शेअर बाजारात ज्यावेळेस आपण शेअर खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्यला ऑर्डर चे वेगवेगळे प्रकार दिसतात जसे कि लिमिट ऑर्डर,मार्केट ऑर्डर, स्टोपलॉस ऑर्डर इ. तर आपण या लेखात शेअर मार्केट ऑर्डर चे वेगवेगळे प्रकार काय आहेत हे जाणून घेणार आहोत .
ऑर्डर म्हणजे काय?
ऑर्डर म्हणजे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर किंवा स्टॉक ब्रोकरला स्टॉक विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी दिलेली सूचना असते . स्टॉक ब्रोकरला गुंतवणूकदाराने दिलेल्या निर्देशांशिवाय ऑर्डर म्हणजे दुसरे काहीच नसते. शेअर बाजारात ऑर्डरचे वेगवेगळे प्रकार आहेत.आपण एक एक करून ते पाहणार आहोत .
मार्केट ऑर्डर - Market Order
मार्केट ऑर्डर ( Market order ) म्हणजे सध्याच्या बाजार भावावर स्टॉक खरेदी करणे किंवा विक्री करणे.
एकदा की ही ऑर्डर आपण टाकली तर त्वरित कार्यान्वित केली जाते. मार्केट ऑर्डरचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ते ऑर्डरच्या अंमलबजावणीची हमी देते. तथापि, कोणत्या किंमतीवर ऑर्डरची अंमलबजावणी होईल त्याची हमी दिली जाऊ शकत नाही.म्हणजेच आपण एकदा मार्केट ऑर्डर आपल्या स्टॉक ट्रेडिंग अँपवर टाकली कि ती ऑर्डर लगेच पूर्ण होते .
उदाहरणार्थ,
स्टॉक ABC ची सध्याची बाजार किंमत १०० रुपये आहे. आपण या किंमतीवर स्टॉक खरेदी करण्यासाठी स्टॉक मार्केट मध्ये ऑर्डर टाकल्यावर आपल्या ऑर्डरची त्वरित अंमलबजावणी होईल आणि ऑर्डर पूर्ण होईल .
परंतु , ABC हा स्टॉक १०० रुपये दराने खरेदी होईल की नाही याची शाश्वती नाही. कारण शेअर मार्केट मध्ये स्टॉक च्या किमती कमी जास्त होत असतात.पण १०० रु च्या आसपास हा शेअर आपल्याला मिळेल .
लिमिट ऑर्डर - Limit Order
लिमिट ऑर्डर - Limit Order आपल्याला पाहिजे असलेल्या किंमतीवर स्टॉक ऑर्डर करण्याची परवानगी देते. म्हणजेच काय तर आपण आपल्याला हव्या असलेल्या किमतीवर शेअर खरेदी करू शकतो .
तर, खरेदी लिमिट ऑर्डरचा - Limit buy order चा अर्थ असा आहे की आपण विशिष्ट किंमतीवर किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत शेअर खरेदी करण्यास तयार आहात.
आणि विक्री लिमिट ऑर्डरचा - Limit sell order चा अर्थ असा आहे की आपणास शेअर लिमिट किंमतीवर किंवा त्याहून अधिक किंमतीला विकायचा आहे.
बाजार ऑर्डरच्या विपरीत या ऑर्डरची अंमलबजावणी होईल याची शाश्वती नाही.म्हणजेच मार्केट ऑर्डर एकदा टाकली कि लगेच पूर्ण होते परंतु लिमिट ऑर्डर पूर्ण होईलच याची शाश्वती नाही कारण आपण जी किंमत लिमिट किंमत म्हणून टाकली असेल त्या किंमतीला जर शेअर गेला नाही तर आपली ऑर्डर पूर्ण होत नाही .
हे एका उदाहरणाद्वारे चांगले समजले जाऊ शकते.
जर तुम्ही 50 रुपयांच्या समभागांसाठी बाय लिमिट ऑर्डर - buy limit order दिली तर याचा अर्थ असा की तुम्ही तो स्टॉक 50 च्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला खरेदी करण्यास तयार आहात.
त्याचप्रमाणे 50 रुपयांच्या विक्री लिमिट ऑर्डर म्हणजे तुम्हाला 50 रू किंवा त्याहून अधिक किंमतीला स्टॉक विकायचा आहे.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सुनिश्चित करण्यास आपल्याला मदत करते की योग्य किंमत मिळविण्यासाठी आपल्याला प्रत्येक सेकंदाला स्टॉक ट्रेंड अनुसरण ( trend analysis ) करण्याची आवश्यकता नाही.
लिमिट ऑर्डर limit order आपल्या ट्रेडिंगला विशिष्ट प्रमाणात स्वयंचलित करते. अशा ऑर्डर एक दिवस, काही आठवडे आणि कधीकधी अगदी महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात.
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्टॉप लॉस ऑर्डर - Stop loss order
स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजेच जेव्हा शेअर च्या किंमती विशिष्ट मूल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा स्टॉक खरेदी ( buy) करण्याची किंवा विक्री (sell ) करण्याची एक ऑर्डर आहे. हे मूल्य ‘स्टॉप प्राइस’( stop price ) म्हणून ओळखले जाते.
जोपर्यंत स्टॉप प्राइस हि पोहचत नाही तोपर्यंत स्टॉप ऑर्डर सुप्त राहते. आणि एकदा किंमत स्टॉप प्राइस ला पोहोचल्यानंतर स्टॉप ऑर्डर (stop loss order ) मार्केट ऑर्डर ( market order ) किंवा लिमिट ऑर्डर ( limit order ) बनते आणि आपली ऑर्डर पूर्ण होते .
आपल्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी वेळ नसल्यास स्टॉप लॉस ऑर्डर ( stop loss order ) उपयुक्त आहे.
उदाहरणार्थ,
आपल्याला माहिती आहे की स्टॉक XYZ ची किंमत 35 रुपये असेल व त्या शेअरची किंमत ३५ रु च्या खाली म्हणजेच ३२ रु .३० रु . २५रु किंमतीपेक्षा कमी झाली तर आपणास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.
परंतु आपण स्टॉकचे नियमितपणे निरीक्षण करू शकत नसल्यामुळे किंवा नोकरी व्यवसायामुळे वेळ नसेल तर , एकदा या पातळीवर पोहोचला की आपण शेअर विकण्याची ,स्टॉप ऑर्डर( stop loss order) देऊ शकता.
अशाप्रकारे, आपणास मोठा तोटा टाळता येईल. म्हणूनच या प्रकारच्या ऑर्डरला ‘स्टॉप-लॉस’ ऑर्डर म्हणून ओळखले जाते.
शेअर मधून फायदा मिळवणे आणि अधिक नुकसान टाळणे यासाठी शेअरच्या किमतीवर सतत लक्ष ठेवून,झटपट निर्णय घ्यावा लागतो .
ब्रॅकेट ऑर्डर्स : BO Order
ब्रॅकेट ऑर्डर्स मध्ये जर आपण एखादी ऑर्डर खरेदी किंवा विक्रीस टाकली असता आपली ती ऑर्डर पूर्ण झाली की त्याचबरोबर लगेच ट्रिगर आणि स्टॉपलॉस या दोन ऑर्डर टाकल्या जातात .
ट्रिगर ऑर्डरने आपल्यला शेअरचा योग्य भाव आल्यावर शेअर विकून नफा कमवता येतो . तर जर शेअरची किंमत खाली जात असेल व तोटा होण्याची शक्यता असल्यास स्टॉपलॉस ऑर्डरमूळे आपले नुकसान हे मर्यदित केले जाते .
ट्रिगर ऑर्डर किंवा स्टोपलॉस ऑर्डर यापैकी कोणतीही एक ऑर्डर पूर्ण झाली की दुसरी ऑर्डर लगेच रद्द होते. आपल्यला ट्रिगर किंमत आणि स्टॉपलॉस किंमत ज्यावेळेस आपण मुख्य ऑर्डर टाकतो त्यावेळेसच टाकाव्या लागतात .
एकदा का आपण दोन्ही ऑर्डर टाकल्या कि मग शेअरच्या भावात होणाऱ्या किमतीकडे लक्ष ठेवण्याची गरज नसते. यामुळे आपण एक तर नफा मिळू शकतो अथवा आपला तोटा मर्यदित राहतो .
कव्हर ऑर्डर्स :CO order
कव्हर ऑर्डर्स ही ब्रॅकेट ऑर्डर प्रमाणेच एक ऑर्डर आहे. फक्त या ऑर्डर मध्ये ब्रॅकेट ऑर्डर सारखा ट्रिगर लावला जात नाही फक्त स्टॉपलॉस लावला जातो यामुळे जर शेअरची किंमत कमी झाली तर ,त्यामुळे होणार तोटा हा मर्यादीत रहातो.
जर शेअरची किंमत वाढली तर नफा घेण्यासाठी आपल्याला विक्रीची ऑर्डर नव्याने टाकावी लागते आणि त्यासाठी शेअरचे भावावर सतत लक्ष ठेवावे लागते.
ऑर्डर पूर्ण होईपर्यत आपण आपल्या स्टॉप लॉस च्या किमती किंवा ऑर्डर बदलू शकतो .
मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ ऑर्डर (MIS) Intraday order
इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात केलेला खरीदी विक्री व्यवहार.
उदाहरणार्थ ,
समजा तुम्ही सकाळी ११ वाजता एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतले तर ते दुपारी ३:३० वाजता बाजार बंद व्हायच्या आधी विकून टाकणे अनिवार्य आहे . जर आपण हे शेअर विकले नाही तर ते शेअर आपोआपच असेल त्या भावावर विकले जातात . त्यामुळे शेअर विकत घेण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे .
इंट्राडे ट्रेडिंग साठी आपल्याला मार्जिन मिळते म्हणजेच जर एखाद्या शेअरची किंमत १०० रु असेल तर तो शेअर मार्जिन मध्ये आपण कमी किंमतीमध्ये जसे कि ५०रु ,४० रु ,अशा भावामध्ये खरेदी करू शकतो .
जर इंट्राडे मध्ये शेअर च्या किंमती खाली गेल्यामुळे नुकसान होत असेल तर आपण हे शेअर डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये बदलू शकतो .
हा प्रकार शेअर मार्केट च्या एक्सपर्टस लोकांसाठी आहे . त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर इंट्राडे ट्रेडिंग करणे हे नुकसानदायक ठरू शकते . त्यापेक्षा सुरुवातीला शेअर बाजार कसे काम करते हे शिकणे महत्वाचे आहे त्यानंतर हळू हळू आपण शेअरमध्ये ट्रेडिंग करू शकता .
या लेखात आपण शेअर मार्केट मधील वेगवेगळ्या ऑर्डर कोणकोणत्या आहेत ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला .
मित्रानो हा लेख आपल्याला कसा वाटला कंमेंट द्वारे नक्की कळवा .
धन्यवाद ...




Do not enter any spam link in comment box