स्टॉक मार्केटची गरज का आहे? हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल, तर आज आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून शेअर बाजाराची नक्की गरज का आहे?
सर्वप्रथम आपण पाहू - देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शेअर मार्केटची गरज का आहे ?
शेअर मार्केट हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे साधन आहे जसे की आपल्या शरीरातील रक्ताचे महत्त्व आहे,अगदी तसे काही. कोणत्याही देशाचे शेअर मार्केट हे त्या देशाच्या आर्थिक प्रगतीचे निदर्शक आहे, शेअर मार्केट देशाच्या औद्योगिक प्रगतीबद्दल आणि आर्थिक व्यवस्थेची स्थिती देखील सांगते.
देशाच्या अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराचे योगदान खालीलप्रमाणे आहे
- औद्योगिक विकासासाठी भांडवलाचा अभाव दूर करण्यासाठी -Industrial Development
- देशाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी - Economy Stability
- प्रत्येकाला शेअर बाजाराचा लाभ घेण्याची संधी देण्यासाठी व्यवस्था प्रदान करणे -
- भांडवली बाजारावर नियंत्रण - Control capital market in country
गुंतवणूकदारासाठी स्टॉक मार्केटची गरज का आहे ? -
स्टॉक मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री होत असते आणि शेअर खरेदी करणाऱ्याला शेअर्स विकणारा आणि शेअर्स विकणाऱ्या व्यक्तीला शेअर खरेदी करणारा व्यक्ती हे सर्व स्टॉक मार्केटच्या मदतीने अगदी सहजतेने उपलब्ध केले जाते, स्टॉक मार्केटशिवाय शेअर्स खरेदी आणि विक्रीचा विचार सामान्य माणूस करू शकत नाही
आता आपण शेअर बाजाराचे फायदे पाहू-
शेअर मार्केट प्लेस - स्टॉक मार्केट हे शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठी मार्केट प्लेस आहे, जे सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे, हे स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केटच्या मदतीने सहज शक्य आहे.
स्टॉक मार्केटमध्ये आपण अगदी सहजतेने इंटरनेटच्या मदतीने, कोठेही कोणताही स्टॉक सहज खरेदी आणि विक्री करू शकता.
LIQUIDITY -STOCK MARKET मुळे, तुम्हाला स्टॉक गुंतवणुकीत CASH LIQUIDITY चा मोठा फायदा मिळतो, तुम्हाला पाहिजे तेव्हा स्टॉक खरेदी आणि विक्री करू शकता, आणि तुम्ही CASH च्या बदल्यात SHARE किंवा SHARE विकून सहजपणे कॅश मिळवू शकता,
डिजीटल स्टॉक वॉलेट - स्टॉक मार्केटमुळे तुम्हाला शेअर्सच्या देखभालीची चिंता करण्याची गरज नाही,आपले सर्व शेअर्स स्टॉक वॉलेटमध्ये अर्थात डिमॅट अकाउंटमध्ये पूर्णपणे सुरक्षित असतात आणि आपण ते केंव्हाही पाहू शकतो.
नफ्याची संधी - देशातील शेअर बाजार प्रत्येकाला शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला नफा मिळवण्याची संधी देत असतो, शेअर बाजाराच्या मदतीने कोणीही कोठूनही गुंतवणूक करू शकतो अगदी घरी बसून सुद्धा.
उद्योगांसाठी स्टॉक मार्केटची गरज का आहे ? -
आज प्रत्येक मोठ्या कंपनीसाठी भांडवल मिळवण्यासाठी शेअर बाजार हा सर्वोत्तम पर्याय आहे, कोणत्याही कंपनीसाठी शेअर बाजाराचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूया-
दीर्घ मुदतीसाठीचा वित्तपुरवठा - कंपनीला स्टॉक मार्केटद्वारे मिळालेले भांडवल कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत कंपनीवर कोणत्याही प्रकारचे भांडवल परत करण्याची गरज नाही, म्हणून कंपनी स्टॉक मार्केटकडून मिळालेले भांडवल दीर्घ काळासाठी वापरू शकते.
भांडवलावर व्याज नाही - दीर्घकालीन भांडवलासह शेअर बाजारातून मिळणारे भांडवल हे असे भांडवल आहे, ज्यावर कोणतेही व्याज कंपनीस भरावे लागत नाही, तर कंपनीला इतर कोणत्याही प्रकारच्या घेतलेल्या कर्जावर मात्र व्याज द्यावे लागते,जसे की बँक,NBFC इत्यादी.
शेअर बाजारात योग्य शेअरमध्ये गुंतवणूक करून, इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त नफा मिळवता येतो,त्यासाठी शेअर गुंतवणूक करताना शेअरचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
शेअर मार्केटची गरज का आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला आहे ,आपणास ही माहीती समजली असेल अशी आशा आहे.
धन्यवाद...
Do not enter any spam link in comment box