Type Here to Get Search Results !

मल्टिबॅगर स्टॉक म्हणजे काय ?

 


शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत ज्यांनी भरपूर पैसा लोकांना कमावून दिला आहे.काही शेअर आपल्या मूळ किमतीच्या तिप्पट,दुप्पट किंवा त्याहूनही अधिक किमतीचे झाले आहेत.

मल्टिबॅगर स्टॉक म्हणजे काय ?

   शेअर जे मूळ किमतीच्या अनेक पटीने  वाढतात त्या शेअर्स ना आपण मल्टिबॅगर स्टॉक म्हणतो.हे शेअर सुरुवातीला अगदी कमी किमतीत उपलब्ध असतात,परंतु त्या कंपनीमध्ये भविष्यात   वाढीची संभावना असते तसेच त्यांचे Fundamentals सुद्धा मजबूत असते.

असे मजबूत Fundamentals असलेले शेअर कमी किमतीत शोधणे हे खरे कौशल्य आहे.आणि एकदा का आपण असे शेअर शोधून त्यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर आपणास भरपूर फायदा होऊ शकतो.

जे शेअर आपल्या किमतीच्या दुप्पट मोबदला देतात त्यांना two bagger शेअर,जे तिप्पट  वाढतात त्यांना three bagger स्टॉक म्हणतात तसे जे स्टॉक 10 पट वाढतात त्यांना ten bagger स्टॉक म्हणतात. तर अशा प्रकारे जे शेअर आपल्या मूळ किमतीच्या कितीतरी पटीने वाढतात त्यांना मल्टिबॅगर स्टॉक असे म्हणतात.

तर महत्वाचा प्रश्न असा आहे की मल्टिबॅगर स्टॉक शोधायचे कसे ? 

  मल्टिबॅगर स्टॉक शोधण्यासाठी आपण खालील गोष्टी जाणून घेऊ शकता.

कंपनीची कर्ज पातळी तपासणे -

कोणत्याही कर्जात बुडालेल्या कंपनीच्या व्यवसाय आणि नफ्यामध्ये वाढ होणे अवघड असते.त्यामुळे कमीत कमी कर्ज असलेल्या कंपनीत गुंतवणूक केव्हाही चांगली असते. कंपनीकडे असणारे  कर्ज   हे वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपनीसाठी वेगवेगळे असू शकते.

कंपनीचा quarterly result तपासणे

मागील  तिमाहीतील कामगिरी तपासा .तिमाही निकालाच्या आधारे कंपनीच्या महसुल किती आहे हे तपासा.  जर कंपनी ऑपरेशनल स्तरावर चांगली कामगिरी करीत असेल तर कंपनी भविष्यात चांगली कामगिरी करू शकते.

कंपनीचा EPS /PE तपासणे

कोणत्याही कंपनीचा PE आणि EPS तपासणे हे गुंतवणूक करण्यापूर्वी अनिवार्य आहे.EPS आपल्याला कंपनीच्या प्रति शेअरमागे किती कमाई आहे हे सांगते तर PE आपल्याला शेअर किंमत आणि EPS यातील गुणोत्तर दर्शविते, म्हणजेच एक रुपया नफा कमवण्यासाठी आपण त्या कंपनीत किती रुपये इन्व्हेस्ट करतो आहे.जर शेअरच्या किमतीपेक्षा PE वाढत असेल तर तो शेअर मल्टिबॅगर होण्याची शक्यता जात असते.

कंपनीचे उत्पन्नाचे source तपासणे

कंपनीचे मूळ उत्पन्न कोठून येत आहे हे शोधून मग जर मूळ उत्पन्न येणाऱ्या क्षेत्रात जर भविष्यात वाढ होणार असेल तर शेअरच्या किंमती सुद्धा वाढतील.

कंपनीचे व्यवस्थापन तपासणे

काही वेळा कंपनीचा व्यवसाय चांगला असतो पण व्यवस्थापन करणारे लोक जर उत्तम नसतील किंवा भ्रष्टाचार करणारे असतील तर भविष्यात कंपनीला ते नुकसान दायक ठरणार आहे.
त्यामुळे अशा कंपण्यापासून दूर राहिलेलं चांगले.

व्यवसाय काय आहे ते पाहणे

कंपनी कोणता व्यवसाय करते आणि त्यापेक्षाही जो व्यवसाय कंपनी सध्या करत आहे त्याला भविष्यात किती वाव आहे हे पाहणे.जर आपण सुरुवातीला जर एखाद्या अशा कंपनीला शोधले ज्या कंपनीचा व्यवसाय भविष्यात खूप चालणार आहेत तर तो शेअर मल्टिबॅगर स्टॉक होऊ शकतो.

मल्टिबॅगर स्टॉक ची काही उदाहरणे -

MRF   टायर्स

2000 साली बाजारभाव - 2500 रुपये प्रति शेअर
2021 साली बाजारभाव  83000 रु प्रति शेअर .

जर तुम्ही 2000 साली  5000 जरी रु गुंतवले असते
तर आता ते 1,66,000 रुपये झाले असते .

आयशर मोटर्स

2000 साली बाजारभाव - 5- 6 रुपये प्रति शेअर
2021 साली बाजारभाव  2600 रु प्रति शेअर .

जर 2000 साली  5000 ते 6000 रु गुंतवले असते
तर आता ते  26,00,000 रुपये झाले असते .

रिलायन्स

2000 साली बाजारभाव -80 रुपये प्रति शेअर
2021 साली बाजारभाव  2000 रु प्रति शेअर .

जर 2000 साली  8000 रु गुंतवले असते
तर आता ते  200000 रुपये झाले असते .

त्याचप्रमाणे टायटन, hdfc असे अनेक शेअर्सनी मल्टिबॅगर रिटर्न दिलेले आहेत.

जर आपणास दिलेली माहिती आवडली असेल तर कंमेंट द्वारे नक्की कळवा .

धन्यवाद...




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.