कतारमध्ये रविवारपासून (20 नोव्हेंबर) धूमधडाक्यात सुरू झालेल्या मार्की टूर्नामेंटसह 2022 FIFA विश्वचषक अखेर आपल्यासमोर आहे. जगभरातून समाविष्ट असलेल्या 32 संघांची ही स्पर्धा जवळपास महिनाभर चालणार असून अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसेल येथे होणार आहे.
फिफा विश्वचषक ही स्पर्धा फुटबॉलमधील सर्वात मोठे पारितोषिक असणारी स्पर्धा आहे आणि सर्व 32 संघ ट्रॉफी उंचावण्याचे आणि विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव कोरावे अशी लक्षवेधी कामगिरी करण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूला असेल.
ही स्पर्धा खेळण्याचा मान सुद्धा काही कमी नाही तरी या स्पर्धेमुळे होणाऱ्या आर्थिक फायद्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
सर्व 32 सहभागी संघ ,विजेते आणि उपविजेतेसह कतारमधून मोठी रक्कम घेऊन जातील. चॅम्पियन संघ $42 दशलक्ष (रु. 344 कोटी) कमावतील त उपविजेता संघ जवळजवळ $30 दशलक्ष (रु. 245 कोटी) कमावतील.
खाली आपण सविस्तर पाहूया कोणत्या संघाला किती पैसे मिळतील.
पोझिशन. प्राइज मनी ($) बक्षीस रक्कम (INR)
विजेते -$42 दशलक्ष -रु. 344 कोटी
उपविजेते -$30 दशलक्ष -रु. 245 कोटी
तिसरे स्थान -$27 दशलक्ष -रु. 220 कोटी
चौथे स्थान -$25 दशलक्ष -रु. 204 कोटी
5वे -8वे स्थान -$17 दशलक्ष -रु. 138 कोटी
9वे-16वे स्थान -$13 दशलक्ष -रु. 106 कोटी
17वे-32वे स्थान -$9 दशलक्ष- रु. 74 कोटी
2018 मध्ये इतिहासात दुसर्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर फ्रान्स त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण करू पाहणार आहे France ने अंतिम फेरीत क्रोएशियाला पराभूत करून सुमारे $38 दशलक्ष रक्कम जिंकली होती.
ट्रॉफी जिंकण्यासाठी ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन हॉट फेव्हरेट आहेत, तर जर्मनी, स्पेन, इंग्लंड आणि पोर्तुगाल यांचे सुद्धा तगडे आव्हान असेल.

Do not enter any spam link in comment box