डेट फंड - Debt Funds
डेट फंड (Debt Funds) हे इतर म्युच्युअल फंडासारखे एक म्युच्युअल फंड असतात जे निश्चित उत्पन्न साधनांमध्ये (fixed income instruments ) आपला पैसा गुंतवतात , निश्चित उत्पन्न साधन, जसे की कॉर्पोरेट आणि सरकारी बॉण्ड्स , कॉर्पोरेट कर्ज बॉण्ड्स आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स इ.
ज्या निश्चित उत्पन्न साधनामध्ये डेट फंड गुंतवणूक करतात ते आपण गुंतवलेल्या भांडवलाची वाढण्याची हमी देतात. डेट फंडांना फिक्स्ड इन्कम फंड किंवा बाँड फंड असेही संबोधले जाते.
डेट फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
डेट फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत त्यातील काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे :
- कमी किमतीची रचना (low cost structure)
- तुलनेने इतर म्युच्युअल फंडांपेक्षा स्थिर परतावा
- तसेच तुलनेने उच्च तरलता (liquidity )
- वाजवी सुरक्षितता.
डेट फंड कोणासाठी उपयुक्त ?
डेट फंड हे गुंतवणूकदारांसाठी आदर्श आहेत जे गुंतवणूकदार नियमित उत्पन्नाचे ध्येय ठेवतात, परंतु जोखीम-प्रतिरोधी असतात. डेट फंड कमी अस्थिर असतात आणि म्हणूनच, इक्विटी फंडांपेक्षा कमी जोखमीचे असतात.
सुरक्षितता
कार्यपद्धतीच्या दृष्टीने, डेट फंड इतर म्युच्युअल फंड योजनांपेक्षा पूर्णपणे भिन्न नाहीत. तथापि, भांडवलाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत, ते इक्विटी म्युच्युअल फंडांपेक्षा जास्त सुरक्षित असतात .
Do not enter any spam link in comment box