Type Here to Get Search Results !

शेअर मार्केट म्हणजे काय ? शेअर काय आहे ? जाणून घ्या मराठीत माहिती .

 





नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले आपल्या मराठमोळ्या ब्लॉगवर मराठीतमाहीती.कॉम 

आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या औत्सुकाच्या विषयवार आणि तो म्हणजे शेअर मार्केट .

आपण या ब्लॉगवर शेअर मार्केट विषयी सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .एक एक करून आपण शेअर मार्केटविषयी माहिती पाहणार आहोत.





या लेखात आपण खालील गोष्टी पाहणार आहोत 

१ - शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ?

२ - शेअर म्हणजे काय ?

३ - शेअर मार्केट कसे काम करते ?

४ - शेअर मार्केट कामाची वेळ .

5  - शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधील फरक काय आहे ?


१ - शेअर मार्केट म्हणजे काय ?

बरेच लोक शेअर बाजाराला सट्टा ,जुगार असेही म्हणतात पण तसे नाहीय .जर आपण व्यवस्थित शेअर मार्केटचा अभ्यास करून चांगल्या कंपनीमध्ये आपला पैसा गुंतवला तर नक्कीच आपण चांगले पैसे कमावू शकतो .

आता आपण जाणून घेऊया नक्की शेअर मार्केट म्हणजे काय ?

तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शेअर मार्केट म्हणजे अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो .पूर्वी स्टॉक Exchange ला स्वतः जाऊन शेअर खरेदी किंवा विक्री करावी लागत असे.त्यावेळेस शेअर चे कागदी सर्टिफिकेट मिळत असे .

पण आता टेकनॉलॉजि मुळे घरबसल्या आपण कोणत्याही कंपनीचे शेअर आपल्या मोबाइल किंवा कॉम्पुटर वरून   खरेदी विक्री करू शकतो .त्यामुळेच बरेच लोक  आता  शेअर मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करत आहे .

शेअर बाजार हा आपल्या आठवडा बाजारासारखाच एक बाजार आहे जसे आपण आठवडा बाजारातून पैसे देऊन भाजीपाला खरेदी करतो तसेच शेअर मार्केट मधून आपण पैसे देऊन वेगवेगळ्या कंपन्यांचे  शेअर खरेदी करतो .

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला डिमॅट आणि ट्रेडिंग खाते आवश्यक आहे .


🎁आपल्याला हि जर शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल तर भारतातील सर्वोत्तम ब्रोकर झिरोधा ( Zerodha )मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते घरबसल्या अगदी सहजतेने ओपन करू शकता .
🎁 मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि आपल्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड च्या मदतीने आपण आपले अकाउंट ओपन करू शकता .


२ - शेअर म्हणजे काय ?

शेअर म्हणजेच कंपनीचा एक छोटा हिस्सा .ज्यावेळेस कोणतीही कंपनी शेअर बाजारात लिस्ट होते त्यावेळेस कंपनी आपल्या एका शेअरची किंमत ठरवत असते .त्यानंतर कंपनीच्या शेअर  किमतीमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते .हे कंपनीच्या व्यवसायावर अवलंबून असते .

ज्यावेळेस आपण कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करतो त्यावेळेस आपण त्या कंपनीचे शेअरच्या प्रमाणात मालक बनत असतो .

जितके जास्त शेअर आपण खरेदी करू तितक्या जास्त प्रमाणात आपली कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढते .शेअरच्या किंमती ह्या दरदिवशी कमी जास्त होत असतात .यासाठी शेअर्सची निगडित अनेक गोष्टी कारणीभूत असतात .जसे कि शेअर्सची निगडित बातम्या ,कंपनीचे आर्थिक माहिती ,जागतिक स्तरावरील घडामोडी ,कंपनीचा व्यवसाय कसा आहे  इत्यादी .


३ - शेअर मार्केट कसे काम करते ?

शेअर मार्केट ला नियंत्रित करण्यासाठी सेबी हि संस्था कार्य करते .जसे बँकांना भारतीय रिज़र्व बैंक नियंत्रित करते.शेअर बाजारातील धोके,फसवणूक,नवीन कंपनी शेअर बाजारात लिस्ट करणे ,शेअर बाजारातील व्यवहार सुरळीत पार पाडणे हे सेबीचे मुख्य काम आहे .

शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी विक्री करण्यासाठी दोन मुख्य बाजार आहेत .

NSE - नॅशनल स्टॉक एक्सचेंज  -दिल्ली 

BSE - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज  - मुंबई 

यापैकी कोणत्याही एक्सचेंज मधून आपण शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो .

ज्यावेळेस आपण शेअर खरेदी किंवा विक्रीसाठी ऑर्डर टाकतो त्यावेळेस आपल्या ब्रोकर कडून ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंज   ला जाते तिथे ऑर्डर चेक करून आपली ऑर्डर हि पूर्ण होते .

एकदा आपली ऑर्डर पूर्ण झाली कि २ दिवसानंतर हे शेअर आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात .डिमॅट अकाउंट मधील शेअर आपण केंव्हाही विकू शकतो .जितके जास्त दिवस आपण चांगल्या कंपनीचे शेअर आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करतो तितका आपल्याला जास्त नफा होऊ शकतो .


४ - शेअर मार्केट कामाची वेळ .

शेअर मार्केट मध्ये आपल्याला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी खालील वेळ उपलब्ध  असते .

मार्केट पूर्व सत्र - 

हे सत्र सकाळी 9.00 ते 9.15 पर्यंत असते. कोणत्याही सिक्युरिटीज खरेदी किंवा विक्री करण्याचे आदेश यावेळी दिले जाऊ शकतात.परत्नू आपली ऑर्डर हि मार्केट  उघडल्यावरच पूर्ण होते .

सामान्य सत्र - सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३०

 सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत आपण शेअर मार्केट मध्ये कोणताही शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो .

समापन सत्र- दुपारी ३:३० ते ४:०० 

 भारतातील शेअर बाजार बंद होण्याची वेळ दुपारी 3.30 वाजता आहे. या कालावधीनंतर कोणतीही शेअरची देवाणघेवाण होत नाही. फक्त शेअर मार्केट ची बंद किंमत निश्चित करण्यासाठी हे सत्र असते .

याशिवाय दर शनिवार आणि रविवार व सरकारी सुट्ट्यामध्ये शेअर मार्केट मधील सर्व व्यवहार बंद असतात .

दरवर्षी दिवाळीच्या वेळेस एक दिवस सांयकाळी ५:३० ते ६:४० व वेळेत मुहूर्त ट्रेडिंग साठी शेअर बाजार चालू असतो .कारण हे शुभ मानले जाते .


5  - शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधील फरक काय आहे ?

शेअर ट्रेडिंग म्हणजेच शेअर खरेदी करून लगेच विकणे होय त्यालाच आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणू शकतो .यामध्ये पैसा झटपट मिळू शकतो तसाच लवकर नुकसान पण होऊ शकते ,त्यामुळेच आपण जर नवीन असाल तर ट्रेडिंग करण्या पेक्षा गुंतवणुविकार भर दिला पाहिजे .शेअर मार्केट मध्ये अनुभव आल्यावर आपण ट्रेडिंग मधून पैसा कमावू शकतो .

इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक म्हणजेच चांगल्या कंपनीचा शेअर खरेदी करून आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये काही महिने,काही वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी होल्ड करून ठेवणे.सुप्रसिद्ध शेअर मार्केट गुंतवणूकदार वॉरेन बफे, राकेश झुणझुणवाला, राधाकिशन दमानी यांनी इन्व्हेस्टमेंट करूनच शेअर बाजारातून खूप सारा पैसा कमावला आहे.

आपणही शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमावू शकतो.

त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीत पैसे गुंतवून जास्त काळासाठी शेअर होल्ड करायचा आहे.व शेअरची किंमत जास्त वाढली की आपण आपल्या गरजेनुसार शेअर विकू शकतो.


तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढील पोस्ट मध्ये आपण अजून शेअर मार्केट विषयी जाणून घेणार आहोत.

जर आपणास ही पोस्ट  आवडली असेल तर नक्की शेअर करा.

धन्यवाद.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.