यशस्वी जयस्वाल
पाणीपुरी विकण्यापासून सुरुवात केलेल्या यशस्वी जयस्वाल ची यशस्वी कारकीर्द आज आपण पाहणार आहोत.मुंबई ही स्वप्नांची राजधानी असे म्हणतात.आणि असेच स्वप्नं घेऊन मुंबईत आलेल्या यशस्वी जयस्वाल या तरुणाने अवघ्या 18 व्या वर्षी करोडपती होण्याचे स्वप्न साकार केले.
आपणास सांगू इच्छितो की यशस्वी जयस्वाल हा युवा भारतीय क्रिकटपटू असून त्याने आपल्या यशाचा डंका कमी वयातच वाजवला आहे.
बालपण
यशस्वी जयस्वाल चे मूळ ठिकाण सुरियवन हे उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील आहे. त्याचे वडील गावी एक लहानसं दुकान चालवतात. क्रिकेटमध्ये आवड असल्याने काहीतरी करून दाखविण्याच्या उद्देशाने यशस्वीने दहाव्या वर्षी मुंबईत पाऊल ठेवले. कुटुंबाने त्याला आडकाठी केली नाही.
जयस्वालचा जन्म 28 डिसेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील भदोही येथील सुरियावन येथे झाला. यशस्वी चे वडील भूपेंद्र जयस्वाल हे लहान मुलांच्या हार्डवेअर स्टोअरचे मालक आणि आई कांचन जयस्वाल ह्या गृहिणी आहेत.
लहानणापासूनच संघर्ष
वयाच्या दहाव्या वर्षी आझाद मैदानावर क्रिकेट प्रशिक्षण घेण्यासाठी ते मुंबईच्या दादर येथे गेले. दादर हे मैदानापासून बरेच दूर असल्याने ते काळबादेवी शेजारच्या ठिकाणी गेले जेथे त्यांना कमी दर्जाच्या कामांच्या बदल्यात दुग्धशाळेमध्ये राहण्याची सोय झाली.
अखेरीस त्याला दुकानातून काढून टाकले गेले कारण क्रिकेटच्या प्रशिक्षणादरम्यान तो दुकानात जास्त मदत करू शकत नव्हता. स्वत: ची जागा नसल्यामुळे जयस्वाल मैदानावर प्रशिक्षकासोबत तंबूतच राहत असे तेथे तो बहुतेक वेळा भुकेला झोपायचा .
तीन वर्ष तंबूत राहिल्यानंतर, जयस्वालची क्रिकेट प्रतिभा डिसेंबर 2013 ला सांताक्रूझमध्ये क्रिकेट अकादमी चालविणार्या ज्वाला सिंगने यांनी शोधली. जयस्वाल यांना सिंह यांनी आपल्या पंखाखाली आणले आणि त्याला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली.
पाणीपुरी विकून उदरनिर्वाह
दादर येथे प्रशिक्षण घेत असताना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी व मोकळा वेळ घालवण्यासाठी यशस्वीने मुंबईत पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय केला.
करिअर
विजय हजारे ट्रॉफीत द्विशतकवीर
विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने द्विशतक झळकावले आहे व असे करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
16 ऑक्टोबर 2019 रोजी झारखंड विरुद्ध विजय हजारे ट्रॉफी सामन्यात 154 चेंडूत 203 धावा केल्या.
डिसेंबर 2019 मध्ये, त्यास 2020 अंडर -19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघात समाविष्ट करण्यात आले.
2020 U-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यशस्वी जयस्वाल हा भारतासाठी सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.
क्रिकेट विश्वकरंडकमध्ये यशस्वी ने पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल मध्ये शतक झळकावले.
आयपीएल मध्ये करोडपती
20 लाख रुपये बेस प्राईज असणाऱ्या यशस्वी जयस्वालला , त्यापेक्षा 12 पट अधिक रकमेने खरेदी करण्यात आले. यशस्वीला राजस्थान रॉयल्स संघाने 2.49 कोटी रुपयांना आपल्या संघात खरेदी केले. भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून नक्कीच मोठया अपेक्षा आहेत.
आपल्या भारतात अशा अनेक खेळाडूंची संघर्षगाथा आहे जे पुढे जाऊन आपले व आपल्या देशाचे नाव मोठे करीत आहे.
व यशस्वी जयस्वाल यात कमी पडणार नाही यात काहीच शंका नाही.त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

Do not enter any spam link in comment box