Type Here to Get Search Results !

स्विंग ट्रेडिंग काय आहे ? What is Swing trading in marathi

 मित्रानो आपण या लेखात स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया.

स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?

नावाप्रमाणेच स्विंग ट्रेडिंग या प्रकारात शेअर च्या  किंमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच ‘स्विंग्स‘ चा फायदा घेऊन नफा मिळवण्यासाठी  एखादा शेअर एक किंवा अधिक दिवसांसाठी खरेदी केला जातो आणि अपेक्षित नफा प्राप्त झाल्यानंतर तो शेअर पुन्हा विकला जातो.Swing Trading हा Intraday Trading  आणि Longterm Trading यामधील एक ट्रेडिंगचा प्रकार आहे .

 स्विंग ट्रेडिंग मध्ये ट्रेडर ,अल्प मुदतीत शेअर किंमत बदलापासून नफा कमविण्याचा प्रयत्न करतात.  शेअरमधील ट्रेंड तसेच संभाव्य शेअर किंमत मधील बदल ओळखण्यासाठी ट्रेडर मूलभूत(Fundamentals) आणि तांत्रिक विश्लेषणाचा(Technical Analysis ) आधार घेऊन त्यांचे निर्णय  घेतात.

 


 स्विंग ट्रेडिंग हे कमी कालावधी साठी केले जाते. जसे की काही दिवस किंवा काही आठवडे .

स्विंग ट्रेडिंगमधून ट्रेडर  २ टक्के ते ५ टक्के एवढा नफा अपेक्षित करतात. मात्र संबंधित शेअर्स मध्ये Positive Moment चांगली असेल तर ५ टक्के पेक्षाही जास्त नफा मिळत असतो. काही कारणास्तव जर शेअर ची किंमत खाली आली तर अपेक्षित नफा देखील मिळत नाही.स्विंग ट्रेडिंग करून  सातत्याने 2%  नफा जरी पूर्ण केल्यास उत्कृष्ट वार्षिक परतावा मिळवू शकतो.

उदाहरणार्थ – जर Swing Trading करून आपण आपल्या गुंतवणुकीवर दरमहा 2 टक्के रिटर्न जर मिळाले आणि  आपण दरमहा यामध्ये नियमितपणा ठेवला तर वर्षाच्या अखेरीस रिटर्न ची टक्केवारी 24% एवढी असेल.

डे ट्रेडिंग वि. स्विंग ट्रेडिंग

 स्विंग ट्रेडिंग आणि डे ट्रेडिंग एकसारखे दिसू शकतात परंतु त्यामध्ये  एक मूलभूत फरक आहे ते म्हणजे वेळ.

इन्ट्राडे ट्रेडिंग हे शक्यतो काही मिनिटां मध्येच किंवा काही तासांत केले जाते तर  स्विंग ट्रेडिंग सहसा काही दिवस किंवा आठवड्यांच्या कालावधीत केले जाते.

 इन्ट्राडे ट्रेडिंगचा कालावधी हा जास्तीत जास्त एक दिवस असतो तर स्विंग ट्रेडिंग हे काही आठवडे ते काही महिने करत असल्याने स्विंग ट्रेडिंग मध्ये इन्ट्राडे ट्रेडिंग च्या मानाने गुंतवणुकीचा धोका कमी असतो.

स्विंग ट्रेडिंगचे फायदे

जे लोक शेअर मार्केटच्या काळामध्ये काम करतात परंतु तरीही सक्रिय, तुलनेने अल्प-मुदतीसाठी स्टॉक ट्रेडिंग करू इच्छितात त्यांच्यासाठी स्विंग ट्रेडिंग ही एक चांगली ट्रेडिंग स्टाईल असू शकते.

स्विंग ट्रेडिंगमुळे आपण ट्रेडिंग करीत असलेल्या बाजाराचे विश्लेषण करण्यास अधिक वेळ घेता येतो आणि इन्ट्राडे ट्रेडिंग वेळेच्या दबावाशिवाय स्विंग ट्रेडिंग मध्ये ट्रेड अधिक सोयीस्कर पद्धतीने करू शकतो.

इतर प्रकारच्या ट्रेडिंगइतके आर्थिक बातम्यांचा तितका प्रभाव पडत नाही,जसे की इन्ट्राडे ट्रेडिंग.

स्विंग ट्रेडिंग चे तोटे

स्विंग ट्रेड ऑपरेट करण्यासाठी अधिक मानसिक नियंत्रण, शांतता आणि संयम आवश्यक आहे.

 यासाठी उच्च प्रारंभिक भांडवल असणे आवश्यक आहे म्हणूनच हे मोठ्या नुकसानास सूचित करते.

 बाजाराचा अंदाज न आल्याने, स्विंग ट्रेडिंग मार्केट व्हीपॉससाठी अत्यधिक संवेदनशील आहे आणि विशेषत: अनपेक्षित मार्गाने वागू शकते.

 स्टॉप लॉस हिट झाला तर आपल्या भांडवलाचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

तर मित्रानो आपण या लेखात स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला,आपणास ही माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा.

धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.