअर ची किंमत सुद्धा वाढते व तसतसे ते आपल्या गुंतवणूक केलेल्या रकमेवर नफा कमावतात.

तर अशा प्रकारे या लेखात आपण प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आपल्या प्रतिक्रिया कंमेंट द्वारे नक्की कळवा.


धन्यवाद......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.