Type Here to Get Search Results !

जाणून घ्या, आसाम राज्याबद्दल आश्चर्यकारक तथ्ये | 12 Interesting Facts About Assam in Marathi

1- बिहूचा तिहेरी उत्सव!

आपल्या सर्वांना माहित आहे की या ईशान्येकडील राज्याचा प्रमुख सण बिहू आहे. परंतु आसामी लोक हा सण तीनदा साजरा करतात हे अनेकांना माहीत नाही. बिहूचे तीन प्रकार आहेत - पहिला आहे ,माघ बिहू (जो मध्य-जानेवारी मध्ये साजरा केला जातो), दुसरा आहे ,बोहाग बिहू (जो मध्य एप्रिल मध्ये साजरा केला जातो) आणि तिसरा आहे , काटी बिहू (जो ऑक्टोबरमध्ये साजरा केला जातो ). बिहू व्यतिरिक्त राज्यात नवरात्रीही उत्साहात साजरी केली जाते.

2- आसामचा भारतात प्रवेश!

1824-26 च्या अँग्लो-बर्मी युद्धानंतर ब्रिटिशांनी आसामचा प्रदेश ताब्यात घेतला. आणि अशा प्रकारे तो भारतीय राज्याचा एक प्रमुख भाग बनला.




3- जागतिक वारसा स्थळे!

आसाममध्ये दोन युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थळे आहेत-पहिले म्हणजे  काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि दुसरे आहे  मानस वन्यजीव अभयारण्य. या साइट्सवर पाण्यातील जंगली म्हशी, हूलोक गिबन, एक शिंगी  गेंडा इत्यादीसारख्या अनेक धोक्यात असलेल्या प्रजातींचे निवासस्थान आहे.


4 - भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल!



भूपेन हजारिका सेतू, हा भारतातील सर्वात लांब असणारा नदीवरील पूल आहे , जो आसामला अरुणाचल प्रदेशशी जोडतो. त्याची लांबी 9.15 किलोमीटर इतकी  आहे.


5 - चहाची राजधानी!



आसाम हा भारतातील सर्वात मोठा चहा उत्पादक आहे. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी सर्वप्रथम आसाममध्ये चहाचे मळे सुरू केले. आसाममध्ये  मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे हिरव्यागार चहाच्या मळ्यात जाण्याची निश्चितच योजना आखतात आणि ते पाहून मंत्रमुग्ध व्हायला होते .


6- आशियातील सर्वात जुने तेलक्षेत्र!

जगातील दुसरे सर्वात जुने आणि आशियातील सर्वात जुने तेलक्षेत्र हे आसाममधील डिगबोई येथे आहे. खरं तर, भारताच्या तेलसाठ्यापैकी चौथा हिस्सा हा आसाम-अराकन खोऱ्यात आहे.


7 - जगातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान नदी बेट!





आसाम हे जगातील सर्वात मोठे नदी बेट "माजुली" तसेच जगातील सर्वात लहान नदी बेट "उमानंदा" चे घर आहे. माजुली नदी बेट हे  ब्रह्मपुत्रा नदीच्या वरच्या भागात आहे जे गुवाहाटीपासून 200 किमी अंतरावर आहे , तर उमानंद बेट  ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी आहे.


8 -बर्ड्स सुसाईड पॉइंट!

आसामच्या बोराई टेकड्यांमधले जटिंगा हे छोटेसे गाव “पक्षी आत्महत्या” या घटनेसाठी प्रसिद्ध आहे. 100 वर्षांहून अधिक काळ, प्रत्येक हिवाळ्यात, हजारो पक्ष्यांनी येथे आत्महत्या केल्या आहेत; ज्याचे कारण अद्याप एक रहस्य आहे. खरंच विचित्र आहे !


9- प्रसिद्ध कामाख्या मंदिर!



गुवाहाटी येथील नीलांचल पर्वतावर स्थित मां कामाख्या देवीचे मंदिर हे १०८ शक्तीपीठांपैकी एक आहे. कामाख्या देवीचे शक्तीपीठ हे सर्वात शक्तिशाली शक्तीपीठ मानले जाते.


10 -आशियातील सर्वात मोठे ड्राय फिश मार्केट!



आशियातील सर्वात मोठा सुका मासळी बाजार गुवाहाटीपासून जवळ असलेल्या जागीरोड येथे आहे. हा बाजार आठवड्यातून तीन दिवस चालतो आणि मलेशिया, भूतान आणि इतर काही दक्षिण पूर्व देशांना मासे निर्यात करतो.


11- ईशान्य भारताचे प्रवेशद्वार!



आसामला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हटले जाते ; कारण NH31 मार्गे सिलीगुडी कॉरिडॉरशी जोडलेले हे एकमेव राज्य आहे.


12 - आसामचा एक शिंगी गेंडा!



गेंड्यांच्या प्रजातींपैकी सर्वात मोठी असणारी आणि झपाट्याने कमी होत असलेली ,ग्रेटर एक शिंगी  गेंड्याची प्रजाती ,  हि  फक्त भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये, विशेषतः आसाममध्ये स्तिथ आहे. एक शिंग असलेला गेंडा हा आसामचा राज्य प्राणी देखील  आहे.


धन्यवाद ... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.