भारत सरकारने ई श्रम पोर्टल - e Shram Card Registration 2021 सुरू केले आहे. ज्याअंतर्गत देशातील प्रत्येक कार्यरत असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाईल. या पोस्टमध्ये ई श्रम कार्ड काय आहे ?, ई श्रम कार्ड ऑनलाईन कसे काढावे ?, ई श्रम कार्डाचा काय फायदा होईल, ई श्रम कार्ड का बनवले जात आहे इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कृपया ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा ,
| योजना | ई श्रम कार्ड |
|---|---|
| प्राधिकरण | श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार |
| नोंदणी अर्ज सुरू | 26 ऑगस्ट 2021 |
| अधिकृत संकेतस्थळ | https://eshram.gov.in/ |
ई श्रम कार्ड - E Shram Card काय आहे आणि ई श्रम कार्डचा फायदा काय आहे ?
ई - श्रम कार्ड च्या मार्फत देशभरातील विविध क्षेत्रातील 38+ कोटी कामगार यांची माहिती गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे असंघटित क्षेत्रातील असंघटित कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी आणि एकाच ठिकाणी सर्व मजुरांचा डेटाबेस एकत्रित करून, या पोर्टल अंतर्गत माहिती संग्रहित केली जाणार आहे . यामध्ये समाविष्ट असतील कामगार जसे कि बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, प्लॅटफॉर्म कामगार , रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते , घरगुती कामगार, कृषी कामगार आणि इतर असंघटित कामगार.
असे लोक ज्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. कारण अशा व्यक्तींना काय योजना आली आणि काय गेली हे जाणून घेणे शक्य होत नाही.याअंतर्गत, ई श्रम कार्ड नोंदणीनंतर सरकारकडून ई श्रम कार्ड जारी केले जाईल. कोणत्याही मजुरांना योजनांचा लाभ थेट मिळू शकेल आणि सरकार देखील कामगारांचा विकासासाठी विविध पावले उचलेल.
ई - श्रम कार्डची काही खास वैशिष्ट्ये
- तुम्हाला 12 अंकी युनिक नंबर मिळेल
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय देशभरातील सुमारे 38+ कोटी मजुरांचे ई श्रम कार्ड बनवत आहे , ई श्रम कार्डवर 12-अंकी युनिक (युनिव्हर्सल अकाउंट नंबर यूएएन) क्रमांक असेल . तुम्हाला माहिती आहेच की भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र म्हणून वेगळा आधार कार्ड क्रमांक असतो. त्याचप्रमाणे, ई श्रम कार्डने देखील भारतातील मजुरांची ओळख पटेल .
- सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत करेल
कोणतीही योजना भारत सरकार चालवते त्याचा डेटाबेस त्या सर्व योजनांशी जोडला जाईल, जेणेकरून ते कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे औपचारिक क्षेत्रातील योजनांची नोंदणी करू शकतील आणि त्यांचा लाभ घेऊ शकतील.
- राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकही जारी केला जाईल
कामगारांना मदत करण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केला जाईल, कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी ते टोल फ्री क्रमांकाद्वारे माहिती मिळवू शकतील.
ई श्रम कार्ड नोंदणी पात्रता निकष काय असतील
- नोंदणी करणाऱ्या कामगारांचे वय 16 - 59 च्या दरम्यान असावे.
- कामगार व्यक्ती हा EPFO किंवा ESIC चे सदस्य नसावेत.
- कामगार व्यक्ती आयकर भरणारा नसावा.
- असंघटित क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे.
अर्ज फी
यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ई श्रम कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- वीज बिल/रेशन कार्ड
- सक्रिय मोबाइल नंबर
ई श्रम कार्ड नोंदणी कशी करावी
- ई श्रम कार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
| https://eshram.gov.in/ |
- तेथे तुम्हाला ई-श्रम वेबसाइट वर रजिस्टर लिंकवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सेल्फ रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल
- येथे तुम्हाला आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी पाठवावा लागेल.
- त्यानंतर नोंदणीचा डॅशबोर्ड तुमच्या समोर उघडेल.
- येथे तुम्हाला सर्व तपशील योग्यरित्या भरावे लागतील आणि शेवटी सर्व माहिती सबमिट करावे लागेल , त्यानंतर तुमचा ऑनलाइन ई श्रम कार्ड नोंदणी अर्ज पूर्ण होईल .
धन्यवाद ....

Do not enter any spam link in comment box