जर आपल्याला स्वस्त दरात गृह किंवा वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर चांगला क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे. आता आपण व्हाट्स -अँप वर आपला एक्सपेरियन इंडियाने दिलेले क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासू शकता.
एक्सपेरियन इंडिया हे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ऍक्ट 2005 अंतर्गत भारतात परवाना मिळालेले पहिले क्रेडिट ब्युरो आहे.

नुकतीच बुधवारी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी Experian India ने एका सेवेची घोषणा केली जी भारतीय ग्राहकांना WhatsApp वर त्यांचे क्रेडिट स्कोअर विनामूल्य तपासण्याची परवानगी देते.
एका निवेदनात, एक्सपेरियन कंपनीने म्हटले आहे कि , भारतातील कोणतीही क्रेडिट ब्युरो अशा प्रकारे सेवा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्राहक त्यांचे एक्सपेरियन क्रेडिट अहवाल नियमितपणे तपासू शकतात आणि त्यांच्या क्रेडिट पोर्टफोलिओचे सहज निरीक्षण करू शकतात.
ग्राहक त्यांचा एक्सपेरियन क्रेडिट रिपोर्ट तपासू शकतात, कोणत्याही अनियमिततेचा मागोवा घेऊ शकतात, फसवणूक ताबडतोब शोधू शकतात आणि त्यांचा क्रेडिट स्कोअर पुन्हा तयार करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलवर नियंत्रण मिळवता येते, असे कंपनीने म्हटले आहे.
जगात WhatsApp वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे - 487.5 दशलक्ष वापरकर्ते आहेत - WhatsApp मेसेजिंग सेवा ही भारतीय ग्राहकांसाठी दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.
WhatsApp वर मोफत एक्सपेरियन क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी खालील पायऱ्या वापरा -
- प्रथम Experian India चा WhatsApp नंबर +91-9920035444 तुमच्या मोबाइल मध्ये सेव करा .
- आता Experian India च्या WhatsApp नंबर +91-9920035444 वर ‘Hi ’ message पाठवा
- त्यानंतर तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर यासारखे काही मूलभूत तपशील विचारतील तो त्यांना शेअर करा.
- यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर एक OTP येईल .
- आता तुम्ही आपला क्रेडिट स्कोर पाहू शकता ,तुम्ही एक्सपेरियन क्रेडिट रिपोर्टच्या पासवर्ड संरक्षित प्रतसाठी विनंती करू शकता, जी तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवली जाईल.
धन्यवाद ...
Do not enter any spam link in comment box