झेरोधामध्ये AMO ऑर्डर काय आहे ?
मित्रांनो आपण झेरोधामध्ये अनेक वेळा एएमओ ऑर्डर हि टॅब पहिली असेल ,तर आपण या लेखामध्ये झेरोधामध्ये AMO ऑर्डर काय आहे ? झेरोधामध्ये एएमओ ऑर्डर कशी टाकावी ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ,चला तर मग सुरु करूया .
AMO ऑर्डर म्हणजे मार्केट नंतर ऑर्डर हि झेरोधा अँप तर्फे दिली जाणारी ऑर्डर प्रकारांपैकी एक ऑर्डर प्रकार आहे.
आता आपल्या सर्वांना हे माहित आहे की शेअर बाजार सकाळी 9:15 AM ते सायंकाळी 3:30 PM पर्यंत चालू असतो . या वेळेत आपण कोणतीही ऑर्डर टाकू शकतो परंतु जर आपल्या कामामुळे जर आपणास वेळ मिळाला नाही आणि आपणास ट्रेडिंग करायचे असल्यास AMO ऑर्डर द्वारे आपण ऑर्डर टाकू शकतो .
शेअर बाजाराच्या निर्धारित तासांनंतरही गुंतवणूकदारांना त्यांचे ऑर्डर टाकू देण्याची परवानगी देणे हि सुविधा म्हणजेच झेरोधामध्ये AMO ऑर्डर म्हटले जाते. अशाप्रकारे, प्रत्येकासाठी कोणत्याही निर्बंधाशिवाय शेअर मार्केटमध्ये सक्रियपणे व्यापार करणे किंवा गुंतवणूक करणे सोपे होते.
सोप्या भाषेत एएमओ ऑर्डर आपल्याला व्यापार सत्राच्या एक दिवस आधी व्यापार करण्यास किंवा ऑर्डर देण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ, जर आपल्याला मंगळवारी लवकरात लवकर शेअर खरेदी करायचा असेल तर आपण मंगळवारी बाजार उघडण्यापूर्वी सुद्धा आपण एएमओ ऑर्डर देऊ शकता.
- पण ट्रेड प्रत्यक्षात अंमलात येतो?
- ट्रेडिंग आणि ऑर्डर प्लेसमेंटचे सर्व पर्याय एएमओ ऑर्डरमध्ये देखील उपलब्ध आहेत का ?
हे समजून घेण्यासाठी, झेरोधामध्ये एएमओ ऑर्डर कशी कार्य करते हे जाणून घेऊ ?
झेरोधामध्ये एएमओ ऑर्डर कशी कार्य करते?
मार्केट तासांच्या ऑर्डर प्रमाणेच, एकदा आपण ऑर्डर देण्याचे निवडले की आपल्याला लिमिट किंवा मार्केट ऑर्डरचा पर्याय प्रदान केला जातो जो आपल्याला आपल्या निर्धारित किंमतीवर किंवा सध्याच्या बाजार किंमतीवर व्यापार करण्यास अनुमती देतो.
एएमओ ऑर्डरमध्ये, आपल्याला शेअर संख्या , ऑर्डर प्रकार (इंट्राडे किंवा डिलिव्हरी), ऑर्डरची वैधता इत्यादी निवडण्यासाठी सर्व पर्याय मिळतात, परंतु आपल्याला AMO मध्ये SL-M ऑर्डर देण्याची परवानगी नाही.
आपण मार्केट ऑर्डर निवडल्यास, दुसर्या दिवशी मार्केट उघडते त्या मूल्यावर आपली ऑर्डर पूर्ण होईल.
पुढे,जर आपण लिमिट ऑर्डर टाकलेली असेल तर लिमिट ऑर्डर किंमतीच्या जुळणीवर,आपली ऑर्डर सकाळी 9:07 ते दुपारी 3:20 पर्यंत चालविली जाईल.आणि जर किंमत जुळली तर आपली ऑर्डर पूर्ण होईल.
झेरोधामध्ये आपले डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
झेरोधामध्ये AMO ऑर्डर टाकण्याची वेळ
आता झेरोधामध्ये एएमओ ऑर्डर सुविधा उपलब्ध आहे त्या वेळेबद्दल चर्चा करूया. ब्रोकर आपल्याला वेगवेगळ्या विभागांमध्ये (इक्विटी, चलन आणि कमोडिटी ) ट्रेड करण्यास परवानगी देतो.
या सर्व विभागांसाठी बाजाराचे तास भिन्न आहेत आणि एएमओ ऑर्डरच्या वेळेस आपण झेरोधा अँपमध्ये ऑर्डर देऊ शकता त्या वेळेचे तपशील खाली आहेत.
- इक्विटी एनएसई: दुपारी 3:45 PM ते सकाळी 8:57 AM
- इक्विटी बीएसई: दुपारी 3:45 PM ते सकाळी 8:59 AM
- चलन - Currency : दुपारी 3:45 PM ते सकाळी 8:59 AM
- फ्युचर्स आणि ऑपशन : दुपारी 3:45 PM ते सकाळी 9:10 AM
- कमोडिटी : दिवसातील कोणत्याही वेळी
झेरोधामध्ये एएमओ ऑर्डर कशी करावी?
- शेअर संख्या (Quantity) प्रविष्ट करा
- शेअर किंमत (Price) प्रविष्ट करा
- उत्पादन इंट्राडे किंवा डिलिव्हरी निवडा (Intraday or Long term)
- ऑर्डर प्रकार निवडा (Limit, Market, SL)
- वैधता (Day, IOC, Minutes) निवडा
- आता ऑर्डर देण्यासाठी स्वाइप (Swipe )करा.
झेरोधा AMO ऑर्डरची वैधता
झेरोधा AMO ऑर्डर शुल्क
- इक्विटी डिलिव्हरी (Equity Intraday) - शून्य
- इक्विटी इंट्राडे(Equity Intraday) - 0.03% किंवा ₹20 ,जे कमी असेल.
- इक्विटी फ्युचर्स(Equity Futures) - 0.03% किंवा ₹20 ,जे कमी असेल
- इक्विटी ऑप्शन्स(Equity Options) - फ्लॅट ₹ 20 प्रत्येक अंमलबजावणीच्या ऑर्डर साठी
- चलन फ्युचर्स (Currency Futures) - 0.03% किंवा ₹20 ,जे कमी असेल
- चलन पर्याय (Currency Options) - 0.03% किंवा ₹20 ,जे कमी असेल
- कमोडिटी फ्युचर्स (Commodity Futures) - 0.03% किंवा ₹20 ,जे कमी असेल
- कमोडिटी पर्याय (Commodity Options ) - 0.03% किंवा ₹20 ,जे कमी असेल
.png)




Do not enter any spam link in comment box