Type Here to Get Search Results !

निफ्टी आणि सेन्सेक्स म्हणजे काय ? what is Nifty and Sensex in Marathi .

 



आपण अनेकदा टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रात सेन्सेक्स 1000 अंशांनी कोसळला किंवा निफ्टी 200 अंशांनी वर गेला अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील.तर आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत की नक्की सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय ?.


तर निफ्टी आणि सेन्सेक्स हे भारतीय शेअर बाजराचे निर्देशांक आहेत. त्यामुळे सुरुवातीला आपण पाहूया निर्देशांक म्हणजे काय ?

निर्देशांक म्हणजे काय ?

निर्देशांक हे आपल्याला शेअर बाजाराची दिशा दाखवतात. मार्केट तेजीत आहे की मंदीत हे समजण्यासाठी शेअर बाजार निर्देशांक खूप महत्वाची भूमिका बजावतात.शेअर बाजारात लहान मोठ्या 5000 हुन अधिक कंपन्या आहेत.

प्रत्येक कंपनीला आपण दररोज पाहू शकत नाही त्यासाठी काही निवडक कंपन्यांचा मिळून एक निर्देशांक बनवला जातो.भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे मुख्य निर्देशांक आहेत ज्यावरून आपण शेअर बाजाराची दिशा ठरवू शकतो.

आता आपण एक एक करून पाहूया सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे ?.

सेन्सेक्स - Sensex हणजे काय ?

सेन्सेक्स म्हणजेच सेन्सिटिव्ह इंडेक्स (Sensitive Index ).सेन्सेक्स हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चे मानक निर्देशांक आहे .सेन्सेक्स मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असणाऱ्या 30 सर्वोत्तम कंपन्यांचा समावेश होतो.सेन्सेक्स मधील कंपन्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी आणि विक्री होत असते.

सेन्सेक्स निर्देशांक हे भारतातील सर्वात जुने निर्देशांक आहे.

गुंतवणूकदारांकडून अर्थव्यवस्थेची झालेली एकूण वाढ, विशिष्ट उद्योगांचा विकास, आणि बाजारातील उतार-चढाव पाहण्यासाठी सेन्सेक्सचा उपयोग केला जातो.

BSE चे सेन्सेक्स व्यतिरिक्त आणखी काही निर्देशांक आहेत.
उदा. BSE ५००, BSE स्माॅल कॅप, BSE मिडकॅप,BSEलार्ज कॅप.
सेन्सेक्स मध्ये वित्तीय, वाहन, भांडवली वस्तू उद्योग, बँकिंग, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, उर्जा, धातू व खाण, दूरसंचार या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो.

सेन्सेक्स मधील कंपन्या

  • हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स काॅर्पोरेशन
  • सिपला
  • भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • आयसीआयसीआय बँक
  • स्टरलाईट इंडस्ट्रीज
  • विप्रो
  • डीएलएफ
  • बजाज ऑटो
  • कोल इंडिया
  • एचडीएफसी बँक
  • हिरो मोटोकाॅर्प
  • ओएनजीसी
  • इन्फोसिस
  • रिलायन्स इंडस्ट्रीज
  • सन फार्मा
  • गेल
  • जिंदाल स्टील
  • भारती एअरटेल
  • मारुती सुझुकी
  • एनटीपीसी
  • टीसीएस
  • टाटा पाॅवर
  • हिंदाल्को इंडस्ट्रीज
  • लार्सन अँड ट्युब्रो
  • महिंद्रा अँड महिंद्रा
  • टाटा मोटर्स
  • टाटा स्टील
  • हिंदुस्थान युनिलिव्हर
  • आयटीसी

आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा

🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.






🎁5Paisa मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.




🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.



निफ्टी - Nifty म्हणजे काय ?


निफ्टी हा शब्द नॅशनल आणि फिफ्टी (National + Fifty ) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.निफ्टी मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज 50 कंपन्यांचा समावेश होतो.

निफ्टी मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या १२ क्षेत्रांचा समावेश आहे - जसे की माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, ग्राहक वस्तू, करमणूक आणि माध्यम, वित्तीय सेवा, धातू, फार्मास्युटिकल्स, दूरसंचार, सिमेंट आणि त्याची उत्पादने, वाहन, कीटकनाशके आणि खते, ऊर्जा आणि इतर सेवा.

1600 ट्रेडिंग होणाऱ्या कंपन्या पैकी निफ्टी इंडेक्स हे टॉप 50 कंपन्यांचा निर्देशांक दाखवते.निफ्टी मध्ये दुसरे अनेक निर्देशांक आहेत - निफ्टी 50, निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी नेक्स्ट 50.

निफ्टी मधील काही महत्वाच्या कंपन्या

  • TCS
  • इन्फोसिस
  • एशियन पेंट
  • कोल इंडिया
  • सिपला
  • बजाज ऑटो
  • मारुती सुझुकी
  • ONGC
  • ITC
  • टेक महिंद्रा
  • ICICI बँक
  • भारती ऐरटेल
  • टाटा मोटर्स
  • बजाज फिनसेर्व
  • SBI
  • नेस्ले

तर अशा प्रकारे आपण जाणून घेतले की निफ्टी आणि सेन्सेक्स काय आहे.

धन्यवाद.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.