पंतप्रधान नरेंद मोदी यांनी 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे उद्घाटन नुकतेच केले आहे आहे. तर डिजिटल बँकिंग युनिट्स काय आहेत ? , त्याचा फायदा काय होईल ? जाणून घेऊया या लेखात .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू आणि काश्मीर येथे दोन डिजिटल बँकिंग युनिट्स राष्ट्राला समर्पित केले . डिजिटल बँकिंग युनिट्सचा मुख्य उद्देश हा नागरिकांचा आर्थिक घटकात समावेश वाढवणे हा आहे . या दोघांपैकी एक युनिट हे श्रीनगरमधील लाल चौकातील SSI शाखा आहे आणि दुसरी जम्मूमधील चन्नी रामा शाखा आहे.
तत्पूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ,वार्षिक अर्थसंकल्प 2022-23 मध्ये हि घोषणा केली होती कि , देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 75 डीबीयू स्थापित केले जातील .
डिजिटल बँकिंग युनिट्सचे फायदे -
डिजिटल बँकिंगचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावेत यासाठी डीबीयूची स्थापना केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील 11 बँका, खाजगी क्षेत्रातील 12 आणि एक स्मॉल फायनान्स बँक या प्रयत्नात सहभागी होत आहेत.
DBUs लोकांना बचत खाते उघडणे, बचत खाते शिल्लक तपासणे, पासबुक छापणे, निधी हस्तांतरण, मुदत ठेव गुंतवणूक, कर्ज मिळवण्यासाठीचा अर्ज करणे , क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करणे , आणि यासारख्या विविध डिजिटल बँकिंग सुविधा प्रदान करतील.
याशिवाय ,
डीबीयूमुळे ग्राहकांना वर्षभर किफायतशीर आणि सुलभ बँकिंग उत्पादने आणि सेवांचा डिजिटल अनुभव मिळू शकेल. डिजिटल बँकिंग युनिट्स डिजिटल आर्थिक साक्षरतेचा प्रसार करतील आणि सायबर सुरक्षा जागरूकता आणि सुरक्षितता याबाबत ग्राहकांना शिक्षित करण्यावर प्रामुख्याने भर दिला जाईल.
तसेच, DBUs द्वारे थेट किंवा व्यवसाय सुविधा देणार्या/वार्ताहरांद्वारे ऑफर केलेल्या व्यवसाय आणि सेवांमुळे उद्भवलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरेशी डिजिटल यंत्रणा प्रदान करेल .

Do not enter any spam link in comment box