शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी आणि विक्री ही आपण स्टॉक एक्सचेंज मार्फत करू शकतो.परंतु आपण डायरेक्ट स्टॉक एक्सचेंज (BSE आणि NSE ) मधून शेअर खरेदी विक्री करू शकत नाही.त्यासाठी सेबी नोंदणीकृत शेअर ब्रोकर ची आवश्यकता असते.
स्टॉक ब्रोकर म्हणजेच स्टॉक एक्सचेंज आणि शेअर धारकांना जोडणारा दुवा आहे.स्टॉक ब्रोकरच्या मदतीने आपण NSE आणि BSE मधून शेअर खरेदी विक्री करू शकतो.ज्यावेळेस आपल्याला एखादा शेअरची खरेदी विक्री करायची असेल तर आपण आपल्या स्टॉक ब्रोकरला तश्या सूचना देतो आणि आपला स्टॉक ब्रोकर आपली ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातून पूर्ण करतो.
■ स्टॉक ब्रोकर कसे कार्य करते
आपण ज्या ब्रोकर कडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडले आहे तो ब्रोकर आपल्याला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्रदान करतो.त्यानंतर आपण ब्रोकरच्या वेबसाईट किंवा अँप वर जाऊन आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड ने लॉगिन करतो.
जे शेअर आपल्याला खरेदी करायचे किंवा विक्री करायचे आहेत त्यासाठी आपण स्टॉक ब्रोकर कडे ऑर्डर देतो.
ती ऑर्डर आपला ब्रोकर त्यांच्या माध्यमातून स्टॉक एक्सचेंज ला पुढे पाठवतात .पुढे स्टॉक एक्सचेंज ती ऑर्डर पूर्ण करते.
ऑर्डर पूर्ण झाल्यावर ,जर आपली ऑर्डर खरेदीसाठी असेल तर स्टॉक ब्रोकर आपल्या ट्रेडिंग अकाउंट मधून खरेदीसाठी लागणारा फंड काढून घेतात आणि खरेदी केलेले शेअर आपल्या अकाउंट मध्ये जमा करतात.
याउलट जर ,आपली ऑर्डर शेअरच्या विक्रीसाठी असेल तर स्टॉक ब्रोकर आपल्या डिमॅट अकाउंट मधून शेअर काढून घेतात आणि विक्री केलेले शेअरची रक्कम आपल्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये जमा करतात.आपण ही रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करू शकतो.
वरील सर्व कामे करण्यासाठी स्टॉक ब्रोकर आपल्याकडून काही प्रमाणात शुल्क आकारात असतात.त्याला स्टॉक ब्रोकरेज (Brokerage ) असे म्हणतात. प्रत्येक स्टॉक ब्रोकर हे वेगवेगळे शुल्क आकारात असतात.
■ स्टॉक ब्रोकरचे प्रकार-
फुल सर्विस ब्रोकर -Full Service Broker
फुल सर्विस ब्रोकर हे आपल्याला जास्त सुविधा पुरवतात. स्टॉक ब्रोकर आपल्याला शेअर खरेदी आणि विक्रीसाठी मदत करतात त्याशिवाय फुल सर्विस ब्रोकर हे कोणते शेअर खरेदी करायचे,कधी विकायचे,इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन इत्यादी अधिकच्या सुविधा पुरवतात.फुल सर्विस ब्रोकर हे आपल्याला एक मार्गदर्शन जोडतात जो आपल्याला फोनद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन करतो.
त्यामुळेच फुल सर्विस ब्रोकर हे डिस्काउंट ब्रोकरपेक्षा जास्त शुल्क आकारतात.
उदाहरण -Angel Broking, Sharekhan
डिस्काउंट ब्रोकर - Discount Broker
डिस्काउंट ब्रोकर हे कमी शुल्कामध्ये आपल्याला स्टॉक ब्रोकिंग ची सुविधा पुरवतात. स्टॉक खरेदीसाठी आणि विक्रीसाठी अलर्ट देने यांसारख्या सुविधा आपल्याला डिस्काउंट ब्रोकर पुरवत नाही.सध्या भारतामध्ये डिस्काउंट ब्रोकर चा वापर खूप वाढलेला दिसत आहे.नवनवीन तंत्रज्ञान वापरून वेगवान स्टॉक ट्रेडिंग अँप असल्याने तरुण आणि नवीन गुंतवणूक डिस्काउंट ब्रोकरला पसंत करत आहे.
उदाहरण -Zerodha, Upstox,5 Paisa
■ स्टॉक ब्रोकर शुल्क
प्रत्येक ब्रोकरचे शुल्क हे वेगवेगळे असते.साधारणपणे ब्रोकरेज शुल्कामध्ये खालील शुल्क आकारले जाते
1 - Brokerage - ब्रोकरेज
प्रत्येक शेअरच्या खरेदी आणि विक्री ऑर्डरवर जे शुल्क दिले जाते त्याला ब्रोकरेज म्हणतात.डिस्काउंट ब्रोकर डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये 0 ब्रोकरेज आकारात.
2- STT/CTT -
Securities transaction tax
Commodities transaction tax
प्रत्येक शेअरच्या खरेदी आणि विक्री ऑर्डरवर जे शुल्क सरकारला दिले जाते त्याला STT/CTT असे म्हणतात.इन्ट्राडे मध्ये फक्त विक्रीवर STT/CTT टॅक्स दिला जातो.तर डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये दोन्ही वेळेस STT/CTT हा टॅक्स दयावा लागतो.
3- Transaction charges -
NSE ,BSE, MCX ह्या एक्सचेंज द्वारा शेअरच्या खरेदी विक्री वर जो कर आकाराला जातो त्याला transaction charge असे म्हणतात.
4 - GST -
सरकार तर्फे हा कर शेअरच्या खरेदी आणि विक्रीवर आकारला जातो.शक्यतो हा टॅक्स [ ब्रोकरेज + transaction charges] च्या 18 % असतो.
5 - SEBI charges - सेबी कर
सेबीकडून दर 1 कोटी रुपयांच्या व्यवहारावर साधारणपणे 10 रु इतका टॅक्स आकारला जातो
6 - Stamp charges - स्टॅम्प ड्युटी
भारत सरकार स्टॅम्प ड्युटी च्या माध्यमातून कर आकारतात.
याशिवाय DP चार्जेस,AMC (Account maintenance charges द्यावा लागतो .
■ डिस्काउंट ब्रोकर शुल्क
Zerodha। Upstox। 5 Paisa यांचे डिलिव्हरी आणि इंट्राडे प्रकारातील शुल्क खाली दिले आहे .अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .Zerodha Brokerage charges
Upstox Brokerage Charges
5 Paisa Brokerage Charges
आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
🎁Upstox मध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तर या लेखात आपण ब्रोकर ,ब्रोकरेज म्हणजे काय तसेच ब्रोकरेज चे प्रकार आणि शुल्क काय आहेत हे जाणून घेतले.
लेख जर आपणास आवडला असेल तर कंमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
धन्यवाद..




Do not enter any spam link in comment box