शेअर मार्केट हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे.खूप सारे लोक हे शेअर मार्केट विषयी खूप उत्सुक असतात.पण शेअर मार्केट विषयी माहिती मराठी भाषेमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असते.म्हणूनच या ब्लॉग मध्ये शेअर मार्केट विषयी माहिती आपल्या मातृभाषेत उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे .
आपण जर शेअर मार्केट मध्ये नवीन असाल व आपणास शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर सर्वात पहिले आपल्याला एक ट्रेडिंग आणि डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.
डिमॅट आणि ट्रेडिंग खाते शिवाय आपण शेअर मार्केट मध्ये शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही.
म्हणूनच आपणास या लेखामध्ये डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट काय आहे ?,ते कसे ओपन करायचे ?,त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
सुरुवातीला आपण पाहूया डिमॅट खाते म्हणजे काय?
डिमॅट खाते म्हणजे काय?
जसे आपण आपले पैसे हे एका बँक खात्यात जमा करतो तसेच आपण खरेदी केलेले शेअर्स आणि सिक्युरिटीज डीमटेरियलाइझ्ड खात्यात म्हणजेच आपल्या डिमॅट खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवले जातात.
पहिल्यांदा 1996 मध्ये शेअर बाजाराने डिमटेरियलायझेशन शेअर ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली.
त्यापूर्वी शेअरची कागदपत्रे ही कागदी स्वरूपात असायची त्यामुळेच ती गहाळ होणे,चोरी होणे अशी प्रकरणे होत असतं.यालाच आळा घालण्यासाठी शेअर बाजाराने डिमटेरियलायझेशन
पद्धत सुरू केली.
यामध्ये शेअर खरेदी केल्यावर इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीज आपल्या डिमॅट खात्यात जमा केल्या जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर, डीमॅट खाते एक प्रकारचे बँक खाते आहे जे आपले सर्व शेअर हे डिजिटल किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात आपल्या खात्यावर जमा करते .
शेअर सोबतच आपण बाँड,म्युच्युअल फंड,एक्सचेंज ट्रेड फंड(ईटीएफ) आणि सरकारी सिक्युरिटीज आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ठेवू शकतो.
तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी आपणास डिमॅट खाते अनिवार्य नाही .परंतु शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.
डीमॅट खाते कसे कार्य करते?
डीमॅट खात्याच्या कामात चार घटक मुख्य आहेत.सेंट्रल डिपॉझिटरी
राष्ट्रीय सुरक्षा डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) ही भारतातील दोन मुख्य डिपॉझिटरीज आहेत ज्यामध्ये आपल्या सर्वांची डीमॅट खाती आहेत. या डिपॉझिटरीजमध्ये आपले शेअर तसेच इतर प्रमाणपत्रे ही जतन केली जातात.युनिक ओळख क्रमांक
ज्यावेळेस आपण आपले डिमॅट खाते उघडतो त्यावेळेस आपणास एक युनिक क्रमांक दिला जातो. जो क्रमांक आपणास शेअर खरेदी आणि विक्री करताना गरजेचा असतो.त्या क्रमांकावरून आपल्या खात्यात शेअर जमा किंवा आपल्या खात्यातून कमी केले जातात.डिपॉझिटरी सहभागी
डिपॉझिटरी सहभागी हे आपल्याला डिपॉझिटरीला प्रवेश देतात आणि मध्यवर्ती डिपॉझिटरी आणि दरम्यानचे मध्यस्थ म्हणून काम करतात.ही सुविधा पुरवणारे डिमॅट सेवा देणारी एखादी बँक किंवा शेअर मार्केट ब्रोकर असू शकतो.
पोर्टफोलिओ तपशील
एकदा आपण आपले डिमॅट खाते उघडले की आपण आपले सर्व व्यवहार आपल्या डिमॅट खात्यात पाहू शकतो.शेअर खरेदी केला किंवा विक्री केला तरी तो शेअर आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये उपडेट झाला आहे की नाही हे आपण तपासू शकतो.
डिमॅट खाते शुल्क
डिमॅट खाते उघडण्यापूर्वी आपण वेगवेगळ्या डीमॅट खाते पुरवणाऱ्या दलाल (स्टॉक ब्रोकर ) किंवा बँकेची शुल्काची चौकशी करू शकतो.वेगवेगळे ब्रोकर हे वेगवेगळे शुल्क आकारत असतात तसेच त्याप्रमाणे सुविधाही पुरवत असतात.
शुल्काची तुलना करून आपण आपल्या आवड व गरजेनुसार डिमॅट खाते उघडू शकतो.
जसे कीं डिस्काउंट ब्रोकर हे कमी शुल्कामध्ये आपल्याला सुविधा पुरवतात.उदा.Zerodha, Upstox,5 Paisa etc तर काही ब्रोकर हे इतर सुविधा पुरवून जास्त पैसे आकारतात.
जसे की Sharekhan,Angel broking etc
ट्रेडिंग अकाऊंट म्हणजे काय ?
ट्रेडिंग अकाऊंट हे आपल्याला ऑनलाईन शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी गरजेचे असते.ट्रेडिंग अकाउंट ने आपण कोणत्याही कंपनीचा शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. आपल्या खरेदी विक्री चा तपशील आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये मिळतो.डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये काय फरक आहे?
स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकची खरेदी-विक्री ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ट्रेडिंग खाते वापरले जाते.तर डिमॅट खाते बँकेच्या रूपात वापरले जाते जिथे खरेदी केलेले शेअर्स डिमॅट खात्यात जमा केले जातात आणि विक्री केलेले शेअर्स डिमॅट खात्यातून कमी केले जातात.
डिमॅटचे काही फायदे
- शेअरधारकाला बोनस शेअर्सचे वाटप झाल्यावर ते लगेच शेअर्धरकाच्या खात्यात देण्यात येतात.
- आपले शेअर प्रमाणपत्र हे गहाळ होणे, चोरी किंवा तश्याप्रकारचा कुठलाही धोका राहात नाही.
- स्टॉक मार्केट मध्ये जाऊन व्यवहार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी खर्च लागतो.
- आपणास कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागत नाही.
- सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात त्यामुळे पारदर्शकता येते.धोका कमी होतो.
डिमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया
ऑफलाइन प्रक्रिया -
1. सर्वप्रथम तुम्हाला डिमॅट खाते कोठे उघडायचे आहे ते निवडा आणि त्यानंतर डिमॅट खाते साठी एक डिपॉझिटरी निवडा. बहुतेक ब्रोकर आणि बँका , वित्तीय संस्था ही सेवा आपल्याला देतात.2. त्यानंतर खाते उघडण्याचा फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र पाठवा. आपल्याकडे पॅन कार्ड असणे देखील आवश्यक आहे. सत्यापनासाठी मूळ कागदपत्रे देखील सोबत ठेवा.
3. आपल्याला नियमांची एक प्रत प्रदान केली जाईल, कराराच्या अटी तसेच अकाउंट ओपन करण्यासाठी घेतले जाणारे शुल्क.
4. प्रक्रिये दरम्यान व्यक्तीची पडताळणी केली जाईल. खाते उघडण्याच्या फॉर्ममध्ये प्रदान केलेला तपशील तपासण्यासाठी डीपीच्या स्टाफचा एखादा सदस्य आपल्याशी संपर्क साधू शकतो.
5. अर्जावर प्रक्रिया झाल्यानंतर डीपी तुम्हाला डीमॅट खाते क्रमांक व ग्राहक आयडी देईल. आपण आपल्या डिमॅट खात्यावर ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी हा तपशील वापरू शकता.
6. डिमॅट खातेधारक म्हणून, आता आपण शेअर खरेदी आणि विक्री साठी पात्र असाल.आपल्या आयडी आणि पासवर्ड ने आपण आपल्या मोबाईल,कॉम्प्युटर वर घरबसल्या ट्रेडिंग करू शकता.
ऑनलाईन प्रक्रिया -
आता बहुतेक ब्रोकर हे ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्याची सुविधा देतात.त्यासाठी आपल्याला आपला आवडीचा ब्रोकर निवडायचा आहे.आणि खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
त्यांनतर आपण आपले अकाउंट घरबसल्या अगदी सहजतेने ओपन करू शकता.
डिमॅट खात्यासाठी लागणारी कागदपत्रे
डिमॅट खाते सुरु करण्यासाठी बहुतेक ब्रोकर आता ऑनलाईन सुविधा देत आहे. शेअर्सचे व्यवहार करणाऱ्या दलालाशी करार करावा लागतो.तरी आपणास खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा -
जर तुम्हाला फ्युचर्स आणि पर्याय - इक्विटी, कमोडिटी आणि चलनात व्यापार करायचा असेल तर उत्पन्नाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. आपण खालील कागदपत्रांपैकी एक सादर करू शकता.
फॉर्म -16
प्राप्तिकर परताव्याची पावती
6-महिन्यांचे बँक स्टेटमेंट
नवीनतम पगार स्लिप
डिमॅट होल्डिंग स्टेटमेंट, किंवा
बँक खाते स्टेटमेंट
सहीचा फोटो किंवा स्कॅन कॉपी
बॅंकेचा क्रॉस चेक
आपले आधारकार्ड
तर या लेखात आपण डिमॅट आणि ट्रेडिंग खाते काय आहे आणि ते कसे ओपन करायचे हे जाणून घेतले.
जर आपणास काही शंका असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
धन्यवाद..😊




Do not enter any spam link in comment box