Type Here to Get Search Results !

ब्लॉगिंग म्हणजे काय ? आणि ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे ?

 




आपण अनेकदा ब्लॉग,ब्लॉगिंग,ब्लॉगर ,पोस्ट असे अनेक शब्द ऐकले किंवा वाचले असेल. तर या लेखात आपण ब्लॉगिंग म्हणजे काय आणि त्यातून पैसे कसे कमवायचे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.चला तर मग सुरु करूया .


ब्लॉग म्हणजे काय?

अनेक लोकांना काही ना काही लिहायचा छंद असतो म्हणून ते कागदावर कविता,कथा,गोष्टी किंवा एखाद्या विषयवार माहिती लिहितात . आणि मग त्यातील काही लोक त्याचे पुस्तक छापून प्रकाशित करतात व लोकांपर्यंत पोहचवतात . पण आता २१ व्या शतकात तंत्रज्ञानामुळे बहुतेक लोकांकडे कॉम्पुटर,मोबाईल ,इंटरनेट पोहचले आहे . त्याचाच फायदा घेऊन ब्लॉगर आपले ब्लॉग लोकांपर्यंत पोहचवतात . त्यासाठी पुस्तक छापण्याची कोणतीच गरज नसते .

तर ब्लॉग म्हणजेच आपण एखाद्या विषयवार लिहिलेले आपले विचार होय .आपला विषय कोणताही असू शकतो जसे कि आर्थिक,राजकीय,कथा ,बातम्या ,मनोरंजन ,स्टेटस ,आरोग्य ,पाककला इत्यादी . आपण आपले विचार डिजिटल माध्यमातून लिहिणे म्हणजेच ब्लॉग .

ब्लॉग लिहिण्यासाठी आपल्याला एका ब्लॉगिंग वेबसाइट ची गरज असते .ब्लॉगिंग वेबसाईट ,डोमेन ,होस्टिंग ,ऍडसेन्स हे काय आहे ते आपण एक एक करून पाहणार आहोत .

ब्लॉगिंग म्हणजे काय ?

ब्लॉग म्हणजे लिहिणे . आणि ब्लॉगिंग म्हणजेच ब्लॉग लिहिणे ,त्याला व्यवस्थितरीत्या सजवणे मग त्याला आपल्या वेबसाईट वर पोस्ट करणे , त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे आणि एकदा का आपला ब्लॉग लोकप्रिय झाला कि मग त्यातून पैसे कमावणे .

ब्लॉग लिहिण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ब्लॉग ची गुणवत्ता म्हणजेच आपण जे लिहीत आहे ते लोकांसाठी किती उपयुक्त आहे हे तपासणे .

पोस्ट लिहिताना नेहमी आपण ज्या विषयवार लिहीत आहे त्याविषयी पूर्ण माहिती घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे .

दुसरे म्हणजेच सातत्यता - नियमित आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर नवीन विचार किंवा माहिती टाकणे गरजेचे आहे .

ब्लॉगिंग करण्याचे फायदे काय आहेत ?

१ - आपले विचार मांडणे -

ब्लॉग च्या माध्यमातून आपण आपले विचार अगदी मोकळ्यापणाने जगासमोर मांडू शकतो . आपण आपल्या जवळील माहिती जगाला देऊ शकतो . कारण ब्लॉगवरील माहिती संपूर्ण जगातील लोक कधीही वाचू शकतात त्याला काही मर्यादा नाहीत .

२ - लोकप्रियता मिळवणे -

लोकप्रियता मिळवणे कोणाला आवडत नाही खरे तर प्रत्येक व्यक्ती या जगात लोकप्रिय होण्यासाठी धडपडत असतो आणि ब्लॉगिंग च्या माध्यमातून आपण आपले हे स्वप्न पूर्ण करू शकतो . एखाद्या चांगल्या विषयवार आपण सातत्याने लिहून आपण लोकप्रिय ब्लॉग बनवू शकतो .
ब्लॉगिंग च्या माध्यमातून अनेक तरुण अगदी ग्रामीण भागातील तरुण सुद्धा खूप लोकप्रिय झाले आहेत .

३ - पैसे कमावणे -

एकदा का आपण वरील दोन गोष्टी मिळवल्या कि पैसे मिळवणे आपल्यला काहीच अवघड नाही . आपल्या ब्लॉगला जर सतत लोकांनी भेट दिली तर आपल्या ब्लॉगवर ट्राफिक वाढते आणि त्यातून आपण वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमावू शकतो जसे कि ऍडसेन्स जाहिराती ,Promotion. .

आपण गूगल वर शोधून पाहू शकता की भारतातील कितीतरी ब्लॉगर ब्लॉग लिहून महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत.
परंतु त्यासाठी मेहनत,सातत्यपूर्ण ब्लॉग लिहिणे,ब्लॉग लोकप्रिय करणे अशा अनेक गोष्टी असाव्या लागतात.

ब्लॉगचे प्रकार -

इव्हेंट ब्लॉग -तात्पुरते ब्लॉग

या प्रकारच्या ब्लॉग मध्ये असणारे ब्लॉग हे कमी कालावधी साठी असतात.उदा.दिवाळी,होळी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे ब्लॉग.हे फक्त त्या सणाच्या कालावधीसाठी वापरले जातात.

पर्मनंट ब्लॉग - कायमस्वरूपी ब्लॉग -

या ब्लॉग्स मधील माहिती ही आपण कधीही वापरू शकता.
ब्लॉग पोस्ट लिहिताना आपल्याला त्याविषयी संपूर्ण माहिती घेऊन ब्लॉग पोस्ट लिहायला लागते.ब्लॉगिंग मध्ये ब्लॉग कन्टेन्ट हे सर्वात महत्त्वाचे आहे.

तसेच या प्रकारच्या ब्लॉग मधून पैसे कमावण्यासाठी खूप संयम आणि मेहनत गरजेची आहे.

ब्लॉग कोण सुरू करू शकतो -

कोणीही व्यक्ती ज्याला लिहिण्याची आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवड आहे असा व्यक्ती ब्लॉग सुरू करू शकतो.त्यासाठी कोणत्याही शैक्षणिक डिग्री ची गरज नसते .हो पण जर कॉम्पुटर कोडींग चे ज्ञान असेल तर ते आपल्या ब्लॉगसाठी उत्तमच असेल.

त्यामुळे जर आपणास काहीतरी लिहिण्याची इच्छा असेल आणि एखाद्या विषयावर आपल्याकडे चांगली माहिती उपलब्ध असेल तर ती माहिती आपण जगासमोर मांडू शकता आणि त्यातून पैसे देखील कमावू शकता.

ब्लॉग कुठे सुरू करू शकतो -

कोणताही ऑनलाईन ब्लॉग सुरू करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये Blogger, Wordpress, Weebly, Wix इत्यादी.परंतु जे दोन सर्वाधीक लोकप्रिय आहेत ते म्हणजेच ब्लॉगर आणि वर्डप्रेस .

ब्लॉगर
Blogger.com

ब्लॉगर ही जुनी आणि मोफत सेवा देणारी वेबसाईट आहे .ब्लॉगर च्या माध्यमातून आपण आपला ब्लॉग सुरू करू शकतो त्यासाठी आपल्याला कोणताही रक्कम द्यावी लागत नाही.

फक्त आपल्याला एक Domain म्हणजेच आपल्या ब्लॉगसाठी एक वेबसाईट खरेदी करायची आहे जिचा एक वर्षाचा खर्च साधारणपणे 700 -800 रुपये असतो .फक्त इतकी रक्कम देऊन आपण आपल्या ब्लॉगिंग च्या प्रवासाला सुरुवात करू शकतो.

डोमेन -Domain म्हणजे काय ?

तर डोमेन म्हणजेच ब्लॉगचा पत्ता. आता आपण जो ब्लॉग वाचत आहेत त्या ब्लॉगचा डोमेन आहे marathitmahiti.com
आपण या लिंक ला क्लिक केलं की आपण मराठीत माहिती या ब्लॉगवर येऊ शकता.

जसे आपणाला एखाद्या व्यक्तीच्या घरी जायचे असेल तर त्या व्यक्तीचा पत्ता लागतो मग आपण अचूकपणे त्या व्यक्तीच्या घरी जाऊ शकतो. तसेच इंटरनेट वर सुद्धा अनेक ब्लॉग उपलब्ध असतात मग आपल्याला जर एखाद्या विशिष्ट ब्लॉगवर जायचे असेल तर त्या ब्लॉगचा पत्ता म्हणजेच डोमेन टाकावा लागतो.

Domain विकत घेण्यासाठी आपण खालील लिंक वर क्लिक करू शकता -

https://in.godaddy.com/

--> आपण खाली जाऊन पाहू शकतो की ब्लॉगर वरती ब्लॉग कसा सुरू करावा.

वर्डप्रेस

दुसरा आणि सर्वाधिक वापरला जाणारा ब्लॉग प्लॅटफॉर्म आहे Wordpress. ब्लॉगर च्या तुलनेत वर्डप्रेस चा वापरकर्ता जास्त आहे कारण ब्लॉगर पेक्षा वर्डप्रेस हे नवीन आणि कोडींग ची माहिती नसणारे लोक सुद्धा यामध्ये अगदी सहज काम करू शकतात .तसेच वर्डप्रेस मध्ये आपण आपल्या ब्लॉगला जास्त आकर्षक करू शकतो त्यासाठी वेगवेगळे Plugins आणि Themes Wordpress मध्ये उपलब्ध आहेत.

जसे आपण पाहिले की ब्लॉगर मध्ये आपण फक्त एक डोमेन विकत घेऊन आपला ब्लॉग मोफत सुरू करू शकतो पण वर्डप्रेस मध्ये आपल्याला Web Hosting विकत घ्यावे लागते. त्यासाठी आपल्याला वर्षाला 5000 ते 10000 पर्यंत खर्च करावा लागतो.

होस्टिंग -Hosting

होस्टिंग म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या ब्लॉगवरील सर्व माहिती साठवण्याची एक जागा.जसे आपण आपले सामान एक खोलीत साठवतो तसेच ब्लॉगवरील आपले पोस्ट,छायाचित्रे, थीम हे सर्व साठवण्यासाठी आपल्याला Hosting ची गरज असते.

ब्लॉगर वरती आपल्याला होस्टिंग फ्री मध्ये उपलब्ध आहे तर वर्डप्रेस
वरती आपल्याला पैसे मोजावे लागते.

Domain आणि होस्टिंग विकत घेण्यासाठी आपण खालील लिंक वर क्लिक करू शकता -

https://in.godaddy.com/

थीम -Theme

Theme ही आपल्या ब्लॉगला सुंदर बनवत असते.दोन्ही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक सुंदर फ्री थीम उपलब्ध आहेत त्यांचा वापर आपण आपल्या ब्लॉगवर करू शकता.

तसेच आपण थीम विकत सुद्धा घेऊ शकता.

म्हणूनच जर आपल्याला फक्त ब्लॉगिंग करायची असेल तर आपण ब्लॉगर वरती एक डोमेन विकत घेऊन ब्लॉग सुरू करू शकता.

जर आपल्याला ब्लॉग ला अधिक आकर्षक आणि नवनवीन Plugin वापरायचे असेल तर किंवा E- commerce वेबसाईट म्हणजेच वस्तू विकणारे दुकान बनवायचे असेल तर आपण वर्डप्रेस वरती आपला ब्लॉग सुरू करू शकता.

ब्लॉग कसा सुरू करावा -

आपण या ठिकाणी blogger वरती ब्लॉग कसा सुरू करायचा याची माहिती जाणून घेणार आहोत.

1 - सुरुवातीला आपल्याला https://www.blogger.com/ या वेबसाईटवर जायचे आहे.


2 - त्याठिकाणी आपल्या Gmail Id ने लॉगिन करायचे आहे.


3 - त्यानंतर आपल्याला new blog या बटनावर क्लिक करायचे आहे.





4 - याठिकाणी आपल्याला ब्लॉगचे शीर्षक द्यायचे आहे .आणि Next या बटनावर क्लिक करायचे आहे.




5 - याठिकाणी आपल्याला आपल्या ब्लॉगसाठी Domain टाकायचा आहे.आणि Save या बटनावर क्लिक करायचे आहे.


6 -यानंतर आपला ब्लॉग तयार आहे. New Post या बटनावर जाऊन आपण नवीन पोस्ट आपल्या ब्लॉगमध्ये टाकू शकता.




कोणताही ब्लॉग सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत

ब्लॉगचा विषय निवडणे-

सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्याला कोणत्या विषयवार ब्लॉग लिहायचे आहे हे निवडणे आवश्यक आहे.कोणत्या विषयात आपण उत्तम प्रकारे लिहू शकतो हे तपासून एक विषय आपल्याला निवडायचा आहे.

ब्लॉगसाठी काही विषय

  • पाककला
  • पर्यटन स्थळांची माहिती
  • स्पर्धा परीक्षांची माहिती
  • सरकारी योजनांची माहिती
  • क्रीडा क्षेत्रातील माहिती
  • नवीन गॅजेट्स ची माहिती
  • ब्लॉगिंग ची माहिती
  • आर्थिक घडामोडी
  • आरोग्य सल्ला
  • नवीन गेम्स
  • डेकोरेशन
  • ऑनलाईन मार्गदर्शन
  • इबुक्स
  • गोष्टी
  • निबंध
  • स्टेटस
  • जीवचारित्रे
  • अनमोल विचार
  • करिअर माहिती देणे 

डोमेन / होस्टिंग विकत घेणे-

एकदा का आपण कोणत्या विषयावर ब्लॉगिंग करायचे हे ठरवल्यावर त्या विषयासंबंधी एक आकर्षक domain विकत घायचा आहे.

जर आपण blogger वर ब्लॉगिंग करणार असाल तर होस्टिंग विकत घेण्याची गरज नाही परंतु जर आपण वर्डप्रेस वर ब्लॉगिंग करणार असाल तर आपणास डोमेण साठी होस्टिंग विकत घ्यायचे आहे.

Domain आणि होस्टिंग विकत घेण्यासाठी आपण खालील लिंक वर क्लिक करू शकता -

https://in.godaddy.com/


पोस्ट लिहायला सुरुवात करणे -

  • डोमेन आणि होस्टिंग विकत घेतल्यावर आपल्याला पोस्ट लिहायला सुरुवात करायची आहे.पोस्ट लिहिताना प्रथम त्या पोस्ट विषयी संपूर्ण माहिती घ्या आणि मग आपल्या भाषेत ती पोस्ट लिहा.
  • पोस्ट लिहिताना कधीही इंटरनेट वरील इतर लेख कॉपी पेस्ट करू नका .स्वतःचा लेख लिहा.
  • पोस्टची शब्द संख्या की कमीत कमी 600 - 1000 च्या दरम्यान असावी.जेवढी शब्दांची संख्या जास्त ठेवढे ब्लॉगसाठी उत्तमच . 
  • पोस्टला आकर्षक असे शीर्षक द्यावे.

पोस्टची जाहिरात करणे -

एकदा का पोस्ट लिहून झाली की मग आपल्या ब्लॉगला आपण Social Media च्या माध्यमातून प्रसार करू शकता.

वेगवेगळ्या keyword आणि SEO tool चा वापर करु शकता.

आपल्या ब्लॉगवर नियमित पोस्ट लिहिणे आणि सुधारित करणे सुद्धा गरजेचे आहे कारण नियमित पोस्ट लिहिल्याने आपला ब्लॉग लवकर लोकप्रिय होऊ शकतो.


ब्लॉगची जाहिरात करणे

जर आपण नवीन ब्लॉग सुरू केला असेल तर आपण आपल्या ब्लॉगची जाहिरात
Social Media जसे की फेसबुक,व्हाट्सएप इंस्टाग्राम,ट्विटर च्या माध्यमातून करू शकता.

तसेच कोणतीही नवीन पोस्ट लिहिताना SEO करणे देखील गरजेचे असते.

त्याचबरोबर google search console चा वापर करून आपण आपली वेबसाईट ही इंडेक्स करू शकतो.

एकदा का आपला ब्लॉग लोकप्रिय झाला की मग आपल्याला जाहिरात करायची गरज नसते कारण google search स्वतः आपली वेबसाईट ची जाहिरात करते.म्हणजेच कोणीही google वर आपल्या ब्लॉग संदर्भात search केले की आपल्या ब्लॉगला दाखवते.

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे -

Google AdSense

आपण तयार केलेल्या नवीन ब्लॉगवर ज्यावेळेस ट्राफिक म्हणजेच लोक search करायला सुरुवात करतील त्यानंतर आपण Google AdSense द्वारे पैसे मिळवू शकतो.
त्यासाठी आपल्याला Gmail id ने google AdSense चे अकाउंट बनवून AdSense साठी Apply करायचे आहे.

एकदा का आपले AdSense अँप्लिकेशन गूगल ला मान्य झाले की मग आपल्या ब्लॉगवर गूगल मार्फत जाहिराती दाखवल्या जातात.या जाहिराती द्वारे गूगल आपल्याला AdSense च्या माध्यमातून पैसे देते.

AdSense अकाउंट मध्ये 100 $ झाल्यावर हे पैसे आपल्या बँक अकाउंट मध्ये पाठवले जातात.

Affiliate Marketing

या माध्यमातून आपण कमिशन द्वारे पिसे कमावू शकतो.
Amazon, Flipkart यांसारख्या वेबसाईट आपल्याला ही सुविधा पुरवतात.

यामध्ये आपल्याला Affiliate अकाऊंट ओपन करायचे आहे त्यानंतर आपल्या ब्लॉगवर त्यांच्या वस्तूंच्या खरेदीसाठी लिंक दाखवायच्या आहेत. ज्यावेळेस त्या लिंकवरून कोणीही ती वस्तू खरेदी करेल त्यावेळस आपल्याला त्यातून काही प्रमाणात कमिशन मिळेल.

Sponsor Post

एखाद्या प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी माहिती आपण आपल्या पोस्टमध्ये देऊन सुद्धा आपण पैसे मिळवू शकतो.त्यासाठी आपला ब्लॉग हा ट्राफिक असणारा असावा लावतो.

Advertising

एखाद्या नवीन वस्तू किंवा website ची जाहिरात आपण आपल्या Blog दाखवूनही आपण पैसे कमावू शकतो.
जसे की एखादी नवीन game लाँच झाली तर आपण तया गेमची जाहिरात आपल्या ब्लॉगवर करून त्या गेम च्या मालकाकडून पैसे मिळवू शकतो.

eBooks

आपण आपल्या आवडीच्या विषयवार ईबुक लिहून सुद्धा आपल्या ब्लॉगवर विकू शकतो.आजकाल ई- बुक वाचणाऱ्यांची संख्या खूप झाली आहे.

तर अशा प्रकारे या लेखात आपण ब्लॉग,ब्लॉगिंग,ब्लॉगर,वर्डप्रेस,होस्टिंग,डोमेन याविषयीची माहिती जाणून घेतली.आशा करतो की आपल्याला ही माहिती समजली असेल.

धन्यवाद .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.