जगात प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो पण फारच कमी लोक यशस्वी होत असतात. जे कमी वयातच जगासाठी एक उदाहरण बनले, अशीच एक व्यक्ती म्हणजे आधुनिक शिक्षक बायजू रवींद्रन. 41 वर्षीय बायजू ने आपल्या कौशल्याने जगभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यास मदत केली .
अलीकडेच त्यांच्या स्टार्टअप बायजूने आकाश शैक्षणिक सेवा 7300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्या आहेत. हे बायजूचे आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण आहे.
सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण
केरळमध्ये जन्मलेल्या बायजू रवींद्रन यांची ही कहाणी आहे ,भारताचे नवे अब्जाधीश. एकेकाळी शिक्षक असलेले रवींद्रन यांची आज 3 बिलियन डॉलरची कंपनी आहे. रविंद्रनच्या यशाचे रहस्य म्हणजे त्यांचे अँप Byjus - The Learning App .
केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील अझीकोड या गावात राहणारे बायजू रविंद्रन यांचे प्राथमिक शिक्षण अझिकोड येथील मल्याळम माध्यमिक शाळेत झाले, जिथे त्यांचे वडील आणि आई शिक्षक होते.
सुरुवातीला त्याला अभ्यासाव्यतिरिक्त खेळातही रस होता. पदवीनंतर, बायजू रवींद्रन यांनी अभियंता म्हणून नोकरी सुरू केली. यूके शिपिंग कंपनीत अभियंता म्हणून काम पाहत होते. त्याच वेळी, जेव्हा ते सुट्टीच्या दिवशी भारतात आले तेव्हा त्यांनी आपल्या काही मित्रांना आयआयएमच्या (IIM) प्रवेश परीक्षेची तयारी करण्यास मदत केली.
2011 मध्ये सुरू केले स्टार्टअप
रवींद्रनने स्वत: आयआयएम प्रवेश परीक्षा दिली आणि 100 टक्के मार्के मिळवले, तेव्हा रवींद्रन ला वाटले की मार्क हे तुक्का लागल्याने मिळाले त्यामुळे त्यांनी परत परीक्षा दिली आणि पुन्हा 100 टक्के मार्के मिळवले.परंतु त्यांनी IIM जॉईन न करता कोचिंग सेंटर सुरू केले.यानंतर नोकरी सोडून पूर्ण वेळ कोचिंग करण्याचा निर्णय घेतला आणि येथूनच खरा बायजू यांचा यशाचा प्रवास सुरु झाला.
ते विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिकवायचे की त्यांच्या विद्यार्थ्यांना आनंद वाटू लागला. हळूहळू त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. ते सेलिब्रिटी शिक्षक झाले आणि स्टेडियम मध्ये एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांना शिकवायला लागले.
त्यांनी 2009 मध्ये कॅट परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाइन व्हिडिओ-आधारित शिक्षण कार्यक्रम सुरू केला. 2011 मध्ये त्यांनी थिंक अँड लर्निंग हे स्टार्टअप सुरू केले. ही बायजूची मूळ कंपनी आहे.
BYJU'S - द लर्निंग अँप लाँच
मग रविंद्रन च्या मनात एक कल्पना आली की एवढ्या विध्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा सर्व विध्यार्थ्यांना एकत्र शिकवता आले तर आणि त्यांनी 2015 मध्ये BYJU'S - द लर्निंग अँप लाँच केले.
हे त्यांच्यासाठी गेम चेंजर सिद्ध झाले. स्मार्टफोनच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये हे अँप ही लोकप्रिय झाले. इतके लोकप्रिय झाले की रवींद्रन अवघ्या 7 वर्षात अब्जाधीश झाले.
कंपनी ऑनलाइन शैक्षणिक सामग्री प्रदान करते. काही सामग्री विनामूल्य आहे, परंतु काहींसाठी शुल्क द्यावे लागते. सप्टेंबर 2020 पर्यंत बायजूचे 6.4 कोटी सदस्य होते. आणि ही संख्या खूप वेगाने वाढत आहेत.
नवनवीन प्रयोग
बायजू रवींद्रन या उद्योजक शिक्षकाला भारतीय शिक्षणासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे जे डिस्ने ने मनोरंजनासाठी केले आहे.
त्यांच्या अॅपमध्ये, त्यांनी डिस्नेच्या धर्तीवर द लायन किंगच्या सिम्बाच्या माध्यमातून ग्रेड वनमधील विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी शिकवले.
Byju’s अॅपमध्ये अॅनिमेटेड व्हिडिओ, गेम्स आणि कथा देखील आहेत. बायजूचे बालवाडी ते बारावीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण वर्ग उपलब्ध आहेत. याशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय व नागरी सेवा यांच्या प्रवेश परीक्षेचे प्रशिक्षणदेखील उपलब्ध आहे.
फॉर्च्यून 40-अंडर -40 टेक्नॉलॉजी लिस्ट मध्ये सामील
फॉर्च्युन मासिकाने सप्टेंबर 2020 मध्ये ग्लोबल 40-अंडर -40 टेक्नॉलॉजी लिस्ट 2020 मध्ये बायजू रविंद्रनचा देखील समावेश केला होता. त्यावेळी रविंद्रन यांची एकूण मालमत्ता 17695 कोटी रुपये होती.
भारतातील सर्वात मोठी Education Technology कंपनी
बायजू ही भारतातील सर्वात मोठी शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. जी लाखो विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षांच्या तयारीसाठी आणि अभ्यास करण्यास मदत करीत आहे.
तर बायजू रवींद्रन यांचा यशाचा प्रवास आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद...

Do not enter any spam link in comment box