Type Here to Get Search Results !

म्युच्युअल फंड म्हणजे काय ? म्युच्युअल फंडाचे फायदे काय आहेत ?


 " म्युच्युअल फंड सही है " अशी जाहिरात आपण अनेकदा पाहिली असेल तर आज आपण म्युच्युअल फंड विषयी  थोडक्यात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत .
चला तर मग सुरू करूया.

म्युच्युअल फंड गुंतवणूक  (Mutual Fund) हा इतर  गुंतवणुकीसारखा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे.  म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट  करून गुंतवणूकदार कर बचत करू शकतात ,अधिकचे उत्पन्न मिळवू शकतात . 

नुकत्याच शेअर बाजारात आलेल्या व गुंतवणूक करणाऱ्यांना शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते.त्यामुळे अशा ग्राहकांसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे.

आपण प्रत्येक महिन्याला 500 -1000 किंवा आपल्या बचतीप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता आणि हळूहळू ही रक्कम वाढवू शकता.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंडांमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून गुंतवणुकीसाठी पैसे गोळा करतात. यामध्ये किती पैसे दयायचे हे गुंतवणूकदार ठरवतो. त्यानंतर त्यातून जमा झालेले पैसे, म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स , बॉण्ड्स, डेबेंचर ,गोल्ड मध्ये गुंतवले जाते.

गुंतवलेल्या पैशाची नंतर वाढ होते व त्याप्रमाणे आपल्याला परतावा मिळत असतो. कोणत्या कंपनीत पैसे गुंतवायचे आणि किती पैसे गुंतवायचे हे सर्वस्वी फंड मॅनेजर ठरवतात. अर्थात फंड मॅनेजर हे शेअर मार्केट आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ असतात.

भारतीय शेअर बाजारात अनेक  कंपन्या आहेत ,जे आपले म्युच्युअल फंड चालवत आहेत.

उदा,

  • Axis Asset Management Company Ltd.,
  • Aditya Birla Sun Life AMC Limited,
  • HDFC Asset Management Company Limited,
  • HSBC Asset Management (India) Private Ltd.

 शेअर मार्केट मध्ये नुकत्याच आलेल्या सामान्य माणसाला शेअर बाजार तसेच शेअर गुंतवणुकीचे ज्ञान कमी असते, अशा सामान्य गुंतवणूक धारकासाठी गुंतवणुकीचा हा पर्याय सर्वात उत्तम मानला जातो.

 जेवढे पैसे आपण म्युच्युअल फंडात गुंतवणार आहोत त्यापकी काही रक्कम हि  म्युच्युअल फंड कंपन्या " एन्ट्री लोड" म्हणून घेतात .त्यानंतर उरलेली रक्कम ही म्युच्युअल  फंडात गुंतवली जाते व त्या रकमेच्या किमती इतके फंड युनिट ग्राहकाच्या नावाने दिले जातात. जमा झालेली एकूण रक्कम फंड व्यवस्थापक शेअर बाजारात गुंतवतो.

म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीची किंमत वाढली की आपण खरेदी केलेल्या  म्युच्युअल फंडाची किंमत पण वाढत जाते. जर गुंतवणूक केलेल्या शेअरची किंमत कमी झाली तर म्युच्युअल फंडाची किंमत पण कमी होते ..त्यामुळे म्युच्युअल फंडाची निवड करताना सुद्धा त्या फंडाचा मागील रेकॉर्ड सुद्धा तपासणे गरजेचे असते.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना फंड मॅनेजर हे वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि उत्तम कंपन्यात पैसे इन्व्हेस्ट करत असतात.

म्युच्युअल फंडांचा इतिहास

१९६३ साली  भारतातील पहिला म्युच्युअल फंड अस्तित्वात आला .

 १९८७ साली मग अनेक सार्वजनिक आर्थिक संस्था किंवा बँक व  आयुर्विमा महामंडळ यांनी  म्युच्युअल फंड मध्ये प्रवेश केला. 

१९९३ साली म्युच्युअल फंडांसाठीचे काही नियम तयार करण्यात  आले आणि  त्यानंतर खाजगी म्युच्युअल फंडांना देखील  परवानगी देण्यात आली.

 म्युच्युअल फंडांचा प्रसार सामान्य लोकांमध्ये व्हावा म्हणून   २२ ऑगस्ट १९९५ साली अँम्फी (The Association of Mutual Funds in India) ची स्थापना केली.

गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचे फायदे 

 कमी जोखीम -

 म्युच्युअल फंडातील पैसे हे विविध सेक्टर मधील समभाग (equity shares)/कर्जरोख्यांमध्ये (bonds) व इतर गुंतवणूक साधनांमध्ये  गुंतवले जाते. यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम कमी होते.

कधीही म्युच्युअल फंडातून बाहेर पडू शकतो -

आपण  म्युच्युअल फंडातील आपली गुंतवणूक कधीही काढू शकतो  म्हणजेच विक्री करता येते. यामध्ये गुंतवणूकदाराला त्या दिवशीच्या युनिटच्या दरानुसार रक्कम मिळते.

उत्तम व्यवसथापन -

 फंड व्यवस्थापकाकडे गुंतवणुकीच्या साधनाचा अभ्यास करण्यासाठी खास टीम व कौशल्य असते, त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारापेक्षा फंड व्यवस्थापक अधिक चांगल्या पद्धतीने आपले  भांडवल गुंतवू शकतो.

सरकारी नियंत्रण -

 म्युच्युअल फंड सरकारी संस्थाद्वारे नियंत्रित केले जातात.त्यामुळे धोका होण्याचे प्रमाण कमी असते . 


आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा

🎁मित्रांनो भारतातील प्रसिद्ध #1 स्टॉक ब्रोकर Zerodha मध्ये घरबसल्या ऑनलाईन डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.




गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचे काही तोटे

 म्युच्युअल फंडात आपण गुंतवलेल्या रकमेपैकी प्रमाणात रक्कम ही म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपनी फी स्वरुपात घेते. त्यामुळे गुंतवणूकदाराला फक्त उरलेल्या रकमेवरच परतावा मिळतो. 

गुंतवणुकीवर नियंत्रण नाही -

फंडातील रक्कम कोणत्या समभाग/कर्जरोख्यांमध्ये गुंतवली जावी, यावर गुंतवणूकदाराचे थेट नियंत्रण नसते.म्हणजेच आपण फंड मॅनेजर ला सांगू शकत नाही की या शेअर मध्ये गुंतवणूक करा किंवा या शेअरची विक्री करा.अधिकार सगळे फंड मॅनेजर ला असतात.

कधी तोटा सुद्धा होतो -

 म्युच्युअल फंडातून मिळणारा नफा हा म्युच्युअल फंड युनिटच्या बाजारभावावर अवलंबून असतो, त्यामुळे बाजारात शेअर च्या किमतीत जशी वाढ होऊ शकते तशीच घटही होऊ शकते.

म्युच्युअल फंडांचे  प्रकार

गुंतवणुकीनुसार , फंडातील भांडवल कशात गुंतवले जाते त्यावरून म्युच्युअल फंडांचे खालीलप्रमाणे  वर्गीकरण केले जाते. 

  •  इक्विटी फंड (शेअरमध्ये गुंतवणूक)
  • डेट फंड (मुख्यत्वे कर्जरोख्यात गुंतवणूक)
  •  हायब्रिड फंड (शेअर आणि कर्जरोखे या दोन्हीत गुंतवणूक)
  • फंडांचा फंड 
  • इतर (उदाहरणार्थ कमोडिटी फंड) 


म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. म्हणूनच,ते आपण खाली दिलेले आहे.

ऑफलाइन गुंतवणूक 

ऑफलाइन गुंतवणूक करण्यासाठी आपण एखाद्या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या जवळच्या कार्यलयास भेट देऊ शकता.

आपणास राहत्या पत्त्याचा पुरावा, cancelled  चेक, पत्ता, ओळख पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल.

ब्रोकरद्वारे गुंतवणूक

आपण म्युच्युअल फंड ब्रोकरची मदत घेऊ शकता जो गुंतवणूकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करेल.

ब्रोकर आपल्याला विविध योजनांच्या वैशिष्ट्ये, आवश्यक दस्तऐवज, जोखीम प्रोफाइल याबद्दल माहिती देईल.

वेबसाइटद्वारे ऑनलाइन गुंतवणूक

बहुतेक फंड कंपन्या ऑनलाईन गुंतवणूक सुविधा देतात. आपण आधिकारिक वेबसाइटद्वारे गुंतवणूक करू शकतो.

अँप द्वारे गुंतवणूक 

आपण एका अँपद्वारे गुंतवणूक करू शकता, जे अँप मोबाइल वर डाउनलोड करू शकतो . 

उदा.

ऍक्सिस म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रूडेंशियल म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड,Paytm Money,Groww App आणि बरेच काही उपलब्ध असलेले लोकप्रिय अॅप्स आहेत.

तर आपण शेअर मार्केट की म्युच्युअल फंड कशात पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे

खालील व्हिडिओत जाणून घेऊया.




तर मित्रानो आपण Mutual फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दल  थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे.

आपण वरीलपैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून Mutual Funds गुंतवणूक करू शकता.

धन्यवाद ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.