Farmer Crop Insurance - शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांत पिक विमा मिळणार असल्याची घोषणा 2023 चा अर्थसंकल्प यामध्ये केली आहे. पीक विमा साठी लागणारी उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार आहे .
1 रूपये पीक विम्यासाठी अंदाजे 3312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही वर्षापासून राज्यात होणारा अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. अशा प्रकारच्या अस्मानी संकटातून शेतकरी राजाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा मुुुख्य हेतू आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे या योजनेचे संचालन केले जाते. 13 जानेवारी 2016 पासून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया
घोषणा केलेली पंतप्रधान पीक विमा योजना ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी आपापल्या इच्छेनुसार पीक विमा काढू शकतात . या योजनेमध्ये नैसर्गिक आपत्ती, कीड तसेच रोगांमुळे होणारे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देणे हा मुख्य उद्देश आहे.
यासाठी खरीपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.
यासाठी असेल विमा कवच
- पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती अथवा किड, रोगामुळे होणारे नुकसान
- पूर,दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास.
- पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र
- इतर नैसर्गिक आपत्ती जसे की विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, गारपीट झाल्यास नुकसान भरपाई मिळते.
अर्ज करण्यासाठी योजनेची अधिकृत वेबसाईट - https://pmfby.gov.in/

Do not enter any spam link in comment box